Table of Contents
दैनिक डोझ: मराठी व्याकरण गुरू : सर्वनाम
सर्वनाम
सर्वनाम: वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणार्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. उदा. तो, तु, मी, आम्ही, आपण इ. मराठीमध्ये एकूण 9 सर्वनामे आहेत जी खाली दिलेली आहेत.
- मी
- तु
- तो/ती/त्या/ते
- जो/जी/ज्या/जे
- हा/ही/ह्या/हे
- कोण
- आपण
- काय
- स्वतः
सर्वनामाचे प्रकार
सर्वनामाचे प्रकार खालीलप्रमाणे आहे.
- पुरुषवाचक सर्वनाम
- दर्शक सर्वनाम
- संबंधी सर्वनाम
- प्रश्नार्थक सर्वनाम
- सामान्य / अनिश्चित सर्वनाम
- आत्मवाचक सर्वनाम
पुरुषवाचक सर्वनाम: पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार पडतात.
- प्रथम पुरुषवाचक : स्वतः चा उल्लेख करणे (मी, आम्ही, आपण)
- द्वितीय पुरुषवाचक : समोरच्या व्यक्तीचा उल्लेख करणे (तू, तुम्ही)
- तृतीय पुरुषवाचक : तिसर्या व्यक्तींचा उल्लेख करणे (तो, ती, ते)
दर्शक सर्वनाम: जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्याकरीता जे सर्वनाम वापरले जाते. त्यास दर्शक सर्वनाम म्हणतात. उदा. हा, ही, हे, तो, ती, ते.
संबंधी सर्वनाम: वाक्यात पुढे येणार्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणार्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. उदा.जो, जी, जे, ज्या
प्रश्नार्थक सर्वनाम: ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्या सर्वनामास प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. उदा. कोण, कुणास, काय, कोणी
सामान्य / अनिश्चित सर्वनाम: कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला, ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहे ते निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनाम म्हणतात. उदा. कोणी कोणास चीडवू नये.
आत्मवाचक सर्वनाम: एकाच वाक्यात आधी आलेल्या नामाचा किंवा सर्वनामाचा पुन्हा उल्लेख करतांना ज्या सर्वनामाचा उपयोग होतो. त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदा. स्वतः, नीज.
आजचा प्रश्नQ.कोणत्या वाक्यात ‘द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम’ वापरले आहे? (a) आपण खाली बसुया. (b) तो म्हणे पास झाला. (c) आम्ही तुला मदत करू (d) आपण खाली बसावे. तुमचे उत्तर कमेंट विभागात शेअर करा. |
मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न-उत्तरे PDF – जून 2024
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
महाराष्ट्र महापॅक