गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी कृषी विविधता योजना आभासी पद्धतीने सुरू केली
राज्याच्या आदिवासी भागातील शेती शाश्वत व फायदेशीर व्हावी या उद्देशाने गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ‘कृषी विविधता योजना -2021′ आभासी पद्धतीने सुरू केली. या योजनेचा फायदा गुजरातमधील 14 आदिवासी जिल्ह्यातील 1.26 लाखांहून अधिक वनबंधू-शेतकऱ्यांना होणार आहे.
योजनेविषयी:
- राज्य सरकार आदिवासी शेतकऱ्यांना सुमारे रू.31 करोड चे खते -बियाणांचे वाटप करेल ज्यात 45 किलो युरिया, 50 किलो एनपीके आणि 50 किलो अमोनियम सल्फेटचा समावेश असेल.
- गुजरात सरकारने मागील दहा वर्षांत या योजनेअंतर्गत 10 लाख आदिवासी शेतकऱ्यांना सुमारे रु.250 करोडचे अर्थसहाय्य केलेले आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- गुजरातचे मुख्यमंत्री: विजय रुपाणी
- गुजरातचे राज्यपाल: आचार्य देवव्रत
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा