Marathi govt jobs   »   Ashgabat world’s most expensive city for...

Ashgabat world’s most expensive city for foreign workers I अश्गबाद – परदेशी कामगारांसाठी जगातील सर्वात महागडे शहर

Ashgabat world's most expensive city for foreign workers I अश्गबाद – परदेशी कामगारांसाठी जगातील सर्वात महागडे शहर_2.1

 

अश्गबाद – परदेशी कामगारांसाठी जगातील सर्वात महागडे शहर

मध्य आशियातील तुर्कमेनिस्तानची राजधानी असलेल्या अश्गाबाद शहराला परदेशी कामगारांसाठी जगातील सर्वात महागडे शहर म्हणून घोषीत करण्यात आले आहे. कन्सल्टन्सी फर्म मर्सरने केलेल्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वेक्षणात या शहराचा पहिला क्रमांक असून त्यानंतर हाँगकाँग, लेबनॉनमधील बेरूत आणि जपानमधील टोकियो अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. या वार्षिक अहवालात गृहनिर्माण, अन्न आणि वाहतूक यासारख्या खर्चाच्या किंमतीवर आधारित 209 शहरांचा समावेश आहे. 

अश्गाबाद विषयी: 

अश्गाबादआपल्या संगमरवरी इमारती आणि स्मारकांसाठी प्रसिद्ध आहे. येथे मध्य आशियातील सर्वात रंगीबेरंगी बाजारपेठ तुलतुक्का बाजार देखील आहे. इतर पर्यटन आकर्षणांमध्ये नॅशनल म्युझियम, व्हाइट मार्बल, तुर्कमेनिशी केबलवे, ललित कला संग्रहालय, अलेम कल्चरल अँड एंटरटेनमेंट सेंटर आणि तुर्कमेन कार्पेट संग्रहालय आहे.

भारतातील शहरे: 

78 व्या क्रमांकावर असलेले मुंबई हे भारतातील सर्वात महागडे शहर आहे परंतु मागील वर्षीच्या तुलनेत त्याच्या स्थानात 15 अंकांची घसरण झाली आहे. भारतातील नवी दिल्ली (117), चेन्नई (158), बेंगळुरू (170) आणि कोलकाता (181) ही इतर शहरे या यादीमध्ये आहेत.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!