Table of Contents
ढग व ढगांचे प्रकार
ढग हे पृथ्वीच्या वातावरणाचे एक आकर्षक आणि सदैव उपस्थित असलेले वैशिष्ट्य आहे. ते लहान पाण्याचे थेंब किंवा हवेत लटकलेल्या बर्फाच्या स्फटिकांनी बनलेले असतात आणि ते आपले हवामान, हवामान आणि एकूण वातावरणीय परिस्थितीला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ढगांचे निरीक्षण केल्याने येऊ घातलेल्या हवामानातील बदल आणि वातावरणातील गतिशीलता याविषयी अंतर्दृष्टी मिळू शकते. ढग विविध प्रकारात येतात, प्रत्येकामध्ये त्यांची निर्मिती, स्वरूप आणि प्रभाव प्रतिबिंबित करणारी वेगळी वैशिष्ट्ये असतात. या लेखात ढग कसे तयार होतात तसेच ढग व ढगांचे प्रकारांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
सांद्रीभवन आणि घनीभवन म्हणजे काय?
- वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरुपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन म्हटले जाते. तसेच वातावरणातील बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला घनीभवन म्हटले जाते.
- हवेची सापेक्ष आर्द्रता 100% झाल्यावर बाष्पाचे सांद्रीभवन होऊ लागते. त्यावेळी हवा दवबिंदू तापमान पातळीला असणे आवश्यक असते. सांद्रीभवनसाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या बाबी आवश्यक असतात.
- दव, दहिवर, धुके ही जमिनीलगत, तर ढग हे जमिनीपासून उंचावर आढळणारी सांद्रीभवनाची रूपे आहेत.
ढग व ढगांचे प्रकार
ढग व ढगांचे प्रकार: ढग हा वातावणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचा प्रकार आहे. सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण, हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजन विरहित अवस्थेत असतात. त्यामुळे ढग हवेत तरंगत राहतात (उर्ध्वगामी प्रवाहामुळे). दवबिंदू तापमान पातळीदेखील उंची व बाष्प यांच्या प्रमाणावर ठरते.
ढगांमध्ये बाष्पीभवनाची व सांद्रीभवनाची क्रिया एकापाठोपाठ घडत असते. बाष्पाचे प्रमाण जमिनीलगत अधिक असते. समुद्रसपाटीपासून उंचीनुसार बाष्पाचे प्रमाण कमी होत जाते यामुळे कमी उंचीवरील ढग आकाराने मोठे असतात, तर जास्त उंचीवरील ढग आकाराने लहान असतात.
ढगांचे प्रकार
ढगांचे निरीक्षण केल्यावर उंचीनुसार त्यांचे तीन मुख्य प्रकार करता येतात.
1) अतिउंचीवरील ढग : ढगांची उंची सुमारे 7000 ते 14000 मी. दरम्यान
2) मध्यम उंचीचे ढग: उंची सुमारे 2000 ते 7000 मी. दरम्यान.
3) कमी उंचीचे ढग : 2000 मी. पेक्षा कमी उंची.
1) जास्त उंचीवरील ढग :
हे ढग मुख्यतः हिमस्फटिकांचे बनलेले असतात. यांचे वर्गीकरण सिरस (Cirrus), सिरोक्युम्युलस (Cirrocumulus) आणि सिरोस्ट्रेटस (Cirrostratus) या प्रकारामध्ये केले जाते.
- सिरस (Cirrus): हे मुख्यतः तंतुमय असतात.
- सिरोक्युम्युलस (Cirrocumulus): या ढगांचे स्वरूप लहान लहान लाटांच्या समुदायांसारखे दिसते.
- सिरोस्ट्रेटस (Cirrostratus): हे वळ्या पडलेल्या चादरीसारखे दिसतात. – यांच्याभोवती बरेचदा तेजोमंडल असते.
2) मध्यम उंचीवरील ढग :
यात अल्टोक्युम्युलस (Altocumulus) व अल्टोस्ट्रेटस (Altostratus) या ढगांचा समावेश होतो.
- अल्टोक्युम्युलस (Altocumulus): हे स्तरांच्या स्वरुपात असून तरंगासारखी रचना असते, बहुधा हे पांढऱ्या रंगाचे असून त्यात करड्या रंगाच्या छटा असतात.
- अल्टोस्ट्रेटस (Altostratus): यात कमी जाडीचे थर असतात. यातून सूर्यदर्शन होऊ शकते, मात्र सूर्यदर्शन हे दुधी काचेतून पाहिल्यासारखे दिसते.
3) कमी उंचीवरील ढग :
यात पाच वेगवेगळे प्रकार केले जातात.
- स्टॅटोक्युम्युलस (Stratocumulus): त्यांचा रंग पांढरा ते धुरकट असतो. यात ढगांचे अनेक गोलाकार पुंजके असतात.
- स्ट्रेटस् (Stratus): या ढगात देखील थर असतात. यांचा रंग राखाडी असतो व तळाकडील भाग एकसमान असतो.
- निम्बोस्ट्रेटस (Nimbostratus): गडद राखाडी रंगाचे असून यापासून रिमझिम पाऊस तसेच हिमवर्षाव होऊ शकतो. हे ढग जाड थरांचे असतात
- क्युम्युलस ढग (Cumulus): – भूपृष्ठापासून 500 ते 6000 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे हे ढग आहेत. घुमटाकार व अवाढव्य असतात. हे ढग आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात. या ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढलो की त्यांचे क्युम्युलोनिम्बस ढगांमध्ये रुपांतर होते.
- क्युम्युलोनिम्बस ढग (Cumulonimbus): हे ढग वादळाचे निदर्शक आहेत. हे ढग काळ्या रंगाचे व घनदाट असून ते पर्वतकाय दिसतात. या ढगात गडगडाट होतो, तसेच विजाही चमकतात. वादळी पावसांसह कधीकधी गारपीटही होते, पण हा पाऊस फार काळ टिकत नाही. इतर ढगांपेक्षा या ढगातून पडणारे पावसाचे थेंब मोठे असतात. जेव्हा ढगातील हवा फार थंड असते, तेव्हा हे थेंब गोठतात व गारा स्वरुपात जमिनीवर येतात.
ढगांचे प्रकार |
साधारण उंची (मी.) |
सिरस (Cirrus) सिरोस्ट्रॅंटस (Cirro-Stratus) सिरोक्युम्युलस (Cirro-cumulus) |
7000 ते 14000 |
अल्टो स्ट्रॅटस (Alto-stratus)
अल्टो क्युमुलस (Alto-Cumulus) |
2000 ते 7000 |
स्ट्रॅटोक्युमुलस (Strato-cumulus) स्ट्रॅटस् (Strutus) निम्बोस्ट्रॅटस (Nimbostratus) |
2000 पेक्षा कमी |
क्युम्युलस (Cumulus) क्युम्युलोनिम्बस (Cumulonimbus) |
विस्तार कमी जास्त असतो |
ढग व ढगांचे प्रकार: नमुना प्रश्न
प्रश्न 1. खालील पैकी कोणते ढग अति उंचीवरील ढगांच्या प्रकारात येत नाहीत?
(a) सिरस
(b) अल्टो स्ट्रॅटस
(c) सिरोस्ट्रॅंटस
(d) सिरोक्युम्युलस
उत्तर (b)
प्रश्न 2. अल्टो क्युमुलस ढग किती उंचीवर आढळतात?
(a) 2000 मी पेक्षा कमी
(b) 14000 मी पेक्षा जास्त
(c) 2000-7000 मी
(d) 7000 – 14000 मी
उत्तर (c)
प्रश्न 3. ________ढग वादळाचे निदर्शक आहेत.
(a) क्युम्युलोनिम्बस
(b) अल्टो स्ट्रॅटस
(c) सिरोस्ट्रॅंटस
(d) सिरोक्युम्युलस
उत्तर (a)