Table of Contents
जनगणना 2011
जनगणना 2011: जनगणना हे देशाच्या लोकसंख्येचे अधिकृत पद्धतशीर सर्वेक्षण आहे. भारतातील जनगणना 2011 (census of India) मध्ये झाली होती. प्रत्येक स्पर्धा परीक्षेत भारताची जनगणना (Census of India) यावर प्रश्न येतात. त्याची माहिती असणे आवश्यक ठरते. महाराष्ट्रातील आगामी काळातील आदिवासी विकास विभाग भरती 2023 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा Topic आहे त्यामुळे याचा अभ्यास असणे महत्वाचे आहे. त्यामुळे या टॉपिकचा अभ्यास करणे फार आवश्यक आहे. आज या लेखात आपण भारताची जनगणना: भारताची जनगणना 2011 चे महत्त्वाचे मुद्दे (Census of India: Important Points of India Census 2011) पाहणार आहे.
जनगणना 2011: विहंगावलोकन
जनगणना 2011 बद्दल खालील तत्क्त्यात विहंगावलोकन देण्यात आले आहे.
जनगणना 2011: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | आदिवासी विकास विभाग भरती 2023 व इतर सर्व स्पर्धा परीक्षा |
विषय | भूगोल |
लेखाचे नाव | जनगणना 2011 |
अंतर्भूत मुद्दे |
|
भारताची जनगणना: भारताची जनगणना 2011 चे महत्त्वाचे मुद्दे
जनगणना ही एखाद्या राष्ट्राच्या हद्दीत राहणाऱ्या लोकांची मोजणी आहे. आधुनिक काळात प्रत्येक राष्ट्रातील शासनाचे जनगणना करणे एक अटळ कर्तव्य झाले आहे. राष्ट्राची लोकसंख्या किती, त्यातील लोकांची सामाजिक व आर्थिक वैशिष्ट्ये कोणती, त्यांचे राष्ट्राच्या निरनिराळ्या भागांत वितरण कसे झाले आहे, सामाजिक व जीवशास्त्रीय फेरफारांचे त्यांच्यावर कसकसे परिणाम होतात इ. अनेक प्रश्न दैनंदिन प्रशासनासाठी महत्त्वाचे हाताळण्यासाठी आवश्यक असलेली माहिती जनगणनेद्वारा उपलब्ध होते. शासनाला केवळ जनगणनाच नव्हे, तर इतर अनेक प्रकारच्या गणना कराव्या लागतात. उदा., कृषिगणना, पशुधनगणना, उत्पादनगणना, घरांची मोजणी इत्यादी. अशा सर्व गणनांतून उपलब्ध होणारी आकडेवारी राष्ट्रीय प्रगती दर्शविते व राष्ट्राच्या अनेक समस्यांचा उलगडा करण्यास उपयोगी पडते. विशेष करून जनगणनेमध्ये मिळणारी माहिती राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व राष्ट्राचे मानवी भांडवलरूपी सामर्थ्य यांवर महत्त्वाचा प्रकाश टाकते.
जनगणनेचा इतिहास
लोकांची मोजणी करण्याची प्रथा शासनव्यवस्थेच्या स्थापनेइतकीच जुनी आहे. ईजिप्शियन, ग्रीक, रोमन, हिब्रू, पर्शियन, या लोकांनी लोकसंख्येची मोजणी वेळोवेळी केल्याचे इतिहासात नमूद आहे. चीन-जपानमध्येही पुरातन काळापासून अशी मोजणी होत असे. साधारणतः अशी मोजणी सैन्यभरतीस योग्य वय असलेल्या नागरिकांची किंवा करपात्र लोकांची संख्या समजण्यासाठी जरूर तेव्हा होत असे. सबंध शहराची लोकसंख्या मोजण्यास यूरोपमध्ये पंधराव्या व सोळाव्या शतकांत सुरुवात झाली. मद्रास शहराची अशी लोकसंख्या-मोजणी 1687 मध्ये झाल्याचे नमूद आहे. नंतर राष्ट्रीय स्वरूपाची जनगणना सुरू झाली.
स्वीडनमधील पहिली जनगणना 1750 मध्ये झाली. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात 1790 पासून व ग्रेट ब्रिटनमध्ये 1801 पासून दर दहा वर्षांनी जनगणना घेण्यात येतात. भारतातील पहिली जनगणना (Census of India) ब्रिटीश व्हाईसराय लॉर्ड मेयो यांच्या काळात 1872 मध्ये पार पडली व त्यानंतर 1881 पासून दर दहा वर्षांनी भारताची जनगणना (Census of India) घेण्यात आल्या. काही राष्ट्रे जनगणना दर पाच वर्षांनी घेतात, तर काही त्यांना जरूर वाटेल तेव्हा जनगणना करतात. हे काम बरेच खर्चाचे असल्यामुळे बहुतेक राष्ट्रांत दर दहा वर्षांनी जनगणना करण्याची प्रथा आहे. सुरुवातीस जनगणनेच्या वेळी प्रत्येक कुटुंबाविषयीच माहिती गोळा करीत, परंतु नंतर प्रत्येक व्यक्तीबद्दल माहिती गोळा करण्यात येऊ लागली. अशी व्यक्तिगत स्वरूपाची राष्ट्रीय जनगणना सर्व प्रथम बेल्जियममध्ये 1846 मध्ये घेण्यात आली.
भारताची जनगणना 2011 तील ठळक मुद्दे
Important Points of India Census 2011: भारताची जनगणना 2011 (Indias Census 2011) तील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहे. जे तुम्हाला परीक्षेत नक्की मदत करेल.
ठळक मुद्दे | आकडेवारी |
2011 च्या जणगणणेनुसार एकूण लोकसंख्या |
|
पुरुषांची संख्या |
|
पुरुषांचे प्रमाण |
|
महिलांची संख्या |
|
महिलांचे प्रमाण |
|
2001 च्या तुलनेत लोकसंख्या वाढीचा दर |
|
ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण |
|
शहरी लोकसंख्येचे प्रमाण |
|
सर्वाधिक शहरी लोकसंख्येचे राज्य |
|
भारत: लोकसंख्येची घनता (प्रती चौरस किमी) |
|
सर्वाधिक लोकसंख्येची राज्ये |
|
सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य |
|
सर्वाधिक लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश |
|
सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश |
|
सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा |
|
सर्वाधिक लोकसंख्येची घनता राज्ये (प्रती चौरस किमी) |
|
सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य |
|
सर्वाधिक लोकसंख्येची घनताअसलेला केंद्रशासित प्रदेश |
|
सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला केंद्रशासित प्रदेश |
|
भारत : स्त्री पुरुष प्रमाण (Sex Ratio) |
|
सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण (Sex Ratio): राज्य |
|
सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण (Sex Ratio): राज्य |
|
सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण (Sex Ratio): केंद्रशासित प्रदेश |
|
सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण (Sex Ratio): केंद्रशासित प्रदेश |
|
भारत : साक्षरता |
|
भारत: स्त्री साक्षरता |
|
भारत: पुरुष साक्षरता |
|
सर्वाधिक साक्षरता असलेले राज्य |
|
सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य |
|
सर्वात कमी स्त्री साक्षरतेचे राज्य |
|
100% साक्षर भारतातील जिल्हा |
|
- 2011 साली झालेली भारताची जनगणना (Census of India) ही 15 वी जनगणना होती.
महाराष्ट्र जनगणना 2011 तील ठळक मुद्दे
Important Points of Maharashtra Census 2011: महाराष्ट्राची जनगणना 2011 (Census of Maharashtra) तील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहे. जे तुम्हाला परीक्षेत नक्की मदत करेल.
ठळक मुद्दे | आकडेवारी |
महाराष्ट्राची लोकसंख्या | 11,23,74,333 |
महाराष्ट्रातील पुरुष लोकसंख्या | 5,82,55,227 |
महाराष्ट्रातील महिलांची लोकसंख्या | 5,41,19,106 |
भारताच्या एकूण लोकसंख्येची टक्केवारी | 9.28% |
महाराष्ट्राच्या लोकसंख्येची दशक वाढ | 15.99% |
महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण | 45.23% |
महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण | 54.78% |
महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा | ठाणे |
महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा | सिंधुदुर्ग |
महाराष्ट्राची लोकसंख्या घनता | 365 |
महाराष्ट्र : सर्वाधिक लोकसंख्येची घनता (प्रती चौरस किमी) असलेला जिल्हा | मुंबई उपनगर (20980) |
महाराष्ट्र : सर्वात कमी लोकसंख्येची घनता (प्रती चौरस किमी) असलेला जिल्हा | गडचिरोली (74) |
महाराष्ट्र : स्त्री पुरुष प्रमाण (Sex Ratio) | 929 : 1000 |
सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेला महाराष्ट्रातील जिल्हा | रत्नागिरी (1122) |
सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण असलेला महाराष्ट्रातील जिल्हा | मुंबई शहर (832) |
महाराष्ट्राचा साक्षरता दर | 82.34% |
महाराष्ट्रातील पुरुषांचा साक्षरता दर | 88.36% |
महाराष्ट्रातील महिलांचा साक्षरता दर | 75.89% |
महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता असलेला जिल्हा | मुंबई उपनगर (89.91%) |
महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा | नंदुरबार (64.38%) |
महाराष्ट्र लोकसंख्येची घनता (प्रती चौरस किमी) सर्वाधिक असलेले जिल्हे (उतरता क्रम) खाली दिलेले आहे.
- मुंबई उपनगर (20925)
- मुंबई शहर (20038)
- ठाणे (1157)
- पुणे (603)
- कोल्हापूर (504)
महाराष्ट्र लोकसंख्येची घनता (प्रती चौरस किमी) सर्वाधिक असलेले जिल्हे (चढता क्रम) खाली दिलेले आहे.
- गडचिरोली (74)
- सिंधुदुर्ग (163)
- चंद्रपूर (192)
- रत्नागिरी (196)
- यवतमाळ (204)
महाराष्ट्र स्त्री – पुरुष प्रमाण सर्वाधिक असलेले जिल्हे (उतरता क्रम) खाली दिलेले आहे. (स्त्रियांचे प्रमाण प्रती 1000 पुरुषांमागे)
- रत्नागिरी (1122)
- सिंधुदुर्ग (1036)
- गोंदिया (999)
- सातारा (988)
- भंडारा (982)
महाराष्ट्र स्त्री – पुरुष प्रमाण सर्वात कमी असलेले जिल्हे (उतरता क्रम) खाली दिलेले आहे. (स्त्रियांचे प्रमाण प्रती 1000 पुरुषांमागे)
- बीड (916)
- पुणे (915)
- ठाणे (886)
- मुंबई उपनगर (860)
- मुंबई शहर (832)
महाराष्ट्र स्त्री – पुरुष (0-6 वर्षे बाल लिंग गुणोत्तर) प्रमाण सर्वाधिक असलेले जिल्हे (उतरता क्रम) खाली दिलेले आहे. (स्त्रियांचे प्रमाण प्रती 1000 पुरुषांमागे)
- पालघर (967)
- गडचिरोली (961)
- गोंदिया (956)
- चंद्रपूर (953)
- भंडारा (950)
महाराष्ट्र स्त्री – पुरुष (0-6 वर्षे बाल लिंग गुणोत्तर) प्रमाण सर्वात कमी असलेले जिल्हे (चढता क्रम) खाली दिलेले आहे. (स्त्रियांचे प्रमाण प्रती 1000 पुरुषांमागे)
- बीड (807)
- जळगाव (842)
- अहमदनगर (852)
- औरंगाबाद (858)
- कोल्हापूर (863)
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.