Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs आता एका क्लिक वर उपलब्ध.
बँक ऑफ महाराष्ट्र आणि नाबार्ड यांच्यात सामंजस्य करार
महाराष्ट्रातील अग्रक्रम क्षेत्र कर्ज वितरणाशी निगडित चालू असलेल्या विविध विकासात्मक प्रकल्पांना चालना देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र आणि नॅशनल बँक ऑफ अॅग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) यांच्यात सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे. सामंजस्य कराराद्वारे राज्यातील शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था, संयुक्त दायित्व गट, बचत-गट, ग्रामीण कारागीर, विणकर, कृषी स्टार्ट-अप, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांच्या हितासाठी संयुक्त उपक्रमांचा विकास केला जाणार आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- बँक ऑफ महाराष्ट्र मुख्यालय: पुणे
- बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी: ए. राजीव
- बँक ऑफ महाराष्ट्रस्थापना: 16 सप्टेंबर 1935
- नाबार्डचे अध्यक्ष: जी.आर. चिंतला
- नाबार्डची स्थापना: 12 जुलै 1982
- नाबार्ड मुख्यालय: मुंबई
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो