Marathi govt jobs   »   Daily Current Affairs In Marathi- 01...

Daily Current Affairs In Marathi- 01 and 02 August 2021 | दैनिक चालू घडामोडी: 01 आणि 02 ऑगस्ट 2021

दैनिक चालू घडामोडी: 01 आणि 02 ऑगस्ट 2021

Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB,  अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला आपण आता 01 आणि 02 ऑगस्ट 2021 चे सर्व महत्वाचे Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) पाहुयात.

 

राष्ट्रीय बातम्या 

 1. जी 20 सांस्कृतिक मंत्र्यांच्या बैठकीसाठी मीनाकाशी लेखी भारताचे नेतृत्व करणार

Daily Current Affairs In Marathi- 01 and 02 August 2021_40.1
जी 20 सांस्कृतिक मंत्र्यांच्या बैठकीसाठी मीनाकाशी लेखी भारताचे नेतृत्व करणार
 • जी 20 सांस्कृतिक मंत्र्यांच्या बैठकीसाठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्त्व भारताच्या सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी  लेखी यांनी केले.
 • ही बैठक इटलीच्या अध्यक्षतेखाली 29 आणि 30 जुलै 2021 रोजी आयोजित करण्यात आली होती. चर्चेच्या शेवटी, जी20 सांस्कृतिक मंत्र्यांनी जी20 सांस्कृतिक कार्यगटाच्या संदर्भ अटी स्वीकारल्या.

चर्चेतील मुख्य विषय:

 • सांस्कृतिक वारशाचे संरक्षण
 • संस्कृतीच्या माध्यमातून हवामान संकटाला तोंड देणे;
 • प्रशिक्षण आणि शिक्षणाद्वारे क्षमता वाढवणे
 • डिजिटल संक्रमण आणि संस्कृतीसाठी नवीन तंत्रज्ञान
 • वाढीसाठी चालक म्हणून संस्कृती आणि नवकल्पना क्षेत्र

 

अर्थव्यवस्था बातम्या 

 2. पंतप्रधान मोदींनी ई-रूपी डिजिटल पेमेंट सोल्यूशनचे लोकार्पण केले

Daily Current Affairs In Marathi- 01 and 02 August 2021_50.1
पंतप्रधान मोदींनी ई-रूपी डिजिटल पेमेंट सोल्यूशनचे लोकार्पण केले
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-रुपी, ई-व्हाउचर-आधारित डिजिटल पेमेंट सोल्यूशनचे लोकार्पण केले.
 • डिजिटल पेमेंटसाठी ई-रुपी हे रोकडविरहीत आणि संपर्कहीन साधन आहे. हे क्यूआर कोड किंवा एसएमएस वर आधारित ई-व्हाउचर म्हणून काम करते, जे लाभार्थ्यांच्या मोबाईल फोनवर वितरित केले जाते.
 • आर्थिक सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या सहकार्याने, ई-आरयूपीआय व्यासपीठ नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने त्याच्या यूपीआय व्यासपीठावर विकसित केले आहे.

 

 3. जुलै 2021 मध्ये जीएसटी संकलन ₹ 1.16 लाख कोटी

Daily Current Affairs In Marathi- 01 and 02 August 2021_60.1
जुलै 2021 मध्ये जीएसटी संकलन ₹ 1.16 लाख कोटी
 • जुलै 2021 साठी वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलन ₹ 1.16 लाख कोटी होते, जे गेल्या वर्षीच्या समान कालावधीपेक्षा 33 टक्के अधिक आहे.
 • जुलै 2020 मध्ये जीएसटी संकलन ₹ 87,422 कोटी होते, तर या वर्षी जूनमध्ये, 92,849 कोटी होते.

 

 4. एलआयसी आणि आयडीबीआय बँकेने रूपे क्रेडिट कार्ड ल्युमीने ,ईक्लॅट सुरु केले

Daily Current Affairs In Marathi- 01 and 02 August 2021_70.1
एलआयसी आणि आयडीबीआय बँकेने रूपे क्रेडिट कार्ड ल्युमीने ,ईक्लॅट सुरु केले
 • एलआयसी कार्ड्स सर्व्हिसेस लिमिटेड (एलआयसी-सीएसएल) ने ‘ल्युमीने’ प्लॅटिनम क्रेडिट कार्ड आणि ‘ईक्लॅट’ सिलेक्ट क्रेडिट कार्ड रुपे व्यासपीठावर सुरू करण्यासाठी आयडीबीआय बँकेबरोबर भागीदारी केली आहे.
 • ही कार्डे सुरुवातीला एलआयसी पॉलिसीधारक, एजंट, तसेच महामंडळ आणि त्याच्या उपकंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध असतील.
 • हे कार्ड वापरकर्त्यांना अनेक फायदे देतील.कार्ड्ससह विमा संरक्षण आहे जसे की विमान अपघात विमा संरक्षण, वैयक्तिक अपघात किंवा कायमचे अपंगत्व संरक्षण, क्रेडिट शील्ड कव्हर इत्यादी. त्यांची 4 वर्षांची वैधता आणि 48 दिवसांपर्यंत व्याजमुक्त क्रेडिट कालावधी आहे.

 

महत्त्वाचे दिवस 

 5. 01 – 07 ऑगस्ट: जागतिक स्तनपान सप्ताह 2021

Daily Current Affairs In Marathi- 01 and 02 August 2021_80.1
01 – 07 ऑगस्ट: जागतिक स्तनपान सप्ताह 2021
 • माता आणि अर्भकांसाठी स्तनपानाच्या महत्त्वविषयी जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक स्तनपान सप्ताह (डब्ल्यूबीडब्ल्यू) दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात, 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान पाळला जातो.
 • डब्ल्यूएबीए, डब्ल्यूएचओ आणि युनिसेफद्वारे 1991 पासून वार्षिक सप्ताहाचे आयोजन केले जाते.
 • 2021 ची संकल्पना: “स्तनपानाची  सुरक्षितता: एक सामायिक जबाबदारी”.(प्रोटेक्ट ब्रेस्टफीडिंग: ए शेअर्ड रिसपॉंसीबिलिटी)

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

 • स्तनपानासाठी जागतिक आघाडीचे (वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग) संस्थापक: अन्वर फजल 
 • स्तनपानासाठी जागतिक आघाडीची स्थापना: 14 फेब्रुवारी 1991
 • स्तनपानासाठी जागतिक आघाडीचे मुख्यालय: पेनांग, मलेशिया

 

 6. 01 ऑगस्ट: मुस्लिम महिला हक्क दिन

Daily Current Affairs In Marathi- 01 and 02 August 2021_90.1
01 ऑगस्ट: मुस्लिम महिला हक्क दिन
 • भारतात, तिहेरी तलाकविरोधात कायदा अस्तित्वात येण्याच्या वर्धापनदिनानिमित्त 01 ऑगस्ट रोजी देशभरात “मुस्लिम महिला हक्क दिन” पाळला जातो. 2020 मध्ये पहिल्यांदा हा दिवस आयोजित करण्यात आला.
 • भारत सरकारने तिहेरी तलाकविरोधात 01 ऑगस्ट, 2019 रोजी कायदा केला ज्याने तिहेरी तलाक च्या सामजिक कुप्रथेस फौजदारी गुन्हा ठरविला आहे.
 • या कायद्याचे अधिकृत नाव मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण) अधिनियम, 2019 असून यात मुस्लिम पुरुषांद्वारे त्वरित घटस्फोटाची प्रथा प्रतिबंधित आहे आणि कायद्याचे कोणतेही उल्लंघन केल्यास तीन वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

 

पुरस्कार बातम्या 

 7. सायरस पूनावाला यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Daily Current Affairs In Marathi- 01 and 02 August 2021_100.1
सायरस पूनावाला यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
 • पुणे-स्थित लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांची 2021 च्या प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
 • कोव्हीड-19 महामारीच्या काळात कोव्हीशील्ड लस तयार करून दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.
 • लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात लोकमान्य टिळक ट्रस्टतर्फे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला 1 ऑगस्ट 1983 पासून करण्यात आली.
 • एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते.

 

नियुक्ती बातम्या 

 8. व्हाइस अ‍ॅडमिरल एस एन घोरमाडे: नौदल उपप्रमुख

Daily Current Affairs In Marathi- 01 and 02 August 2021_110.1
व्हाइस अ‍ॅडमिरल एस एन घोरमाडे: नौदल उपप्रमुख
 • व्हाइस अ‍ॅडमिरल एस एन घोरमाडे यांनी नवी दिल्ली येथे एका औपचारिक समारंभात नौदलाचे  उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी व्हाइस अ‍ॅडमिरल जी अशोक कुमार यांची  जागा घेतली.
 • ध्वज अधिकारी एस.एन. घोरमाडे यांना 01 जानेवारी 1984 रोजी भारतीय नौदलात प्रवेश केला. त्यांना 26 जानेवारी 2017 रोजी अति विशिष्ठ सेवा पदक (एव्हीएसएम) आणि 2007 मध्ये नौसेना पदक (एनएम) इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत.

 

 9. दीपक दास: भारताचे नवीन लेखा नियंत्रक

Daily Current Affairs In Marathi- 01 and 02 August 2021_120.1
दीपक दास: भारताचे नवीन लेखा नियंत्रक
 • दीपक दास यांनी 01 ऑगस्ट 2021 रोजी भारताचे 25 वे लेखा नियंत्रक (सीजीए) म्हणून पदभार स्वीकारला आहे.
 • सीजीएचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी, श्री दास यांनी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळात (सीबीडीटी) मुख्य लेखा नियंत्रक म्हणून काम केले.
 • दीपक दास, 1986-बॅचचे भारतीय नागरी लेखा सेवा (आयसीएएस) अधिकारी आहेत.
 • सीजीए हा सरकारचा खातेपाल असून संविधानाच्या अनुच्छेद 150 नुसार त्यांची नियुक्ती करण्यात येते.
 • हे कार्यालय मासिक खात्यांचे एकत्रीकरण करणे, केंद्राच्या रोख शिल्लक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) बरोबर तपासून पाहणे; महसूल उत्पन्न आणि खर्चाचे प्रवाह तसेच केंद्र सरकारचे वार्षिक हिशेब तयार करणे इत्यादी काम करते.

 

बैठका आणि परिषद बातम्या 

 10. भारताने ऑगस्ट 2021 साठी युएनएससी चे अध्यक्षपद स्वीकारले

Daily Current Affairs In Marathi- 01 and 02 August 2021_130.1
भारताने ऑगस्ट 2021 साठी युएनएससी चे अध्यक्षपद स्वीकारले
 • भारताने ऑगस्ट 2021 साठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (युएनएससी) अध्यक्षपदाचा पदभार फ्रान्सकडून स्वीकारला आहे. 2021-22 च्या युएनएससी चा अस्थायी सदस्य म्हणून भारतासाठी हे पहिले अध्यक्षपद आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युएनएससी च्या बैठकीचे अध्यक्ष होणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.
 • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष या नात्याने भारत ऑगस्ट महिन्याचा अजेंडा ठरवेल, महत्त्वाच्या बैठका आणि इतर संबंधित मुद्द्यांचे समन्वय करेल.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

 • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे मुख्यालय: न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स
 • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची स्थापना: 24 ऑक्टोबर 1945

 

क्रीडा बातम्या 

 11. पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले

Daily Current Affairs In Marathi- 01 and 02 August 2021_140.1
पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले
 • भारतची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने 01 ऑगस्ट 2021 रोजी टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरी स्पर्धेत चीनच्या ही बिंगजियाओला पराभूत करून कांस्यपदक जिंकले.
 • या विजयासह वैयक्तिक स्पर्धांमध्ये दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी सिंधू पहिली भारतीय महिला आणि दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे.
 • यापूर्वी तिने 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरी बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक जिंकले होते. 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे दुसरे पदक आहे.

 

 12. एस्टेबान ओकॉन हंगेरियन जीपी 2021 चा विजेता

Daily Current Affairs In Marathi- 01 and 02 August 2021_150.1
एस्टेबान ओकॉन हंगेरियन जीपी 2021 चा विजेता
 • फ्रान्सच्या एस्टेबान ओकॉनने (अल्पाइन-रेनॉल्ट) 01 ऑगस्ट 2021 रोजी हंगेरीच्या मोग्योरोड येथील हंगारोरिंग येथे आयोजित करण्यात आलेली हंगेरियन ग्रांप्री 2021 स्पर्धा जिंकली आहे. एस्टेबान ओकॉनसाठी हा पहिला फॉर्म्युला 1 विजय आहे.
 • सेबेस्टियन वेटेल (अ‍ॅस्टन मार्टिन-मर्सिडीज/ जर्मनी) दुसऱ्या तर लुईस हॅमिल्टन (मर्सिडीज/ग्रेट ब्रिटन) तिसऱ्या स्थानावर आले.
 • हंगेरियन ग्रँड प्रिक्स 2021 फॉर्म्युला वन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची अकरावी फेरी होती.

 

 13. श्रीलंकेचा इसरु उदाना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

Daily Current Affairs In Marathi- 01 and 02 August 2021_160.1
श्रीलंकेचा इसरु उदाना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
 • श्रीलंकेचा डावखुरा मध्यमगती गोलंदाज व अष्टपैलू, इसुरू उदाना याने तात्काळ प्रभावाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
 • उदानाची 12 वर्षांमध्ये तुरळक प्रदर्शनांसह अतिशय सामान्य आंतरराष्ट्रीय कारकीर्द होती, ज्यामध्ये त्याने फक्त 21 एकदिवसीय आणि 35 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि केवळ 45 बळी घेतले आहेत.

 

निधन बातम्या 

 14. जागतिक मास्टर्स सुवर्णपदक विजेत्या मान कौर यांचे निधन

Daily Current Affairs In Marathi- 01 and 02 August 2021_170.1
जागतिक मास्टर्स सुवर्णपदक विजेत्या मान कौर यांचे निधन
 • विविध जागतिक मास्टर्स अजिंक्यपद स्पर्धेच्या सुवर्णपदक विजेत्या आणि अनेक आशियाई मास्टर्स अजिंक्यपद स्पर्धेच्या पदक विजेत्या खेळाडू 105 वर्षीय मान कौर यांचे निधन झाले.
 • त्यांनी 2007 मध्ये चंदीगड मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत  पहिले पदक जिंकले आणि 2011 मध्ये राष्ट्रीय मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत 100 मीटर तसेच 200 मीटर शर्यतीत सुवर्ण जिंकले.
 • 2017 मध्ये ऑकलंडमध्ये झालेल्या वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत 100+ वर्गात 100 मीटरमध्ये विजेत्या होण्याचा त्यांनी पराक्रम केला आणि त्या प्रसिद्धीझोतात आल्या.

 

पुस्तके आणि लेखक बातम्या

 15. कादंबरीकार कुणाल बसू यांचे नवीन पुस्तक ‘इन अ‍ॅन आयडियल वर्ल्ड’

Daily Current Affairs In Marathi- 01 and 02 August 2021_180.1
कादंबरीकार कुणाल बसू यांचे नवीन पुस्तक ‘इन अ‍ॅन आयडियल वर्ल्ड’
 • प्रख्यात कादंबरीकार कुणाल बसू यांचे कल्पनारम्य, “इन अ‍ॅन आयडियल वर्ल्ड’ हे नवीन पुस्तक पुढील वर्षी प्रकाशित होईल, अशी घोषणा प्रकाशनगृह पेंग्विन रँडम हाऊस इंडिया (पीआरएचआय) ने केली आहे.
 • कॉलेज, राजकारण, कुटुंब, गुन्हेगारी तपास आणि धर्मांधता यांसारख्या विषयांना या पुस्तकात स्पर्श केला जाईल असेल सांगितले जाट आहे.

 

Daily current affairs in Marathi (दैनंदिन चालू घडामोडी) मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Daily Current Affairs In Marathi- 01 and 02 August 2021_190.1
मिशन MPSC त्रिशूळ बॅच

 

 

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Daily Current Affairs In Marathi- 01 and 02 August 2021_210.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

Daily Current Affairs In Marathi- 01 and 02 August 2021_220.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.