Marathi govt jobs   »   जिल्हा न्यायालय भरती 2023   »   जिल्हा न्यायालय परीक्षा विश्लेषण 2024

जिल्हा न्यायालय परीक्षा विश्लेषण 2024, शिफ्ट 1, 14 फेब्रुवारी 2024

जिल्हा न्यायालय परीक्षा विश्लेषण 2024

जिल्हा न्यायालय परीक्षा विश्लेषण 2024: जिल्हा न्यायालय 2023 भरती अंतर्गत दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी पहिल्या शिफ्टमध्ये शिपाई/हमाल पदासाठी परीक्षा यशस्वीरीत्या घेण्यात आली आहे. शिफ्ट 1 ची परीक्षा आता संपली असल्यामुळे या परीक्षेचे सविस्तर विश्लेषण आपणास या लेखात उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवाराच्या प्रतिसादानुसार शिपाई/हमाल पदाची परीक्षा मध्यम स्वरुपाची होती. या लेखात 14 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या पहिल्या शिफ्टचे जिल्हा न्यायालय परीक्षा विश्लेषण 2024 देण्यात आले आहे. ज्यात विषयवार गुड अटेंम्ट (चांगले प्रयत्न), एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती दिली आहे.

जिल्हा न्यायालय परीक्षा विश्लेषण 2024: विहंगावलोकन

जिल्हा न्यायालय परीक्षेची काठीण्य पातळी, परीक्षेत कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते याबद्दल माहिती या लेखात देण्यात आली आहे. जिल्हा न्यायालय परीक्षा विश्लेषण 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

जिल्हा न्यायालय परीक्षा विश्लेषण 2024: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षा विश्लेषण
विभाग मुंबई उच्च न्यायालय
भरतीचे नाव जिल्हा न्यायालय भरती 2023
पदाचे नाव शिपाई/हमाल
लेखाचे नाव जिल्हा न्यायालय परीक्षा विश्लेषण 2024
जिल्हा न्यायालय परीक्षा विश्लेषण 2024 शिफ्ट 1, 14 फेब्रुवारी 2024
एकूण गुण 30

जिल्हा न्यायालय परीक्षेचे स्वरूप

जिल्हा न्यायालय भरती 2023 अंतर्गत शिपाई/हमाल पदाची परीक्षा एकूण 30 गुणांची घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान या विषयावर 30 प्रश्न विचारण्यात आले होते.

अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण
1 मराठी भाषा 05 05
2 इंग्रजी भाषा 05 05
3 सामान्य ज्ञान 20 20
एकूण 30 30

जिल्हा न्यायालय परीक्षा विश्लेषण 2024: गुड अटेंम्ट (शिफ्ट 1)

जिल्हा न्यायालय भरती 2023 अंतर्गत शिपाई/हमाल पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. गुड अटेंम्ट म्हणजे अश्या प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण आपला कट ऑफ क्लिअर करू शकाल. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.

अ. क्र विषय गुड अटेंम्ट काठीण्य पातळी
1 मराठी भाषा 04-05 सोपी
2 इंग्रजी भाषा 04-05 सोपी
3 सामान्य ज्ञान 16-17 कठीण
एकूण 24-27 मध्यम

विषयानुरूप जिल्हा न्यायालय परीक्षा विश्लेषण 2024 (शिफ्ट 1)

जिल्हा न्यायालय भरती 2023 अंतर्गत शिपाई/हमाल मधील पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान या विषयावर 30 प्रश्न विचारण्यात आले होते. खाली आम्ही विषयानुसार विश्लेषण प्रदान केले आहे.

मराठी विषयाचे विश्लेषण

जिल्हा न्यायालय भरती 2023 अंतर्गत शिपाई/हमाल मधील पदाच्या परीक्षेत मराठी विषयावर एकूण 05 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने वाक्याचे प्रकार, समानार्थी शब्द इत्यादी टॉपिकस वर प्रश्न विचारण्यात आले होते.

  • वाक्याचे प्रकार
  • समानार्थी शब्द
  • प्रयोग
  • विरुद्धार्थी शब्द

इंग्रजी विषयाचे विश्लेषण

जिल्हा न्यायालय भरती 2023 अंतर्गत शिपाई/हमाल मधील पदाच्या परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात punctuation, tense इत्यादी टॉपिकस वर प्रश्न विचारण्यात आले होते.

  • Punctuation
  • Tense
  • Verb
  • Fill in the blanks.

सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण

जिल्हा न्यायालय भरती 2023 अंतर्गत शिपाई/हमाल मधील पदाच्या परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 20 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने चालू घडामोडी वर प्रश्न, इतिहास, भूगोल, स्टॅटिक जी.के. यावर प्रश्न विचारण्यात आले होते.
परीक्षेत आलेले काही प्रश्न:-
  1. सर्वात जुना वेद कोणता?
  2. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो?
  3. पोलो खेळामध्ये किती खेळाडू असतात?
  4. राष्ट्रीय बास्केटबॉल संघाची स्थापना कधी झाली?
  5. घनकचरा
  6. विधवा आश्रमाची स्थापना?

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

जिल्हा न्यायालय परीक्षा कधी होणार आहे?

जिल्हा न्यायालय परीक्षा 05 ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत होणार आहे.

मी जिल्हा न्यायालय परीक्षा विश्लेषण 2024 कोठे तपासू शकतो?

जिल्हा न्यायालय परीक्षा विश्लेषण 2024 सविस्तर स्वरुपात या लेखात देण्यात आले आहे.

जिल्हा न्यायालय परीक्षेची काठीण्य पातळी कशी होती?

जिल्हा न्यायालय परीक्षेची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती.