Marathi govt jobs   »   Study Materials   »   मूलभूत हक्क,मूलभूत कर्तव्ये व मार्गदर्शक तत्वे

मूलभूत हक्क,मूलभूत कर्तव्ये व मार्गदर्शक तत्वे | Food Supply Inspector Exam : Last Minute Revision

मूलभूत हक्क

List of Fundamental Rights (Mulbhut Adhikar) Of Indian Citizens: भारतातील प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत हक्कांची (Fundamental Rights) संपूर्ण यादी येथे आहे.

 1. समानतेचा अधिकार (कलम 14 ते 18) 
 2. स्वातंत्र्याचा अधिकार (कलम- 19 ते 22) 
 3. शोषणाविरुद्धचा अधिकार (कलम- 23 आणि 24) 
 4. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार (कलम- 25 ते 28) 
 5. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क (कलम 29 आणि 30) 
 6. घटनात्मक उपायांचा अधिकार (कलम 32)
भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क (Fundamental Rights-Mulbhut Adhikar)
अ. क्र. मूलभूत अधिकार (Mulbhut Adhikar) संविधानाचे कलम 
1 समानतेचा अधिकार (कलम- 14 ते 18) Right To Equality
(Article- 14 to 18)
कलम 14- कायद्यासमोर समानता
कलम 15- धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर भेदभावाचा निषेध
कलम 16- सार्वजनिक रोजगारातील संधीची समानता
कलम 17- अस्पृश्यता निर्मूलन
कलम 18- शीर्षकांचे निर्मूलन
2 स्वातंत्र्याचा अधिकार (कलम- 19 ते 22) Right To Freedom
(Article- 19 to 22)
कलम 19- बोलण्याचे स्वातंत्र्य, अभिव्यक्ती, चळवळ
कलम 20- गुन्ह्यांसाठी दोषी ठरण्यापासून संरक्षण
कलम 21- जीवनाचा हक्क आणि वैयक्तिक स्वातंत्र्य
कलम 22- अटक किंवा ताब्यात घेण्यापासून संरक्षण
3 शोषणाविरुद्धचा अधिकार (कलम- 23 आणि 24) Right Against Exploitation
(Article- 23 & 24)
कलम 23- तस्करी आणि जबरदस्ती काम लावण्यापासून/करून घेण्यापासून संरक्षण ,
कलम 24- बालमजुरीवर बंदी
4 धर्मस्वातंत्र्याचा अधिकार (कलम- 25 ते 28) Right To Freedom of Religion (Article- 25 to 28) कलम 25- एखाद्याच्या स्वतःच्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य
कलम 26- धार्मिक गोष्टी व्यवस्थापित करण्याचे स्वातंत्र्य
कलम 27- धर्माच्या प्रचारासाठी कर आकारणी नाही
कलम 28- संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासनेला उपस्थित राहण्यासाठी स्वातंत्र्य
5 सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क (कलम 29 आणि 30) Cultural & Educational Rights (Article 29 & 30) कलम 29- अल्पसंख्याकांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी
कलम 30 – अल्पसंख्यांकांचा शैक्षणिक संस्था चालविण्याचा हक्क
6 घटनात्मक उपायांचा अधिकार (कलम 32) Right To Constitutional Remedies (Article 32) कलम 32- हक्कांच्या अंमलबजावणीसाठी उपाय

मूलभूत कर्तव्यांची यादी

कलम 51A मध्ये दिल्याप्रमाणे नागरिकांची मूलभूत कर्तव्ये पुढीलप्रमाणे आहेत:

 1. घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.
 2. ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली. त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्याचे अनुसरण करणे.
 3. भारताचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे.
 4. देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे.
 5. धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलिकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे.
 6. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशांचे मोल जाणून तो जतन करणे.
 7. वने, सरोवरे, नद्या व वन्य जीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त सुधारणा करणे, आणि प्राणिमात्रांबद्दल दया-बुद्धी बाळगणे.
 8. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे.
 9. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे.
 10. राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी (en-devour and achievements) यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक कार्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे.
 11. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या अपत्यास अथवा पाल्यास, त्याच्या वयाच्या सहाव्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. (हे मूलभूत कर्तव्य 86 व्या घटनादुरूस्ती, 2002 ने समाविष्ट केले.)

मार्गदर्शक तत्वे : कलमांची यादी

Directive Principles of State Policy (DPSPs)- List of Articles: मार्गदर्शक तत्वे (DPSPs) पुढीलप्रमाणे :

 • कलम 36व्याख्या (Definition): कलमानुसार, ‘राज्यसंस्था’ या शब्दोल्लेखाची व्याख्या भाग तीन मधील कलम 12 मध्ये दिलेल्या व्याख्येप्रमाणेच असेल.
 • कलम 37या भागात असलेली तत्वे लागू करणे. 
 • कलम 38राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे. 
 • कलम 39Aसमान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. 
 • कलम 40- ग्रामपंचायतींचे संघटन
 • कलम 41- कामाचा, शिक्षणाचा व विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा अधिकार. 
 • कलम 42- कामाची न्याय्य व मानवीय स्थिती व प्रसूती सहाय्य यांसाठी तरतूद. 
 • कलम 43- कामगारांना निर्वाह वेतन.
 • कलम 43A- उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. 
 • कलम 44- नागरिकांना एकरूप नागरी संहिता. 
 • कलम 45- सहा वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद. 
 • कमल 46-नुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन. 
 • कलम 47- पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य. 
 • कलम 48- कृषि व पशूसंवर्धन यांचे संघटन. 
 • कलम 48A –र्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि वने व वन्यजीवांचे रक्षण करणे. 
 • कलम 49- राष्ट्रीय महत्वाची स्मारके व स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण.
 • कलम 50- न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे.
 • कलम 51- आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन. 

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा-महापॅक
महाराष्ट्राचा-महापॅक

Sharing is caring!

FAQs

Where can I find information on political science?

Information on the topic of political science can be found on Adda247 Marathi's amp and website.

Which Article is used for fundamental rights?

Section 12-35 is used for fundamental rights.