Marathi govt jobs   »   China is certified malaria-free by WHO...

China is certified malaria-free by WHO I डब्ल्यूएचओने चीनला मलेरियामुक्त प्रमाणपत्र दिले

China is certified malaria-free by WHO I डब्ल्यूएचओने चीनला मलेरियामुक्त प्रमाणपत्र दिले_2.1

 

डब्ल्यूएचओने चीनला मलेरियामुक्त प्रमाणपत्र दिले

70 वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर मलेरिया मुक्त झाल्याचे प्रमाणपत्र जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) चीन ला दिले. 1940 च्या दशकात वर्षाला 30 दशलक्ष मलेरियाचे रुग्ण आढळणाऱ्या चीन चे हे यश वाखाणण्याजोगे आहे. डब्ल्यूएचओ मलेरियामुक्त प्रमाणपत्र दिलेला पश्चिम पॅसिफिक प्रदेशातील मागील 3 दशकांतला चीन हा एकमेव देश आहे. प्रदेशातील इतर देशांमध्ये ऑस्ट्रेलिया (1981), सिंगापूर (1982) आणि ब्रुनेई दारुसलाम (1987) यांचा समावेश आहे. जागतिक पातळीवर, 40 देश आणि प्रांतांना डब्ल्यूएचओ कडून मलेरियामुक्त प्रमाणपत्र देण्यात आले आहे – अलिकडेच अल साल्वाडोर (2021), अल्जेरिया (2019), अर्जेंटिना (2019), पराग्वे (2018) आणि उझबेकिस्तान (2018) या देशांनी अशी कामगिरी केली.

चीन आपल्या नागरिकांना मोफत सार्वजनिक आरोग्य सेवा पॅकेज प्रदान करते. या पॅकेजचा एक भाग म्हणून, कायदेशीर किंवा आर्थिक स्थिती विचारात न घेता, मलेरियाच्या निदान आणि उपचारासाठी चीनमधील सर्व लोकांना परवडणाऱ्या उपचार पद्धती उपलब्ध असतात. अलिकडच्या वर्षांत, देशाने “1-3-7” धोरणाचा अवलंब करून मलेरिया आजार कमी केला. यातील ‘1’ म्हणजे मलेरिया निदानाची नोंद करण्यासाठी आरोग्य सुविधांसाठी एक दिवसाची अंतिम मुदत. ‘3’ म्हणजे दिवस-अखेरीस 3 आरोग्य अधिकार्‍यांना मलेरियाच्या केसची पुष्टी करणे आणि त्याचा प्रसार होण्याचा धोका निश्चित करणे आवश्यक आहे. आणि ‘7’ म्हणजे 7 दिवसांच्या आत रोगाचा पुढील प्रसार रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

  • चीनची राजधानी: बीजिंग
  • चीनची चलन: रेन्मिन्बी
  • चीनचे अध्यक्ष: शी जिनपिंग

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!