Marathi govt jobs   »   DPIIT sets up 9-member panel to...

DPIIT sets up 9-member panel to curb Digital Monopolies I डिजिटल मक्तेदारी रोखण्यासाठी डीपीआयआयटीने 9 सदस्यीय गटाची स्थापना केली आहे

DPIIT sets up 9-member panel to curb Digital Monopolies I डिजिटल मक्तेदारी रोखण्यासाठी डीपीआयआयटीने 9 सदस्यीय गटाची स्थापना केली आहे_2.1

 

डिजिटल मक्तेदारी रोखण्यासाठी डीपीआयआयटीने 9 सदस्यीय गटाची स्थापना केली आहे

डिजिटल मक्तेदारी रोखण्याच्या उद्देशाने ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) {डिजिटल व्यापाराकरिता मुक्त जाळे} च्या विकासासाठी केंद्र सरकारने नऊ-सदस्यीय गटाची स्थापना केली आहे. हा ओएनडीसी प्रकल्प वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग (डीपीआयआयटी) ने सुरू केला असून त्याची अंमलबजावणी भारतीय गुणवत्ता परिषद (क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया) करणार आहे. ही समिती भारत सरकारला संपूर्ण मूल्य साखळीचे डिजिटलायझेशन करणे, सर्व प्रक्रिया प्रमाणित करणे, पुरवठादारांच्या समावेशास प्रोत्साहन देणे, पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढविणे इत्यादी गोष्टींवर सल्ले देणार आहे.

समितीचे सदस्य: 

  1. नंदन निलेकणी: अ-कार्यकारी अध्यक्ष इन्फोसिस
  2. आरएस शर्मा: राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी
  3. आदिल जैनुलभाई: क्यूसीआयचे अध्यक्ष
  4. अवानाली बन्सल: अवाना कॅपिटलचे संस्थापक आणि अध्यक्ष
  5. अरविंद गुप्ता: डिजिटल इंडिया फाऊंडेशनचे सह-संस्थापक आणि प्रमुख
  6. दिलीप असबे: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
  7. सुरेश सेठी: एनएसडीएल ई-गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
  8. प्रवीण खंडेलवाल: अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे सरचिटणीस
  9. कुमार राजगोपालन: रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!