Marathi govt jobs   »   Axis Bank signs MOU with Indian...

Axis Bank signs MOU with Indian Army to offer defence service salary package | अ‍ॅक्सिस बँकेने संरक्षण सेवेच्या पगाराच्या पॅकेजसाठी भारतीय सैन्याबरोबर सामंजस्य करार केला

Axis Bank signs MOU with Indian Army to offer defence service salary package | अ‍ॅक्सिस बँकेने संरक्षण सेवेच्या पगाराच्या पॅकेजसाठी भारतीय सैन्याबरोबर सामंजस्य करार केला_2.1

 

अ‍ॅक्सिस बँकेने संरक्षण सेवेच्या पगाराच्या पॅकेजसाठी भारतीय सैन्याबरोबर सामंजस्य करार केला

देशातील तिसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी खासगी बँक, अ‍ॅक्सिस बँकेने भारतीय सैन्याबरोबर “पॉवर सॅल्यूट” उपक्रमांतर्गत संरक्षण सेवा पगाराच्या पॅकेजचा प्रस्ताव देण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.  संरक्षण सेवा पगाराच्या पॅकेजद्वारे सैन्याच्या सर्व अधिका-यांना वेगवेगळे फायदे देण्यात येतील. यामध्ये सेवारत आणि सेवानिवृत्त सर्व अधिकाऱ्यांचा समावेश असेल. या करानुसार बँक सैन्य दलातील सर्व कर्मचार्‍यांना ₹ 56 लाखांपर्यंत वैयक्तिक अपघाती संरक्षणकवच देणार आहे. 8 लाखांपर्यंत शिक्षण अनुदान; एकूण कायमस्वरुपी पूर्ण अपंगत्व संरक्षणकवच 46 लाख आणि कायमस्वरूपी आंशिक अपंगत्व साठी 46 लाखांपर्यंत संरक्षणकवच मिळणार आहे. हवाई अपघाताचे संरक्षणकवच ₹ 1 कोटी आणि कुटुंबातील सदस्यासाठी विनामूल्य अतिरिक्त डेबिट कार्ड या सुविधा असणार आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • अ‍ॅक्सिस बँक मुख्यालय: मुंबई
  • अ‍ॅक्सिस बँक स्थापना: 1993
  • अ‍ॅक्सिस बँकेचे एमडी आणि अ‍ॅक्सिस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी: अमिताभ चौधरी

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!