Marathi govt jobs   »   Study Materials   »   संगणक प्रणालीचे घटक

संगणक प्रणालीचे घटक | जिल्हा न्यायालय भरतीसाठी अभ्यास साहित्य

संगणक प्रणालीचे घटक

संगणक प्रणालीचे घटक: संगणक हे उपकरण विविध घटकांपासून मिळून तयार होत असते. प्रत्येक घटकाचे संगणक प्रणाली मध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आगामी काळातील जिल्हा न्यायालय भरती परीक्षेत संगणकावरील ज्ञान या विषयावर प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे आज या लेखात आपण संगणक प्रणालीचे घटक या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

संगणक प्रणालीचे घटक: विहंगावलोकन

संगणक प्रणालीचे घटक: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
विषय संगणक
उपयोगिता जिल्हा न्यायालय भरती परीक्षा
लेखाचे नाव संगणक प्रणालीचे घटक
लेख तुम्हाला काय प्रदान करतो?
  • CPU
  • व्हिजुअल डिस्प्ले युनिट
  • कि-बोर्ड
  • माउस

संगणक प्रणालीचे घटक

संगणक प्रणालीचे महत्त्वाच्या घटकांबद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

सेन्ट्रल प्रोसेसिंग युनिट (CPU): – CPU ला आपण कॉम्प्युटरचा मेंदू म्हणू शकतो. संगणकाला पार पाडावी लागणारी अनेक कामे जसे गणिती प्रक्रिया, तुलना, इ. कामांची अंमलबजावणी CPU करतो. त्याचबरोबर संगणकाला जोडलेल्या इतर घटकांवर नियंत्रण ठेवण्याचे कामही CPU करतो. म्हणजेच संगणकाद्वारे केली जाणारी जवळजवळ सर्व कामे पर्यायाने CPU च करतो.

CPU कॅबिनेट
CPU कॅबिनेट

CPU चे अंतर्गत तीन भाग पडतात मेमरी युनिट, कंट्रोल युनिट आणि अरिथमॅटीकल आणि लॉजिकल युनिट (ALU)

  • मेमरी युनिट- इनपूट युनिटकडून आलेली माहिती व तयार झालेले उत्तर साठविण्याचे काम या युनिटद्वारे केले जाते. संगणकाची मेमरी मोजण्यासाठी विशिष्ट परिमाणे आहेत. उदा. K.B. (किलो बाईटस्), M.B. (मेगा बाईटस्). 1 बाईट म्हणजे 8 बिट्स. त्याच प्रमाणे 1024 बाईट्स म्हणजे 1kB आणि 1024 kB म्हणजे 1MB.
  • कंट्रोल युनिट- कंट्रोल युनिट संगणकाच्या प्रत्येक कार्यावर स्वतःचे नियंत्रण ठेवत असतो.  माहिती इनपूट करून घेणे, तसेच ती मेमरीकडे पाठवणे किंवा त्यावर कॅल्क्यूलेशन्स व प्रोसेसिंग करणे, तयार झालेले उत्तर आउटपुट युनिटकडे पाठविणे अशा प्रकारच्या सर्व क्रियांवर कंट्रोल युनिटचे नियंत्रण असते.
  • अरिथमॅटीकल आणि लॉजिकल युनिट (ALU)- अरिथमॅटीकल आणि लॉजिकल युनिट संगणकातील अरिथमॅटीकल आणि लॉजिकलशी संबंधित प्रक्रिया पार पडल्या जातात. इनपूट युनिटमध्ये आलेली माहिती ही मोजमाप, विश्लेषण किंवा तुलना यासारख्या गणिती किंवा तुलनात्मक कार्यासाठी आलेली आहे की नाही ते पडताळून पाहणे व त्यावर प्रोसेस करणे हे या युनिटचे मुख्य कार्य आहे.

व्हिजुअल डिस्प्ले युनिट (VDU): – व्हिजुअल डिस्प्ले युनिट (VDU) लाच आपण “मॉनिटर” असेही म्हणतो. हे एक आऊटपुट डिव्हाइस आहे. याच्या मदतीने संगणकाने आपल्या इनपुट वर प्रक्रिया करून दिलेले रीजल्ट आपण पाहू शकतो.

व्हिजुअल डिस्प्ले युनिट (VDU)
व्हिजुअल डिस्प्ले युनिट (VDU)

कि-बोर्ड: कि-बोर्ड हे एक इनपुट डिव्हाइस आहे. या द्वारे संगणकाला माहिती पुरवली जाते. कि-बोर्डवर 101 किंवा 114 बटणे असतात. त्यामध्ये अक्षरे, अंक आणि चिन्हांचा समावेश असतो. कि-बोर्डच्या सहाय्याने आपण संगणकावर टायपिंग करू शकतो.

कि-बोर्ड
कि-बोर्ड

माउस: माउस सुद्धा एक इनपुट डिव्हाइस आहे. याच्या मदतीने आपण कर्सर संगणकाच्या स्क्रीन वर इकडे तिकडे फिरवू शकतो. फाइल्स उघडू किंवा बंद करू शकतो. याचा आकार उंदराप्रमाणे असल्यामुळे याला माउस असे म्हणतात.

माउस
माउस

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा-महापॅक
महाराष्ट्राचा-महापॅक

Sharing is caring!

FAQs

संगणक प्रणालीचे मुख्य घटक कोणकोणते आहेत?

संगणक प्रणालीचे मुख्य घटक CPU, व्हिजुअल डिस्प्ले युनिट, कि-बोर्ड आणि माउस हे आहेत.

संगणक प्रणालीचे घटक याबद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

संगणक प्रणालीचे घटक याबद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.