दैनिक चालू घडामोडी: 24 जुलै 2021
Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला 24 जुलै 2021 चे सर्व महत्वाचे Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) पाहुयात.
राष्ट्रीय बातम्या
1. आयआरआयटी-के ने तंत्रज्ञान नवकल्पना केंद्र सुरू केले

- भारतीय तंत्रज्ञान संस्था – कानपूर ने ड्रोन विरोधी तंत्रज्ञान, घुसखोरी शोध यंत्रणा, ब्लॉक-चेन आणि सायबर-भौतिक यंत्रणा यांच्याकरिता सायबरसुरक्षा उपाय शोधण्यासाठी पहिले तंत्रज्ञान नवकल्पना केंद्र सुरू केले आहे.
- आयआयटी कानपूरचे सी 3 आय हब अतिमहत्त्वाच्या पायाभूत सुविधांसह सायबर क्षेत्राच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करेल.
राज्य बातम्या
2. युनेस्को: ग्वाल्हेर, ओरछासाठी ऐतिहासिक शहरी भूदृष्य प्रकल्प

- मध्य प्रदेश राज्यातील, ओरछा आणि ग्वाल्हेर या शहरांची निवड युनेस्कोने 2011 साली सुरु करण्यात आलेल्या “ऐतिहासिक अर्बन लँडस्केप प्रकल्प (ऐतिहासिक शहरी भूदृष्य प्रकल्प)” अंतर्गत केली आहे. या प्रकल्पाची घोषणा सुरुवात राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली.
- वाराणसी आणि अजमेर ही भारतीय शहरे या प्रकल्पात आधीच सहभागी आहेत. ग्वाल्हेर आणि ओरछा दक्षिण आशियातील 7 वी आणि 8 वी शहरे आहेत.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री: शिवराजसिंह चौहान
- मध्य प्रदेशच्या राज्यपाल: आनंदीबेन पटेल
आंतरराष्ट्रीय बातम्या
3. जगातील पहिला थ्रीडी-प्रिंटेड स्टील पूल अॅमस्टरडॅममध्ये उघडण्यात आला

- नेदरलँड्सच्या अॅम्सटरडॅम येथे जगातील पहिला थ्रीडी-प्रिंटेड स्टील पूल लोकांसाठी खुला करण्यात आला.याची निर्मिती एमएक्स 3 डी द्वारे करण्यात आली आहे.
- या पुलाचे उद्घाटन नेदरलँड्सची राणी हर मॅजेस्टी क्वीन मेक्सिमा यांनी केले.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- नेदरलँड्सची राजधानी: आम्सटरडॅम
- नेदरलँड्सचे चलन: युरो
अर्थव्यवस्था बातम्या
4. अन्य बँकांच्या संचालकांना पाच कोटी रुपयांपर्यंतची कर्ज वितरणाची आरबीआयची परवानगी

- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) इतर बँकांचे संचालक आणि संचालकांच्या नातलगांना कर्ज देण्याच्या नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत.
- या सुधारणांनुसार बँकेचे संचालक स्वत:करिता किंवा जोडीदाराव्यतिरिक्त नातेवाईकांकरिता संचालक मंडळाच्या परवानगीशिवाय 5 करोड रुपयांपर्यंतची वैयक्तिक कर्जे मान्य करू शकतात. अशा कर्जासाठी पूर्वीची मर्यादा 25 लाख होती.
- वैयक्तिक कर्ज म्हणजे व्यक्तींना देण्यात आलेली कर्जे आणि ग्राहक पत, शिक्षण कर्ज, घरे यासारख्या स्थावर मालमत्तेची निर्मिती किंवा वर्धित करण्यासाठी दिलेली कर्जे आणि शेअर्स, डिबेंचर इत्यादी आर्थिक मालमत्ता गुंतवणूकीसाठी दिलेली कर्जे.
महत्त्वाचे दिवस
5. 24 जुलै: आयकर दिन

- केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) दरवर्षी 24 जुलै रोजी आयकर दिवस आयोजित करते. याच दिवशी 1880 रोजी सर जेम्स विल्सन यांनी प्रथमच भारतात आयकर लागू केला.
- 2021 मध्ये या घटनेला 161 वर्ष पूर्ण झाली.
- पहिला आयकर दिवस 2010 साली आयोजित करण्यात आला होता.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष: जगन्नाथ विद्याधर महापात्रा
- केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची स्थापनाः 1924
- केंद्रीय प्रत्यक्ष कर मुख्यालय: नवी दिल्ली
संरक्षण बातम्या
6. भारतीय सैन्याची स्कीइंग मोहीम “एआरएमएक्स -21”

- 10 मार्च ते 6 जुलै दरम्यान हिमालय पर्वतरांगामध्ये आयोजित करण्यात आलेल्या भारतीय सैन्याच्या स्कीइंग मोहिम (एआरएमएक्स -21) ची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते सांगता करण्यात आली.
- एआरएमएक्स -21 या मोहिमेची सुरुवात 10 मार्च रोजी लडाखमधील कारा2कोरम येथे झाली आणि या मोहिमेची सांगता 6 जुलै मलारी, उत्तराखंड येथे करण्यात आली.
- ही मोहीम एकूण 119 दिवस चालली आणि एकूण 1660 किमी अंतर पार केले.
अहवाल आणि निर्देशांक बातम्या
7. भारताच्या युनेस्कॅप स्कोअरमध्ये सुधारणा

- यूएन डिजिटल आणि शाश्वत व्यापार सुलभता 2021 च्या जागतिक सर्वेक्षणात भारताने 90.32 टक्क्यांची नोंद केली आहे. 2019 मध्ये भारताची गुणसंख्या 78.49 टक्के होती.
- दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम आशिया प्रदेश (63.12%) आणि आशिया पॅसिफिक प्रदेश (65.85%) च्या तुलनेत भारत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा देश आहे.भारताची एकूण गुणसंख्या ईयूच्या सरासरी गुणांपेक्षा अधिक आहे.
भारताचे 5 मुख्य निर्देशकांचे गुण:
- पारदर्शकता: 2021 मध्ये 100% (2019 मध्ये 93.33%)
- औपचारिकताः 2021 मध्ये 95.83% (2019 मध्ये 87.5%)
- संस्थात्मक व्यवस्था आणि सहकार्य: 2021 मध्ये 88.89% (2019 मध्ये 66.67%)
- डिजिटल व्यापारः 2021 मध्ये 96.3% (2019 मध्ये 81.48%)
- आंतरराष्ट्रीय डिजिटल व्यापारः 2021 मध्ये 66.67% (2019 मध्ये 55.56%)
सर्वेक्षणाविषयी:
- 2015 पासून संयुक्त राष्ट्रांचा एशिया पॅसिफिक करिता आर्थिक आणि सामाजिक आयोग (यूएनईएससीएपी) द्वारे हे सर्वेक्षण दर दोन वर्षांनी घेतले जाते. जे देशांना आंतरराष्ट्रीय व्यापाराची वेळ आणि किंमत कमी करण्यास तसेच व्यवसायांना त्यांच्या गुंतवणूकीच्या निर्णयामध्ये मदत करण्यासाठी सहाय्य करते.
- सर्वेक्षणात डब्ल्यूटीओच्या व्यापार सुलभता कराराद्वारे व्यापलेल्या 58 व्यापार सुलभता उपायांच्याआधारे 143 देशांचे मूल्यांकन केले गेले आहे.
नियुक्ती बातम्या
8. रश्मी आर दास यांची यूएन कर समितीवर नेमणूक

- अर्थ मंत्रालयाच्या सहसचिव रश्मी रंजन दास यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या कर समितीमध्ये 2021 ते 2025 या कालावधी करिता सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- युए आंतरराष्ट्रीय सहकारासाठी तज्ञ समिती या नावाने ओळखली जाणारी ही समिती सदस्य राष्ट्रांना डिजिटल अर्थव्यवस्था, व्यापाराचे जागतिकीकरण, गुंतवणूक आणि सतत ढासळते पर्यावरण या पार्श्वभूमीवर कर धोरण आखण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी सहाय्य करते.
- ही समिती देशांना अनेकविध करआकारणी करण्यापासून रोखण्यासाठी, त्यांचे कर आधार विस्तृत करण्यासाठी, त्यांचे कर प्रशासनास बळकट करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय कर चुकवेगिरी रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना मदत करते.
निधन बातम्या
9. भारताच्या सर्वात वयोवृद्ध विद्यार्थीनी भगीरथी अम्मा यांचे निधन

- वयाच्या 105 व्या वर्षी अनौपचारिक शिक्षणास सुरुवात करून ते पूर्ण करणाऱ्या भारतातील सर्वात वयोवृद्ध विद्यार्थिनी 107 वर्षीय भगीरथी अम्मा यांचे निधन झाले आहे. त्या कोल्लम,केरळ येथील रहिवासी होत्या.
- अम्मा यांनी वयाच्या 9 व्या वर्षी तिसरीत असतांना औपचारिक शिक्षण सोडले होते. केंद्र सरकारने त्यांच्या या कामगिरी साठी त्यांना नारी शक्ती पुरस्कार देऊन गौरविले होते.
क्रीडा बातम्या
10. मीराबाई चानू यांना भारोत्तलनात रौप्य पदक

- भारोत्तलनपटू मीराबाई चानू हिने टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेत 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावून टोकियो ऑलिम्पिक मध्ये पदक मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय खेळाडू ठरल्या आहेत.
- या स्पर्धेत चीनच्या झिहुई हौने सुवर्णपदक जिंकले तर इंडोनेशियाच्या कान्टिका ऐसाने कांस्यपदक जिंकले.
- कर्णम मल्लेश्वरी नंतर ऑलिम्पिक पदक जिंकणारी चानू केवळ दुसरी भारतीय आहे.
- क्लीन अँड जर्क प्रकारात 115 किलो वजन उचलून मिराबाई चानू यांनी नवीन ऑलिम्पिक विक्रम नोंदविला आहे.
11. अदानी समूह टोकियो ऑलिम्पिकचे प्रायोजक

- सुरू असलेल्या टोकियो ऑलिम्पिक खेळांसाठी भारतीय ऑलिम्पिक चमूचे प्रायोजक म्हणून भारतीय ऑलिम्पिक संघटनेने अदानी समूहाची निवड केली आहे.
- आयओएचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी या निर्णयाची माहिती दिली.
- आयओएने यापूर्वी अमूल, एमपीएल स्पोर्ट्स फाऊंडेशन, जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स यासह विविध खाजगी संस्थांशी प्रायोजित करार केले आहेत.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष: नारायण रामचंद्रन
- भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची स्थापनाः 1927
12. नंगंगॉम बाला देवी: एआयएफएफ वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला फुटबॉलपटू

- भारताच्या राष्ट्रीय संघातील आघाडीच्या फळीतील खेळाडू नंगंगॉम बाला देवी हिची अखिल भारतीय फुटबॉल महासंघातर्फे 2020-21 साठी वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला फुटबॉलपटू म्हणून निवड करण्यात आली आहे.
- बाला सध्या स्कॉटलंडमधील रेंजर एफसीकडून खेळत असून युरोपमधील क्लबसह व्यावसायिक करारावर स्वाक्षरी करणारी ती पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू आहे.
विविध बातम्या
13. मॅक्स बुपा हेल्थ विमाचे आता निवा बूपा

- आरोग्य विमा कंपनी मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्सने स्वत:चे नामकरण आता ‘निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स’ असे केले आहे.
- कंपनीच्या प्रवर्तक मॅक्स इंडियाने आपले 51% भागभांडवल ट्रू नॉर्थ या कंपनीला 2019 मध्ये 510 करोड रुपयांना विकले.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्सचे सीईओ: कृष्णन रामचंद्रन
- मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स मुख्यालय: नवी दिल्ली, भारत
- मॅक्स बुपा आरोग्य विमा स्थापना: 2008
Daily current affairs in Marathi (दैनंदिन चालू घडामोडी) मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
