स्पर्धा परीक्षेची तयारी करताना घ्यावयाची काळजी
सध्याचे युग हे निश्चितच स्पर्धेचे युग आहे. अशातच जगाने चौथ्या औद्योगिक क्रांतीला सुरुवात करताना त्याची चुणूकही दाखवून दिली आहे. सध्या सुरक्षित नोकरीसाठी व समाजातील सन्मानजनक जगण्यासाठी सरकारी नोकरीकडे बघितले जाते. सरकारी नोकरी म्हंटलं की प्रसिद्धी, जबाबदारी व सामाजिक समन्वय यांचा योग्य ताळमेळ आलाच. सध्याच्या युवा वर्गामध्ये राज्य सेवा, संयुक्त परीक्षा गट ब व क, वनसेवा, अभियांत्रिकी, तलाठी, पोलीस भरती, IBPS PO/Clerk, SSC, CAPF या सरकारी नोकरीसाठी चे आकर्षण भरपूर प्रमाणात दिसते व ते असायलाही हवे. पण ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एक जीवघेणी स्पर्धा सुरू झालेली आहे. खास करून ग्रामीण भागातील विद्यार्थी या परीक्षांकडे जास्त वळताना दिसतात. या ग्रामीण मुलांमध्ये असणारी जिद्द, चिकाटी ही खरच वाखाणण्याजोगी आहे. हीच जिद्द, चिकाटी या स्पर्धा परीक्षेमध्ये टिकून राहण्यासाठी आवश्यक असते. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आपण नकळत आपल्या अभ्यासाचा ट्रॅकवरून भरकटत तरी नाही ना याची दक्षता ही वारंवार घेतली पाहिजे त्यासाठी स्वतःला काही प्रश्न विचारणे ही आवश्यक आहे जसे की मी कोणत्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय? आणि का करतोय? जी पोस्ट मला मिळवायची आहे त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची पूर्तता मी करत चाललो आहे का? एखाद्या परीक्षेत अपयश आले तर ते का आले? याची कारणमीमांसा करणे ही गरजेचे आहे. आपण खरंच अशा पद्धतीने आपला अभ्यास करतो का? मुळात मला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास का करायचा आहे याचे उत्तर मिळाले की बाकीच्या प्रश्नांची उत्तरे आपण शोधायला चालू करतो व त्यातून जागृत होते ती विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची वृत्ती जिला स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी आपल्यातील जीद्द व चिकाटीची जोड देवून त्याच्या प्रयत्नांना मूर्त रूप देण्याचा प्रयत्न करतो.
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना प्रत्येक स्पर्धकांने काही गोष्टींची सांगड घालावी लागते. टाईम मॅनेजमेंट, अभ्यासक्रम, योग्य अभ्यास पद्धती,व योग्य मार्गदर्शन या गोष्टींची सांगड घातली की अपेक्षित यश थोडे आवाक्यात येते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना महत्त्वाचा असतो तो म्हणजे संबंधित परीक्षेचा अभ्यासक्रम व आधी झालेल्या प्रश्नपत्रिका. प्रत्येक परीक्षेचा अभ्यासक्रम वेगळा, प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी असते त्यामुळे अभ्यास करताना अभ्यासक्रमांची सांगड घालणे क्रमप्राप्त ठरते. म्हणूनच आम्ही Adda 247-Marathi च्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सोपा व्हावा व योग्य दिशेने जात स्पर्धकांनायशप्राप्ती लवकर व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत.