Table of Contents
महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या घडामोडी – वर्ष 2023: All Maharashtra Exams
महाराष्ट्रातील सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये चालू घडामोडी हा विषय असतोच. सर्व परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या घडामोडीवर हमखास प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या घडामोडींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा कमी वेळेमध्ये जास्त गुण मिळवून देणारा विषय आहे. थोड्याशा सरावाने या विषयामध्ये जास्त गुण मिळवता येतात. आज या लेखात आपण महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या घडामोडी – वर्ष 2023 बद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. या लेखामध्ये 2023 मधील संपूर्ण वर्षातील अत्यंत महत्वाच्या घडामोडी दिलेल्या आहेत. ज्यामध्ये महाराष्ट्राला केंद्रबिंदू ठेवण्यात आले आहे. याचा उपयोग आगामी काळातील सर्वच परीक्षेमध्ये होणार आहे.
महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या घडामोडी – वर्ष 2023: विहंगावलोकन
महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या घडामोडी – वर्ष 2023 : विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
विषय | चालू घडामोडी |
उपयोगिता | महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी |
लेखाचे नाव | महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या घडामोडी – वर्ष 2023 |
लेख तुम्हाला काय प्रदान करतो? | 2023 वर्षाच्या महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या सर्वच घडामोडींची माहिती |
महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या घडामोडी : वर्ष 2023
- ‘मराठी तितुका मेळवावा’ विश्वसंमेलनाचे आयोजन मुंबईत.
- जालना आणि नागपूर शहर पोलिसांना ‘सर्वोत्कृष्ट पोलिस युनिट’ पुरस्कार.
- जी- 20 परिषदेच्या निमित्ताने पुणे येथे सायकल फेरीचेआयोजन.
- आयपीएस अधिकारी देवेन भारती मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदी नियुक्त.
- 14 जानेवारी ते 28 जानेवारी कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा.
- शिवराज राक्षे याने 65 वा महाराष्ट्र केसरी किताब जिंकला.
- गोगोरो आणि बेलरिस इंडस्ट्रीज यांची बॅटरी स्वॅपिंग पायाभूत सुविधा स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत धोरणात्मक ऊर्जा भागीदारी.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत 38 हजार कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
- पुणे दिवाणी न्यायालयात भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन येत आहे.
- मुंबईत एससीओ चित्रपट महोत्सवाचं आयोजन.
- खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (KVIC) अध्यक्ष श्री. मनोज कुमार यांच्या हस्ते महिनाभर चालणाऱ्या खादी महोत्सव – 23 चे उद्घाटन मुंबईत.
- महाराष्ट्राचे राज्य गीत म्हणून जय जय महाराष्ट्र माझा याची निवड.
- मुंबईत दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर काळा घोडा कला महोत्सव झाला.
- निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार.
- पंतप्रधान मोदींनी मुंबईत अरबी अकादमीचे उद्घाटन केले.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईहून दोन नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.
- कोश्यारींच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात नवे राज्यपाल – रमेश बैस.
- भारतातील पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस मुंबईत दाखल.
- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील नागपूर येथे जगातील सर्वात मोठ्या आणि अद्वितीय दिव्यांग उद्यान – अनुभूती समावेशी उद्यानाची पायाभरणी केली.
- मुंबई- चर्चगेट स्टेशन आता सी. डी. देशमुख स्टेशन म्हणून ओळखले जाईल.
- संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव धाराशिव करण्यात आले.
- महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना जोडणाऱ्या महामार्गावर जगातील पहिला 200 मीटर लांबीचा बांबू कॅश बॅरिअर बसवण्यात आला.
- अखिल भारतीय महिला लोककला संमेलन मुंबईत.
- ज्येष्ठ गायिका आशा भोसले प्रतिष्ठित ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित.
- मेळघाट व्याघ्र प्रकल्पास जागतिक व्याघ्र मानक संस्थेची मान्यता.
- पुणे विमानतळावर डिजियात्रा सुरु होणार.
- कोकणचा राजा हापूस राज्यातील जी आय टॅग नोंदणीत दुसरा.
- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते समता पर्वाचे उद्घाटन.
- महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांची 196 वी जयंती 11 एप्रिल 2023 रोजी साजरी करण्यात आली.
- महाराष्ट्रात सावरकरांची जयंती ‘स्वातंत्र्य वीर गौरव दिवस’ म्हणून साजरी होणार.
- अमित शहा यांनी अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन सन्मानित केले.
- महाराष्ट्र सरकारने अपंग कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीमध्ये 4% कोटा लागू केला.
- मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण.
- जालना ही महाराष्ट्रातील 29 वी महापालिका म्हणून घोषित.
- जलसंधारण योजनांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
- एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये आशियातील पहिली उपसमुद्र संशोधन प्रयोगशाळा पुणे येथे तयार.
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड.
- सरकारी योजना आणि सेवक नागरिकांच्या द्वारात पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शासन आपल्या दारी उपक्रम सुरू केला.
- RBI ने मराठा को-ऑप बँकचे कॉसमॉस को-ऑप बँक विलीनीकरण मंजूर केले.
- महाराष्ट्रात केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ मिळणार.
- महाराष्ट्र सरकार नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करणार.
- डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची व्याप्ती वाढविली.
- सिल्लोड तालुक्यात मका संथोधन केंद्र स्थापन होणार.
- पर्यटन व्यवसायात महिलांना अधिक वाव देण्यासाठी “आई” पर्यटन धोरण राबविण्यात येणार.
- अहमदनगरचं नामांतर ‘अहिल्यादेवीनगर’ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
- लातूर विभागात पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार.
- शिर्डी, चिमूर येथे नवे अपर जिल्हाधिकारी कार्यालय.
- पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती रकमेत वाढ.
- महाराष्ट्राला नवी दिल्लीत 3 राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त.
- विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजनेसाठी इफ्को टोकियो विमा कंपनीची निवड.
- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात राबविला जाणार ‘भरारी प्रकल्प’.
- आठ महिने पाण्याविना जगू शकणाऱ्या वनस्पतींच्या 62 प्रजातींचा शोध.
- आयआयटी मुंबईच्या क्यूएस मानांकनात वाढ; पहिल्या 150 संस्थांमध्ये प्रथमच प्रवेश.
- राज्यातील दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सेतू अभ्यास’.
- वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव.
- एमटीएचएलचे अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी-न्हावा-शेवा अटल सेतू नामकरण.
- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यासाठी 210 कोटी.
- महात्मा ज्योतिराव फुले, आयुष्मान भारत आरोग्य योजनेचे एकत्रिकरण; आता दीड लाखांऐवजी 5 लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण.
- संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात वाढ.
- कोट्यावधी असंघटीत कामगारांसाठी स्वतंत्र कामगार कल्याण महामंडळाची स्थापना.
- नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरु.
- औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक होणार.
- राज्यात विविध सात ठिकाणी न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय -मुखेड (जि. नांदेड), उमरखेड (जि. यवतमाळ), चिखलदरा (जि. अमरावती) आणि महाड (जि.रायगड), हरसूल (जि. नाशिक), वरूड (जि. अमरावती), फलटण (जि. सातारा).
- राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यायांमध्ये अद्ययावत उत्कृष्टता केंद्र.
- सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या क्लस्टरमधील पायाभूत सुविधांसाठी सिडबीशी सहमती करार.
- जालना-जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वेसाठी 3 हजार 552 कोटी.
- महाराष्ट्रात 9 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये स्थापन होणार.
- बुलढाणा येथे शासकीय कृषि महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय.
- दारिद्य रेषेवरील मुलांना देखील मोफत गणवेश, बूट, पायमोजे मिळणार.
- देवळा, वैजापूर तालुक्यातील बंधाऱ्यांना मान्यता.
- अमरावती जिल्ह्यात मासोदला लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट.
- सर जे.जे. कला आणि वास्तुशास्त्र महाविद्यालयास आता अभिमत विद्यापीठाचा दर्जा.
- औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील गंगापूर उपसा सिंचन योजनेस मान्यता.
- महाराष्ट्र वस्तू व सेवाकर (सुधारणा) विधेयक, 2023 च्या प्रारुपास मान्यता.
- राज्यात खासगी पशु वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मान्यता.
- पिंपरी-चिंचवड येथे वरिष्ठ पोलिस अधिका-यांची पदे निर्माण होणार.
- पर्यटन उपविभागासाठी उप – सचिव पद निर्माण करण्यास मान्यता.
- महाराष्ट्रातील नवीन अमरावती रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेमधील तिसरे ‘पिक स्टेशन’ ठरले.
- महाराष्ट्र सरकारने आदिवासी गावांना मुख्य रस्त्यांनी जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजना सुरू केली.
- उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेला पहिला ‘उद्योगरत्न पुरस्कार’.
- महाराष्ट्र सरकारने जर्मनीच्या प्रोफेशनल असोसिएशन फुटबॉल लीगसोबत सामंजस्य करार केला.
- 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, थेट विदेशी गुंतवणूक (FDI) आकर्षित करण्यात महाराष्ट्र आघाडीवर.
- छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्राची पर्यटन राजधानीने आपली पहिली अजिंठा एलोरा आर्ट्स रेसिडेन्सी आयोजित केली.
- पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था (FTII) ने अभिनेता आर. माधवन यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.
- गोंडवाना विद्यापीठाने आदिवासी अभ्यास केंद्राला मान्यता दिली.
- MADCने हेलिपॅड बांधण्यासाठी, हवाई रुग्णवाहिका उपलब्ध करण्यासाठी नोडल एजन्सी तयार केली.
- पुणे मेट्रोमध्ये प्रगत ‘थर्ड रेल सिस्टिम’.
- महाराष्ट्र सरकारने ‘शासन आपल्या दारी’ मोहिमेच्या धर्तीवर एक नवीन महिला सक्षमीकरण मोहीम जाहीर केली.
- साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह हे खान्देशचे प्रतिबिंब असून त्यावर बहिणाबाईंची कास्ट-पेन्सिल, संबळ आणि केळीची पाने दाखविली आहेत.
- सहकार भारती ट्रस्टच्या माध्यमातून नवी मुंबईतील विष्णुदास भावे सभागृहात मच्छिमारांचा देशव्यापी मेळावा आयोजित.
- अमरावती, चिखलदरा, अकोला या जिल्ह्यांमध्ये 1 ते 5 वयोगटातील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले.
- मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘लेक लाडकी’ या योजनेला मंजुरी.
- सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना 1300 आरोग्यवर्धिनी केंद्रे स्थापन करण्याचे आदेश दिले.
- महाराष्ट्र विधी विद्यापीठाने CNLU मूट कोर्ट स्पर्धा जिंकली.
- आयओसी आणि रिलायन्सने ऑलिम्पिक खेळांना चालना देण्यासाठी करार केला.
- आसिफ कुरेशी हे बार कौन्सिलचे नवे अध्यक्ष.
- MH सरकारने सहकार संवाद नावाचे मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केले.
- जिओ वर्ल्ड सेंटर येथे 141 व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) सत्राचे उद्घाटन मुंबईत.
- रेबीज-मुक्त मुंबई मोहिमेत 14,000 भटक्यांचे लसीकरण.
- कोपरखैरणे आणि वाशी येथील रहिवासी बेंझिन आणि टोल्युइन रसायनांचा श्वास घेत आहेत.
- पहिला एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बदलापूरमध्ये.
- महाराष्ट्रातील सर्व सरकारी शाळांमध्ये 2024- 25 या शैक्षणिक वर्षापासून ‘एक राज्य, एक गणवेश’ धोरण लागू.
- महाराष्ट्र आपल्या अर्थसंकल्पाच्या केवळ 4.1% आरोग्यावर खर्च करतो.
- महाराष्ट्रातून पद्मविभूषणचे मानकरी :
- प्रसिद्ध तबलावादक झाकिर हुसेन (कला)
- महाराष्ट्रातून पद्मभूषणचे मानकरी :
- कुमार मंगलम बिर्ला (व्यापार आणि उद्योग)
- सुमन कल्याणपूर (कला)
- दिपक धर (विज्ञान आणि अभियांत्रिकी)
- महाराष्ट्रातून पद्मश्रीचे मानकरी :
- भिकू रामजी इदाते (समाजसेवा)
- राकेश झुनझुनवाला – मरणोत्तर (व्यापार आणि उद्योग)
- परशुराम खुने (कला)
- प्रभाकर भानुदास मांडे (साहित्य आणि शिक्षण)
- गजानन माने (समाजसेवा)
- रमेश पतंगे (साहित्य आणि शिक्षण)
- रवीना टंडन (कला)
- कुमी नरिमन वाडिया (कला)
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.