Table of Contents
आत्तापर्यंत महाराष्ट्रातील शासकीय विभागातील काही स्पर्धा परीक्षा या काही खाजगी कंपन्यांमार्फत घेण्यात येत होत्या पण त्यात खूप गैरप्रकार होत होते. आत्ताच झालेल्या आरोग्य भरतीच्या गट ड व म्हाडा च्या परीक्षेत पेपर फुटणे, पेपर चुकीचे मिळणे असा सावळा गोंधळ होत होता किंवा होणार होता.त्यातच 12 डिसेंबर 2021 च्या म्हाडा भरतीच्या परीक्षेच्या आधल्या दिवशी ला ऐन वेळेवर MHADA ला पेपर रद्द करावा लागला. या आधीपण स्पर्धा परीक्षेत अनेक गैरप्रकार घडत होते. हा सगळा गोंधळ लक्षात घेता बुधवारी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने आता पासून महाराष्ट्रातील शासकीय विभागातील सर्व स्पर्धा परीक्षा पेपर TCS, MKCL व IBPS यांच्यामार्फत घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज या लेखात आपण या निर्णयबद्दल सविस्तर माहिती घेऊयात.
Good News for all Maharashtra State Aspirants
Good News for all Maharashtra State Aspirants: राज्यात गेल्या महिन्यात झालेल्या आरोग्य विभागाच्या ‘क’ आणि ‘ड’ गटाच्या परीक्षांचा पेपर फुटला होता. तसेच म्हाडाच्या विविध पदांसाठीच्या परीक्षांना 12 डिसेंबर 2021 पासून सुरुवात होऊन पुढील काही दिवसांत पार पडणार होत्या. पण या परीक्षेसाठी पैशांचा व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांकडून समोर येताच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्री उशीरा व्हिडिओ ट्विट करत म्हाडा भरती परीक्षा पुढे ढकलल्याची घोषणा केली होती.
या अशा गैर प्रकरणामुळे स्पर्धा परीक्षा पारदर्शीपणे होत नव्हत्या आणि त्या सोबतच बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर फुटण्याचा, परीक्षा प्रवेशपत्र मिळण्यामध्ये, इत्यादी गोष्टीत खूप त्रास होत होता. आता या सर्व बाबींचा विचार करता महाराष्ट्र राज्यातील शासकीय विभागातील सर्व स्पर्धा परीक्षा चांगल्या प्रकारे व्हावेत म्हणून हा चांगला निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार, राज्यातील विविध शासकीय विभागांमार्फत होणाऱ्या परीक्षा यापुढे MKCL (महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड), IBPS (इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सोनेल) किंवा TCS (टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस) यांच्या माध्यमातूनच घेण्यात येणार आहेत. महिन्याभरापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यामध्ये बैठक झाली होती, तेव्हाच परीक्षा घेण्यासाठी MKCLवर शिक्कामोर्तब झालं होतं. तर म्हाडाच्या परीक्षेबाबत काल एक बैठक झाली होती त्यामध्ये TCS चं नाव निश्चित झालं.
Information About TCS
Information About TCS: TCS ही एक मानांकित संस्था असून बँक, रेल्वे भरती, स्टाफ सिलेक्शन यासारख्या परीक्षा घेते. महाराष्ट्रात या आधी TCS ने मुंबई मेट्रो जूनियर इंजीनियरची सुद्धा परीक्षा घेतली होती जी अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडली होती व त्यामुळे विद्यार्थ्यांचा TCS वर विश्वास बसला. नुकतेच महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की यापुढे MHADA परीक्षाही TCS च्या माध्यमातून होईल.
Information About IBPS
Information About IBPS: बँकिंग क्षेत्रातील परीक्षा राबवण्यासाठी एक नामांकित संस्था म्हणजे IBPS होय. राष्ट्रीयीकृत बँकांच्या ऑफिसर व क्लेरिकल च्या परीक्षा आयबीपीएस मार्फत होतात. तसेच केंद्राच्या विविध परीक्षा या आयबीपीएस मार्फत होतात. पारदर्शकपणा आणि विध्यार्थ्यांचा विश्वास यासाठी IBPS ही संस्था ओळखली जाते. अत्यंत पारदर्शक पद्धतीने परीक्षा पार पाडण्याच्या संस्थेमध्ये आयबीपीएस ही एक अग्रणी संस्था आहे. महाराष्ट्रातील MSEB च्या जूनियर इंजीनियर ची परीक्षा याआधी IBPS ने घेतली होती.
Information About MKCL
Information About MKCL: महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या पुढाकाराने Maharashtra Knowledge Corporation Limited (MKCL) या कंपनीची स्थापना कंपनी अधिनियम, 1956 अंतर्गत करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून 5 जानेवारी 2018 रोजी एक शासकीय ठराव जारी करण्यात आला. या ठरावानुसार MKCL शी संबंधित बाबींकरिता महाराष्ट्र शासनाचा प्रातिनिधिक विभाग म्हणून उच्च व तंत्र शिक्षण विभागाऐवजी सामान्य प्रशासन विभागाची नेमणूक झाली आहे. महाराष्ट्रातील MSCIT च्या सर्व परीक्षा या MKCL मार्फत राबविल्या जातात.
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
