Marathi govt jobs   »   Gita Mittal to be awarded Arline...

Gita Mittal to be awarded Arline Pacht Global Vision Award | गीता मित्तल यांना आर्लीन पॅच ग्लोबल व्हिजन पुरस्कार जाहीर

Gita Mittal to be awarded Arline Pacht Global Vision Award | गीता मित्तल यांना आर्लीन पॅच ग्लोबल व्हिजन पुरस्कार जाहीर_20.1

गीता मित्तल यांना आर्लीन पॅच ग्लोबल व्हिजन पुरस्कार जाहीर

जम्मू आणि काश्मीर हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती गीता मित्तल यांना 2021 चा  आर्लीन पॅच ग्लोबल व्हिजन पुरस्कार मिळालेल्यांपैकी एक म्हणून घोषित करण्यात आले आहे. 7 मे 2021 रोजी होणाऱ्या आयएडब्ल्यूजेच्या द्वैवार्षिक परिषदेत  आभासी उद्घाटन समारंभावेळी हा पुरस्कार प्रदान केला जाईल. मेक्सिकोमधील मार्गारिता ल्यूना रामोस बरोबर त्यांना हा सन्मान विभागून दिला आहे.

आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश असोसिएशन (आयएडब्ल्यूजे) ने 2016 मध्ये हा पुरस्कार सुरू केला. न्यायमूर्ती मित्तल हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पहिल्या भारतीय न्यायाधीश असतील. आयएडब्ल्यूजेमध्ये असलेल्या योगदानाबद्दल  एका स्थायी / सेवानिवृत्त महिला न्यायाधीशांना हा पुरस्कार दिला जातो.

Gita Mittal to be awarded Arline Pacht Global Vision Award | गीता मित्तल यांना आर्लीन पॅच ग्लोबल व्हिजन पुरस्कार जाहीर_30.1

सध्या, न्यायमूर्ती मित्तल भारतीय प्रसारण फाउंडेशन (आयबीएफ) ने स्थापन केलेल्या सामान्य मनोरंजन वाहिन्यांसाठी स्वतंत्र, स्वयं-नियामक संस्था, ब्रॉडकास्टिंग कंटेंट कंप्लेंट्स कौन्सिल (बीसीसीसी) च्या अध्यक्ष आहेत. हे पद धारण करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.

महाराष्ट्र राज्य विविध परीक्षा साहित्य

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे :

  • आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश संघटनेचे अध्यक्ष: व्हेनेसा रुईझ
  • आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश संघटनेची स्थापना: 1991
  • आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश संघटनेचे मुख्यालय: वॉशिंग्टन डीसी, यूएसए.

Gita Mittal to be awarded Arline Pacht Global Vision Award | गीता मित्तल यांना आर्लीन पॅच ग्लोबल व्हिजन पुरस्कार जाहीर_40.1

Sharing is caring!