Marathi govt jobs   »   FM Sitharaman’s announces relief package worth...

FM Sitharaman’s announces relief package worth Rs 6,28,993 crore against COVID-19 I वित्तमंत्री सीतारमण यांनी रु.6,28,993 कोटी रुपयांचे कोव्हीड-19 राहत पॅकेज जाहीर केले

FM Sitharaman's announces relief package worth Rs 6,28,993 crore against COVID-19 I वित्तमंत्री सीतारमण यांनी रु.6,28,993 कोटी रुपयांचे कोव्हीड-19 राहत पॅकेज जाहीर केले_2.1

 

वित्तमंत्री सीतारमण यांनी रु.6,28,993 कोटी रुपयांचे कोव्हीड-19 राहत पॅकेज जाहीर केले

कोव्हीड-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे पिडीत लोकांना आणि व्यवसायांना उभारी देण्यासाठी केंद्रीय वित्त व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री, निर्मला सीतारमण यांनी एकूण रु.6,28,993 कोटी रुपयांच्या 17 उपाययोजना जाहीर केल्या आहेत. ते महामारीपासून आर्थिक दिलासा(8), सार्वजनिक आरोग्य बळकटीकरण(1), वाढ आणि रोजगारासाठी प्रोत्साहन(8) अशा गटांत विभागता येतील.

महामारीपासून आर्थिक दिलासा: 

1.कोव्हिड बाधित क्षेत्रांसाठी 1.10 लाख कोटी रुपयांची कर्ज हमी योजनाः

आरोग्य क्षेत्राला- 50000 कोटी

पर्यटन आणि इतर क्षेत्राला – 60000 करोड

2. आपत्कालीन क्रेडिट लाइन गॅरंटी योजनेसाठी (ईसीएलजीएस) अतिरिक्त 1.5 लाख कोटी रुपये

3. सूक्ष्म वित्तीय संस्थांसाठी कर्ज हमी योजना (नवीन)

जास्तीतजास्त 1.25 लाखांपर्यंत बँकांच्या किमान कर्ज दरापेक्षा (एमसीएलआर) 2% अधिक व्याजदराने कर्ज

4. पर्यटक मार्गदर्शक आणि भागधारकांसाठी योजना:

  • या योजनेत पर्यटन मंत्रालय आणि राज्य सरकारांनी मान्यता दिलेल्या 10700 गाईड्स चा आणि पर्यटन मंत्रालयाने मान्यता दिलेल्या सुमारे 1 000 ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम स्टेकहोल्डर्स (टीटीएस) चा समावेश आहे.
  • प्रत्येक टीटीएस 10 लाखांपर्यंत आणि प्रत्येक गाईड 1 लाखापर्यंत कर्ज उभारू शकतो

5. 500000 पर्यटकांना मोफत एक महिन्याचा पर्यटन व्हिसा

  • या योजनेसाठी 100 करोड रुपये देण्यात आले आहेत
  • ही योजना 31 मार्च 2022 पर्यंत किंवा 5 लाख पर्यटन व्हिसा जारी होईपर्यंत (जे आधी होईल ते) सुरु राहील.

6. आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा विस्तार (एएनबीआयवाय)

या योजनेंतर्गत नोंदणीची तारीख 31 मार्च 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

7. डीएपी आणि पी अँड के खतांना अतिरिक्त अनुदान

वित्तीय वर्ष 2021-22 मध्ये पोषण आधारित अनुदान (एनबीएस) 42,275 कोटी रुपयांपर्यंत वाढविले.

8. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत (पीएमजीकेवाय) मे 2021 ते नोव्हेंबर 2021 पर्यंत मोफत धान्य वाटप

या योजनेचा अंदाजे खर्च रु. 93,869 कोटी असेल.

सार्वजनिक आरोग्य बळकटीकरण:

वित्तीय वर्ष 2021-22 सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला आणि त्यातही बालकांचे आरोग्य आणि बाल आतोग्य सुविधा यावर भर देण्यासाठी 23,220 कोटी रुपयांची योजना

आर्थिक वाढ आणि रोजगारासाठी प्रोत्साहन:

1. हवामानबदलचा मुकाबला करू शकणाऱ्या नवीन प्रजातींचा वापर वाढविणे

2. पूर्वोत्तर प्रादेशिक कृषी विपणन महामंडळ (नेरमॅक) चे पुनरुज्जीवन

3. नॅशनल एक्सपोर्ट इन्शुरन्स अकाउंट (एनईआयए) च्या माध्यमातून 5 वर्षांत निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अतिरीक्त 33000 कोटी रुपयांची तरतूद

4. एक्स्पोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (ईसीजीसी) मध्ये पाच वर्षांच्या कालावधीत निर्यात विमा संरक्षण क्षेत्राला इक्विटीद्वारे 88,000 कोटी रुपयांची गुंतवणूक

5. डिजिटल इंडिया:भारतनेट पीपीपी मॉडेलच्या माध्यमातून प्रत्येक गावात ब्रॉडबँड सुविधा पोहोचविण्यासाठी रु.19,041 कोटी निधी.

6. मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगसाठी पीएलआय योजनेचा कालावधी एका वर्षाने वाढवून 2025-26 पर्यंत केला.

7. रिफॉर्म-बेस्ड रिझल्ट-लिंक्ड पॉवर डिस्ट्रीब्यूशन योजनेसाठी 3.03 लाख कोटी रुपये

8. पीपीपी प्रकल्प आणि मालमत्ता विक्रीसाठी नवीन सुव्यवस्थित प्रक्रिया.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

 

 

 

Sharing is caring!