Marathi govt jobs   »   Study Materials   »   Daily Marathi Vocab

Daily Marathi Vocab | 26 March 2024

Daily Marathi Vocab 2024

बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व आहे. भाषा विभागात कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि तुमचा एकूण गुण वाढवण्यासाठी शब्दसंग्रहावर चांगली पकड असणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच Adda247 ने शब्दसंग्रहातील शब्द आणि त्यांच्या अर्थांसह इच्छुकांच्या शब्दसंग्रहात सुधारणा करण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे, ज्याचा आपल्याला आगामी काळातील MPSC स्पर्धा परीक्षा तसेच इतर सरळसेवा परीक्षेत नक्कीच फायदा होईल.

Daily Vocabulary Words 2024 (English)- Click Here

 

1. स्वदेशी (विशेषण)
अर्थ: आपल्याच देशात तयार होणारे

Daily Marathi Vocab | 26 March 2024_3.1

  • समानार्थी शब्द: स्वराष्ट्रीय
  • विरुद्धार्थी शब्द: परदेशी
  • वाक्यात उपयोग: स्वदेशी वस्तूंचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे.
  • विशेषण (व्याख्या): नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात.

2. शाश्वत (नाम) 
अर्थ; कधीही नष्ट न होणारे

Daily Marathi Vocab | 26 March 2024_4.1

  • समानार्थी शब्द: अविनाशी, चिरंतन
  • विरुद्धार्थी शब्द: अल्पायु
  • वाक्यात उपयोग:सूर्याचा पूर्वेकडून उदय होणे हे शाश्वत सत्य आहे.
  • नाम (व्याख्या): विश्वातील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा शब्द म्हणजे नाम होय.

3. लोकशाही
अर्थ; लोकांच्या हितासाठी असलेली शासनपद्धती

Daily Marathi Vocab | 26 March 2024_5.1

  • समानार्थी शब्द: लोकसत्ताक राज्य
  • विरुद्धार्थी शब्द: हुकुमशाही
  • वाक्यात उपयोग: भारत हा लोकशाही प्रधान देश आहे.

मराठी भाषेतील शब्दसंग्रहातील शब्दांचे महत्त्व

  • मराठी भाषेतील 50% प्रश्न ज्या वाचन आकलनावर आधारित आहेत त्यासाठी उमेदवाराकडे चांगले वाचन कौशल्य असणे आवश्यक आहे आणि मराठी शब्दसंग्रह चांगले असणे आवश्यक आहे. चांगल्या शब्दसंग्रहामुळे उमेदवारांना आकलनाची चांगली समज मिळेल ज्याचा त्यांना जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी फायदा होईल.
  • चांगल्या शब्दसंग्रहामुळे उमेदवाराला स्पर्धा परीक्षांच्या मुलाखतीची फेरी गाठण्यास मदत होते. उमेदवाराला उत्तम शब्दसंग्रह असल्यास तो एक वाक्य उत्तम प्रकारे तयार करू शकतो.
  • वाचन आकलन विभागाव्यतिरिक्त, अनेक मराठी चाचण्या आहेत जिथे शब्दसंग्रह वापरला जाऊ शकतो.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुपमहाराष्ट्राचा महापॅकमहाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

दैनिक शब्दसंग्रह शब्द 2024 चा उपयोग तुम्हाला कोणत्या परीक्षेत होईल?

दैनिक शब्दसंग्रह शब्द 2024 चा उपयोग आगामी काळातील MPSC स्पर्धा परीक्षा तसेच इतर सरळसेवा परीक्षेत नक्कीच फायदा होईल.

दैनिक शब्दसंग्रह शब्द 2024 चा उद्देश्य काय आहे?

शब्दसंग्रहातील शब्द आणि त्यांच्या अर्थांसह इच्छुकांच्या शब्दसंग्रहात सुधारणा करणे हा दैनिक शब्दसंग्रह शब्द 2024 चा उद्देश्य आहे.