Marathi govt jobs   »   जिल्हा न्यायालय भरती 2023   »   जिल्हा न्यायालय भरती 2023 शिपाई/हमाल पदासाठी...

जिल्हा न्यायालय भरती 2023, शिपाई/हमाल पदासाठी अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप

जिल्हा न्यायालय भरती 2023 शिपाई/हमाल पदासाठी अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप

जिल्हा न्यायालय भरती 2023 शिपाई/हमाल पदासाठी अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप: जिल्हा न्यायालय भरती अंतर्गत शिपाई/हमाल पदाच्या 1266 जागा भरण्यात येणार आहेत. जिल्हा न्यायालय भरती 2023 (Jilha Nyayalay Bharti) तयारी करतांना आपणास जिल्हा न्यायालय भरती 2023 परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण आपल्या अभ्यासाला योग्य दिशा देऊ शकतो. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या संवर्गातील 4629 पदांसाठी जिल्हा न्यायालय भरती 2023 जाहीर (Maharashtra District Court Bharti 2023) झाली आहे. या लेखात आपण जिल्हा न्यायालय भरती 2023 शिपाई/हमाल पदासाठी अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

जिल्हा न्यायालय भरती 2023 शिपाई/हमाल पदासाठी अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप: विहंगावलोकन 

जिल्हा न्यायालय भरती 2023 शिपाई/हमाल पदासाठी अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग मुंबई उच्च न्यायालय 
भरतीचे नाव

जिल्हा न्यायालय भरती 2023

पदांची नावे लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल
अधिकृत संकेतस्थळ www.bombayhighcourt.nic.in

जिल्हा न्यायालय भरती 2023: अधिसुचना 

जिल्हा न्यायालय भरती 2023 (Maharashtra District Court Bharti 2023) अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची तपशीलवार अधिसुचना दिनांक 04 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर पत्र खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

जिल्हा न्यायालय भरती 2023 अधिसुचना PDF

जिल्हा न्यायालय भरती 2023 अधिसुचना PDF( इंग्रजीमध्ये)

जिल्हा न्यायालय भरती 2023 शिपाई/हमाल पदासाठी अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप

जिल्हा न्यायालय भरती 2023 शिपाई/हमाल पदासाठी अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप सविस्तरपणे खाली दिलेले आहे.

चाचणी परीक्षेचे नाव  शिपाई/ हमाल 
गुण
चाळणी परीक्षा 30
इंग्रजी लघुलेखन चाचणी लागू नाही
मराठी लघुलेखन चाचणी लागू नाही
इंग्रजी टंकलेखन चाचणी लागू नाही
इंग्रजी टंकलेखन चाचणी लागू नाही
स्वच्छता आणि चापल्यता चाचणी 10
मुलाखत 10
एकूण गुण  50

शिपाई/हमाल अभ्यासक्रम

  • इतिहास
  • नागरिकशास्त्र
  • विज्ञान
  • क्रीडा
  • भूगोल
  • साहित्य
  • व्याकरण
  • चालू घडामोडी

शिपाई/हमाल पदाच्या चाळणी परीक्षेचे स्वरूप

अ.क्र. पदाचे नाव  एकूण गुण  प्रश्नांची संख्या 
1. शिपाई/हमाल 30 30

पदानुसार परीक्षेचा तपशील

खाली पदानुसार जिल्हा न्यायालय भरती 2023 परीक्षेचा तपशील देण्यात आला आहे.

शिपाई/हमाल 

  1. चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळविल्यानंतर, काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे, जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या पदाच्या सातपट उमेदवारांना स्वच्छता आणि चापल्यता चाचणीसाठी बोलावले जाईल. 1:7 गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवाराने मिळविलेल्या गुणांइतकेच गुण मिळविणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना स्वच्छता आणि चापल्यता चाचणीसाठी बोलावले जाईल.
  2. जे उमेदवार स्वच्छता आणि चापल्यता चाचणीमध्ये किमान गुण मिळवतील त्यांना मुलाखतीसाठी पात्र धरले जाईल.
  3. प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर, जे पात्र उमेदवार असतील त्यांची यादी ही संबंधित जिल्हा न्यायालयाच्या सूचना फलकावर आणि संबंधित जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाईल.
  4. चाळणी परीक्षा आणि स्वच्छता आणि चापल्यता चाचणीमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे, काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे, जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या पदांच्या संख्येच्या 3 पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. 1:3 हे गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवाराने मिळवलेल्या गुणांइतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
शिपाई/ हमाल टेस्ट सिरीज
शिपाई/ हमाल टेस्ट सिरीज

प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निकष :

लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/ हमाल च्या पदानुसार चाळणी परीक्षा, लघुलेखन चाचणी, टंकलेखन चाचणी, स्वच्छता आणि चापल्यता चाचणी आणि मुलाखतीसाठी सामान्य प्रवर्गासाठी 35% गुण असतील आणि शासनाने निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग किंवा विशेष मागास वर्गातील उमेदवारांना त्यामध्ये 5% गुणांची सूट दिली जाईल.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

जिल्हा न्यायालय आणि बॉम्बे उच्च न्यायालय 2023 भरती बॅच 
Mission संहिता लाइव्ह बॅच

Sharing is caring!

FAQs

जिल्हा न्यायालय भरती 2023 शिपाई/हमाल पदासाठी अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप बद्दल माहिती मला कोठे मिळेल?

जिल्हा न्यायालय भरती 2023 शिपाई/हमाल पदासाठी अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप बद्दल माहिती या लेखात दिली आहे.

जिल्हा न्यायालय भरती 2023 शिपाई/हमाल पदासाठी किती जागा आहेत?

जिल्हा न्यायालय भरती 2023 शिपाई/हमाल पदासाठी 1266 जागा आहेत.

जिल्हा न्यायालय भरती 2023 शिपाई/हमाल पदासाठी परीक्षा किती गुणांची आहे?

जिल्हा न्यायालय भरती 2023 शिपाई/हमाल पदासाठी परीक्षा 50 गुणांची आहे.