Marathi govt jobs   »   Geological Structure of Maharashtra: Rocks and...

Geological Structure of Maharashtra: Rocks and minerals | महाराष्ट्र भू-शास्त्रीय रचना: खडक व खनिजे

Geological Structure of Maharashtra: Rocks and minerals | महाराष्ट्र भू-शास्त्रीय रचना: खडक व खनिजे_2.1

 

महाराष्ट्र भू-शास्त्रीय रचना: खडक व खनिजे 

 

एखाद्या राज्याच्या भौगोलिक रचनेमुळे खडक आणि उतारांचे प्रकार आणि वैशिष्ट्ये, मातीचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म, खनिजांची उपलब्धता आणि पृष्ठभाग आणि भूमिगत जल संसाधने समजण्यास मदत होते. तर आपण या लेखात महाराष्ट्रातील खडक आणि खनिजांची उपलब्धता आणि महत्त्वाच्या खाणी पाहूयात.

 

  1. आर्कियन कालखंडातील खडक: (बेसमेंट कॉम्पेक्स)

निर्मिती: प्री कॅम्ब्रीयन कालखंडातील वितळलेल्या मॅग्मापासून, जिवाश्म आढळत नाहीत.

आर्थिक महत्व: मँगनीज, तांबे, झिंक, शिसे साठे आढळतात.

प्रदेश: भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, सिंधुदुर्ग

 

2. धारवाड कालखंडातील खडक:

निर्मिती: प्राचिन अग्निजन्य खडकांपासून निर्मिती.

आर्थिक महत्व: या प्रणालीत मँगनीज, सोने, चांदी इ. साठे आढळतात.

प्रदेश: भंडारा, चंद्रपूर, सिंधुदुर्ग

 

3. कडप्पा कालखंडातीलखडक:

निर्मिती: धारवाड प्रणालीतील खडकांचे अपक्षरण होऊन यांची निर्मिती, (लोअर पॅलिओझोईक) वाळू मिश्रीत खडक, अतिशय मजबूत

आर्थिक महत्व: डोलोमाईट, चुनखडकाचे साठे आढळतात.

प्रदेश: या खडक प्रणालीत यवतमाळ, चंद्रपूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग

 

4. गोंडवाना कालखंडातील खडक: (द्रविडीयन प्रणाली)

निर्मिती: वनस्पती व प्राण्यांचे अवशेष मिसळून कार्बोनिफेरस कालखंडात.

आर्थिक महत्व: दगडी कोळशाचे साठे आढळतात.

प्रदेश: नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ

 

5. विंध्ययन कालखंडातील खडक: 

निर्मिती: नदीखोऱ्यामध्ये गाळाच्या संचयनातून

आर्थिक महत्व: यामध्ये हिऱ्याच्या खाणी आढळतात.

प्रदेश: चंद्रपूर

अतिशय मजबूत असल्याने बांधकामासाठी वापर. उदा. लाल किल्ल्यासाठी वारलेला मकराना येथील खडक.

 

6. ज्वालामुखीखडकः (क्रेटॅशियस खडक प्रणाली)

निर्मिती: ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडलेल्या तप्त लाव्हा पासून.

आर्थिक महत्व: यामध्ये बेसॉल्ट खडक प्रामुख्याने आढळतात.

प्रदेश: महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

 

7.जलजन्य/गाळाचे खडक: 

निर्मिती: प्लिस्टोसिन कालखंडात नद्यांच्या गाळाच्या संचयनाने निर्मिती.

आर्थिक महत्व: सिमेंट व विटा तयार करण्यासाठी हे खडक वापरतात.

प्रदेश:  मोठ्या नद्यांच्या खोऱ्यात

 

खडकाचा प्रकार

कालावधी

स्वरुप

आढळ

प्रमाण (%)

आर्कियन

आर्कियन अतिप्राचिन, अग्निजन्य, रुपांतरीत खडक

सिंधुदूर्ग, नांदेड, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली

10.5

धारवाड

प्रोटेरोझोईक

पुरातन स्तरीत खडक

पूर्व नागपूर, भंडारा, सिंधुदूर्ग, कोल्हापूर

कडप्पा

प्रोटेरोझोईक व लोअर पॅलीओझोईक कलादगी व पैनगंगा श्रेणी

सिंधुदूर्ग, कोल्हापूर, चंद्रपूर व यवतमाळ

2

विध्ययन

प्रोटेरोझोईक व लोअर पॅलीओझोईक वालुकाश्मय कठीण खडक

चंद्रपूर

गोंडवाना

मध्यमजीव शेल व सँडस्टोन कोळशाचे खडक कन्हान खोरे,चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, अमरावती

1.5

डेक्कन ट्रॅप

मध्यमजीव भ्रंशमुलक ज्वालामुखी स्वरुपाचा अग्निजन्य खडक चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भाग,मराठवाडा बहुतांश भाग

81.3

गाळाचे खडक / चतुर्थकालीन खडक

नवजीव कालीन

जुना व नवा गाळ

गोदावरी, कृष्णा, भिमा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता इत्यादी नद्यांचे खोरे

4.7

 

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

adda247

 

Sharing is caring!