Table of Contents
प्रसिद्ध गणितज्ञ एम एस नरसिम्हन यांचे निधन
प्रख्यात भारतीय गणितज्ञ, प्रोफेसर एम एस नरसिम्हन यांचे निधन झाले आहे. एस. शेषाद्री यांच्यासह प्राध्यापक नरसिम्हन, नरसिंहन – शेषाद्रि प्रमेय याच्या स्पष्टीकरणा साठी ओळखले जात. विज्ञान क्षेत्रात किंग फैसल आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे ते एकमेव भारतीय आहेत. त्यांनी चेन्नईच्या लोयोला महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली होती आणि नरसिम्हन यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई विद्यापीठातून पीएचडी केली होती.