डॉ. ताहिरा कुतुबुद्दीन, अरब विश्व नोबेल पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय
मुंबईचा जन्म, शिकागो विद्यापीठात अरबी साहित्याचे प्राध्यापक, डॉ. ताहिरा कुतुबुद्दीन या नुकताच जाहीर झालेला 15 वा शेख झायेद पुस्तक पुरस्कार जिंकणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत. हा पुरस्कार अरब जगाचा नोबेल पुरस्कार मानला जातो. 2019 मध्ये लीडनच्या ब्रिल अकॅडमिक प्रकाशकांनी प्रकाशित केलेल्या “अरबी ओरेशन – आर्ट अँड फंक्शन” या त्यांच्या नवीनतम पुस्तकासाठी त्यांनी हा पुरस्कार जिंकला.
महाराष्ट्र राज्य विविध परीक्षा साहित्य
पुस्तकात त्यांनी अरबी साहित्यातील इ. स. सातव्या आणि आठव्या शतकाच्या सुरुवातीच्या मौखिक काळातील एक व्यापक सिद्धांत मांडला आहे. त्या आधुनिक काळातल्या प्रवचनांवर आणि व्याख्यानांवरही त्याच्या प्रभावाविषयी चर्चा करतात.