Marathi govt jobs   »   Study Materials   »   महाराष्ट्रातील महत्वाचे घाटमार्ग

महाराष्ट्रातील महत्वाचे घाटमार्ग : आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अभ्यास साहित्य

महाराष्ट्रातील महत्वाचे घाटमार्ग

महाराष्ट्रातील महत्वाचे घाटमार्ग: महाराष्ट्राचे प्रमुख तीन प्राकृतिक विभाग आहेत. कोंकण, सह्याद्री आणि महाराष्ट्र पठार. दळणवळणासाठी जेंव्हा आपल्याला कोंकणातून महाराष्ट्र पठारावर जायचे आहे किंवा महाराष्ट्र पाठरवरून कोंकणात यायचे आहे तर मध्ये सह्याद्री पर्वत येतो. आशा वेळी जिथे सह्याद्रीची ऊंची कमी आहे आशा ठिकाणी घाट मार्ग निर्माण केले आहेत. जो दोन शहरांना जोडण्याचा काम करतात. अश्या घाटमार्गांवर आपल्या स्पर्धा परीक्षेत प्रश्न विचारले जातात.आगामी काळातील आदिवासी विकास विभाग भरती 2023  व इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. यांची माहिती असणे आपल्याला आवश्यक आहे. तर चल जाणून घेऊया या घाटमार्गांबद्दल.

महाराष्ट्रातील महत्वाचे घाटमार्ग : विहंगावलोकन

स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्राच्या भूगोलावर अनेक प्रश्न विचारले जातात. त्यामुळे महाराष्ट्राचा भूगोल जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. या लेखात आपण महाराष्ट्रातील घाटमार्ग सविस्तर जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रातील महत्वाचे घाटमार्ग : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता आदिवासी विकास विभाग भरती 2023
विषय महाराष्ट्राचा भूगोल
लेखाचे नाव महाराष्ट्रातील महत्वाचे घाटमार्ग
हा लेख तुम्हाला काय प्रदान करतो?
  • महाराष्ट्रातील महत्वाचे घाटमार्ग यावर सविस्तर माहिती

महाराष्ट्रातील महत्वाचे घाटमार्ग 

पर्वतरांगेत अधूनमधून कमी उंचीचे भाग आढळतात त्यांना खिंड असे म्हणतात. या खिंडीतून वाहतुकीचे मार्ग जातात यांना घाटमार्ग म्हणतात. स्पर्धा परीक्षेमध्ये या घाटांचा क्रम, जोडणारी शहरे यांवर प्रश्न विचारले जातात. त्यानुसार या लेखात माहिती दिली गेली आहे.

घाटाचे नाव  प्रमुख मार्ग 
थळ घाट (कसारा घाट) नाशिक ते मुंबई
मालशेज घाट कल्याण (ठाणे) ते आळेफाटा (अहमदनगर)
बोर घाट (खंडाळा घाट) पुणे ते मुंबई
वरंधा घाट भोर ते महाड
खंबाटकी घाट पुणे ते सातारा
परसणी घाट पंचगणी (सातारा) ते वाई
आंबेनळी घाट राईगड ते सातारा
कुंभार्ली घाट कराड ते चिपळूण
आंबा घाट कोल्हापूर ते रत्नागिरी
फोंडा घाट कोल्हापूर ते पणजी
हनुमंते घाट कोल्हापूर ते कुडाळ
आंबोली घाट बेळगाव-सावंतवाडी-वंगुर्ला

कोल्हापूर-सावंतवाडी

कात्रज घाट पुणे ते सातारा
दिवा घाट पुणे ते बारामती

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा-महापॅक
महाराष्ट्राचा-महापॅक

Sharing is caring!

FAQs

घाटमार्ग म्हणजे काय?

पर्वतरांगेत अधूनमधून कमी उंचीचे भाग आढळतात त्यांना खिंड असे म्हणतात. या खिंडीतून वाहतुकीचे मार्ग जातात यांना घाटमार्ग म्हणतात.

महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडचा घाट कोणता आहे?

महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडचा घाट हा आंबोली घाट आहे. जो कोल्हापूरला सावंतवाडीशी जोडतो.

कराड व चिपळूण ला जोडणारा घाट कोणता आहे?

कुंभार्ली घाट हा कराड व चिपळूण ला जोडणारा घाट आहे.