Marathi govt jobs   »   Study Materials   »   शब्दसमूहाबद्दल एक शब्द

शब्दसमूहाबद्दल एक शब्द : आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अभ्यास साहित्य

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

शब्दसमूहाबद्दल एक शब्द : महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेत मराठी विषयात अनन्यसाधारण महत्व आहे. आगामी काळातील भरती जसे कि, आदिवासी विकास विभाग भरती 2023 आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणावर प्रश्न विचारले जातात. मराठी व्याकरणाचा चांगला अभ्यास केला तर आपल्याला कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न सोडवता येतात. मराठी व्याकरणातील एक प्रमुख घटक म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द. या लेखात मराठी मधील अत्यंत महत्वाचे शब्दसमूहाबद्दल एक शब्द दिले आहेत.

शब्दसमूहाबद्दल एक शब्द: विहंगावलोकन

मराठी व्याकरणाचा अभ्यास करतांना आपल्याला एकाच शब्दामध्ये त्या क्रियेचा, व्यक्तीचा किंवा वस्तूबद्दल माहिती प्राप्त होते. अश्या शब्दांना शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे म्हणतात. या लेखात मराठीमधील प्रसिद्ध शब्दसमूहाबद्दल एक शब्द दिले आहेत.

शब्दसमूहाबद्दल एक शब्द : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता आदिवासी विकास विभाग भरती 2023 आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
विषय मराठी व्याकरण
लेखाचे नाव शब्दसमूहाबद्दल एक शब्द
लेखातील प्रमुख मुद्दे
  • मराठीमधील प्रसिद्ध शब्दसमूहाबद्दल एक शब्द

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

एक शब्द वापरणाऱ्या वाक्प्रचार किंवा शब्दांच्या गटासाठी पर्यायी शब्दाला पर्यायी शब्द किंवा शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे म्हणतात. कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त अर्थ सांगण्यासाठी यांचा वापर केल्या जातो. खाली मराठीमधील महत्वाचे शब्दसमूहाबद्दल एक शब्द दिले आहे.

  • अपेक्षा नसताना घडलेली गोस्ट-  अनपेक्षित
  • आपल्याच देशात तयार  झालेली – स्वदेशी
  • मोजक्या शब्दात सांगितलेले तत्त्व – सूत्र
  • हृदयाला जाऊन भिडणारे – हृदयंगम
  • क्षणात नष्ट होणारे – क्षणभंगुर
  • दोन नद्या एकत्र येण्याचे ठिकाण – संगम
  • दगडावर कोरलेले लेख – शिलालेख
  • कथा सांगणारा – कथेकरी
  • समाजात सुधारणा घडवून आणणारा – समाजसुधारक
  • कधीही जिंकला न जाणारा – अजिंक्य
  • कपडे धुण्याचे काम करणारा – धोबी
  • कपडे शिवण्याचे काम करणारा – शिंपी
  • सहज साध्य होऊ शकणारे – सुसाध्य
  • स्वतःच लिहिलेले स्वतः विषयीचे चरित्र – आत्मचरित्र
  • खूप आयुष्य असणारा – दीर्घायुषी
  • खूप पाऊस पडणे – अतिवृष्टी
  • ज्याचा थांग लागत नाही असे – अथांग
  • देव आहे असे मानणारा – आस्तिक
  • आगावू खर्चासाठी दिलेली रक्कम – अनामत
  • ‘भले होवो’ अशी मंगल कामना करणे – आशीर्वाद
  • दक्षिण सामुद्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यत – आसेतुहिमाचल
  • अग्नीची पूजा करणारा – अग्नीपूजक
  • मोजता येणार नाही इतके – असंख्य ,अमाप
  • उदयाला येत असलेला – उदयोन्मुख
  • ज्याचा कधीच विसर पडत नाही असा – अविस्मरणीय
  • अन्नदान करणारा – अन्नदाता
  • खूप दानधर्म करणारा – दानशूर
  • जिवाला जीव देणारा- जिवलग
  • जाणून घेण्याची इच्छा असणारा – जिज्ञासू
  • दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा – कनवाळू
  • कामाची टाळाटाळ करणारा – कामचुकार
  • धर्मस्थान करणारा – धर्मसंस्थापक
  • देशासाठी झटणारा – देशभक्त ,देशभक्ती
  • कोणत्याच पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा – निष्पक्षपाती
  • खूप हट्टीपणा करणारा – दुराग्रही
  • ईश्वराचे अस्तित्व न मानणारा – नास्तिक
  • दुसऱ्यावर अवलंबून असणारा – परावलंबी
  • जुन्या मातांना चिकटून राहणारा – पुराणमतवादी ,सनातनी
  • नवीन मते स्वीकारणारा – पुरोगामी
  • दुष्काळात सापडलेले – दुष्काळग्रस्त
  • थोडक्यात समाधान मानणारा – अल्पसंतुस्ट
  • अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष ठेवणारा – अष्टावधानी
  • एखाद्या संस्थेची स्थापना करणारा – संस्थापक 
  • सेवा करणारा – सेवक
  • सत्यासाठी झगडणारा – सत्याग्रही
  • एकाच काळातील – समकालीन
  • शभंर वर्षे आयुष्य जगणारा – शतायुषी
  • स्वतःचे काम स्वतःच करणारा – स्वावलंबी
  • स्वतःच्या इच्छेप्रमाणे खैरपणे वागणारा – स्वच्छदी
  • श्रम करून जीवन जगणारा – श्रमिक
  • दुसऱ्याचे भाषण ऐकणारा – श्रोता
  • श्रद्धा देऊन वागणारा – श्रद्धाळू
  • वाट दाखविणारा – वाटाड्या
  • देशासाठी प्राण अर्पण करणारा – हुतात्मा
  • स्वतःच्या हिताचा त्याग करणारा – स्वार्थत्यागी
  • क्षमा करणारी वृत्ती असणारा – क्षमाशील
  • सभेत धीटपणे भाषण करणारा- सभाधीट
  • शत्रूकडील बातमी काढून आणणारा – हेर
  • हातात चक्र असलेला – चक्रपाणी
  • विशिष्ट ध्येय समोर ठेवून वागणारा – ध्येयनिष्ठ
  • दैवावर हवाला ठेवून वागणारा – दैववादी
  • जगाचा स्वामी – जगन्नाथ
  • श्रम न करता खाणारा – ऐतखाऊ
  • केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा – कृतज्ञ
  • केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा- कृतघ्न
  • कलेची आवड असणारा – कलाप्रेमी
  • दुसऱ्याच्या मनातले जाणणारा – मनकवडा
  • दगडावर कोरीव काम करून मूर्ती बनविणारा – मूर्तिकार 
  • उदयाला येत असणारा – उद्योमुख
  • अस्वलाचा खेळ खेळणारा – दरवेशी
  • चार रस्ते एकत्र येतात ती जागा – चौक ,चव्हाटा
  • तीन रस्ते एकत्र येतात ती जागा – तिठा
  • गावच्या न्यायनिवड्याची जागा – चावडी
  • आकाशात गमन करणारा – खग
  • पाण्यात राहणारे प्राणी – जलचर
  • न टाळता येणारे – अटळ
  • कधीही मरण नसणारे – अमर
  • ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असे – अतुलनीय
  • आवरता येणार  नाही असे – अनावर
  • वर्णन करता येणार नाही असे – अवर्णनीय
  • कधीही ज्याचं नाश नाही होत ते – अविनाशी
  • किल्याच्या भोवती बांधलेली भिंत – तट
  • मनात इच्छिलेले देणारा मणी – चिंतामणी
  • इच्छिलेली वस्तू देणारा काल्पनिक वृक्ष – कल्पवृक्ष
  • कोणत्याही क्षेत्रात एकाएकी घडून येणार मोठा बदल – क्रांती
  • हळूहळू घडून येणारा बदल – उत्क्राती
  • धान्य साठविण्याची जागा – कोठार
  • दोनदा जन्मलेला – व्दिज
  • कार्य करणारी जागा – कर्मभूमी
  • कसलाही लोभ नसलेला – निर्लोभी
  • वाटसरूंना राहुटीसाठी धर्मार्थ बांधलेली इमारत – धर्मशाळा
  • तीन महिन्यांनी प्रसिध्द होणारे – त्रैमासिक
  • पंधरा दिवसांनी प्रसिध्द होणारे – पाक्षिक
  • राजाची स्तुती करणारा – भाट
  • जणांचा कारभार – बारभाई
  • मृत्यूवर विजय मिळवणारा – मृत्युजंय
  • मोजकेच बोलणारा – मितभाषी
  • मोजकेच आहार घेणारा – मिताहारी
  • ज्याला खूप माहित आहे आसा – बहुश्रुत
  • आईवडील  नसलेला – पोरका
  • न्यायाच्या बाबतीत कठोर असणारा – न्यायनिष्ठुर
  • पुरामुळे नुकसान झालेले लोक – पूरग्रस्त
  • पाणी मिळवण्याची केलेली फुकट सोय – पाणपोई
  • मुद्याला धरून असलेले – मुद्देसूद
  • शेजाऱ्यांशी वागण्याचर कर्तव्य – शेजारधर्म
  • बोधपर वचन – सुभाषित
  • लोकांना आवडणारा – लोकप्रिय
  • संकटाचे निवारण करणारा – विघ्न्ह्रर्ता
  • वर्षाने प्रसिध्द होणारे – वार्षिक
  • स्वतःशी केलेले भाषण – स्वागत
  • राजाचे बसवायचे आसन – सिहासन
  • गुरे राखणारा – गुराखी
  • घरदार नष्ट झाले आहे असा – निर्वासित
  • घरापुढील मोकळी जागा – अंगण
  • जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ते ठिकाण – क्षितिज  
  • कष्ट करून जगणारा – श्रमजीवी
  • कमी आयुष्य असणारा – अल्पायुषी
  • कर्तव्य तत्परतेने पार पडणारा – कर्तव्यदक्ष
  • कापड विणणारा – विणकर
  • कादंबरी लिहिणारा लेखक – कादंबरीकार
  • कविता करणारी – कवयित्री
  • केवळ स्वतःचाच फायदा करू पाहणारा – स्वार्थी
  • कैदी ठेवण्याची जागा – तुरुंग
  • सूर्य मावळण्याची घटना – सूर्यास्त
  • ज्याला कधी म्हातारपण येत नाही असा – वजर
  • ठरावीक काळाच्या अंतराने प्रकाशित होणारे – नियतकालिक
  • लाज नाही असा – निर्लज्ज
  • वाद्य वाजवणारा – वादक
  • वाडवडिलांनी मिळवलेली संपत्ती – वडिलोपार्जित संपत्ती
  • स्वतःचा स्वार्थ न पाहणारा – निःस्वार्थी
  • संकटे दूर करणारा – विघ्नहर्ता
  • सूर्य उगवण्याची घटना – सूर्योदय
  • शोध लावणारा – संशोधक
  • श्रमांवर जगणारा – श्रमजीवी
  • सतत काम करणारा – दिर्घोद्योगी
  • सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय – कामधेनू
  • स्वर्गातील इंद्राची बाग – नंदनवन
  • ज्याला ऐकायला येत नाही असा – बहिरा
  • ज्याला ऐकायला व बोलायला येत नाही असा – मूकबधीर
  • घरे बांधणारा – गवंडी
  • चांदण्या रात्रीचा पंधरवडा – शुक्लपक्ष
  • चित्रे काढणारा – चित्रकार
  • जमिनीवर राहणारे प्राणी – भूचर
  • जादूचे खेळ करून दाखवणारा – जादूगार
  • जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे भासणे – आभास
  • जेथे वस्तू विकल्या जातात ती जागा – दुकान
  • सोन्याचांदीचे दागिने करणारा – सोनार
  • हत्तीला काबूत ठेवणारा – माहूत
  • हाताच्या बोटात घालायचं दागिना – अंगठी
  • हिमालयापासून कन्याकुमारीपार्यंत होडी चालवणारा – नावाडी
  • अनेक केळ्यांचा समूह – घड
  • विमान चालवणारा – वैमानिक
  • व्याख्यान देणारा – व्याख्याता
  • शत्रूला सामील झालेला – फितूर
  • शेती करणारा – शेतकरी
  • ज्याला एकही शत्रू नाही असा – अजातशत्रू
  • ज्याला आईवडील नाहीत असा – अनाथ, पोरका
  • लग्नासाठी जमलेले लोक – वर्हाडी
  • लहानांपासून वृद्ध माणसांपर्यंत – आबालवृद्ध
  • लाकूडकाम दरणारा – सुतार
  • अनेक गुरांचा समूह – कळप
  • अनेक फळांचा समूह – घोस
  • अनेक फुलांचा समूह – गुच्छ
  • अनेक माणसांचा समूह – जमाव
  • अंग चोरून काम करणारा – अंगचोर
  • उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह – धबधबा
  • झाडांची निगा राखणारा – माळी
  • तिथी (दिवस, वेळ) न ठरवता (अचानक) आलेला – अतिथी
  • दगडावर मूर्ती घडवणारा – शिल्पकार
  • दररोज प्रसिद्ध होणारे – दैनिक
  • दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे – साप्ताहिक
  • दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे – षण्मासिक
  • दारावरील पहारेकरी – द्वारपाल, दरवान
  • दुसर्यावर उपकार करणारा – परोपकारी
  • दूरदर्शनवर, आकाशवाणीवर बातम्या सांगणारा – वृत्तनिवेदक
  • 1देशाची सेवा करणारा – देशसेवक
  • देवापुढे सतत जळणारा दिवा – नंदादीप
  • नदीची सुरवात होते ती जागा – उगम
  • नाटकांत किंवा चित्रपटांत काम करणारा – अभिनेता
  • नेहमी घरात बसून राहणारा – घरकोंबडा
  • पाऊस अजिबात न पडणे – अवर्षण
  • पायात चपला वा बूट न घालता चालणारा – अनवाणी
  • पायापासून डोक्यापर्यंत – आपादमस्तक
  • पालन करणारा – पालक
  • पायी चालणारा – पादचारी
  • पूर्वी कधी घडले नाही असे – अभूतपूर्व, अपूर्व
  • फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण – सदावर्त, अन्नछत्र
  • बसगाड्या थांबण्याची जागा – बसस्थानक
  • बातमी आणून देणारा/देणारी – वार्ताहर
  • बोलता येत नाही असा – मुका
  • भाषण करणारा – वक्ता
  • माकडाचा खेळ करणारा – मदारी
  • मातीची भांडी करणारा – कुंभार
  • रणांगणावर आलेले मरण – वीरमरण
  • रोग्यांची शुश्रुषा करणारी – परिचारिका

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप 

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

शब्दसमूहाबद्दल एक शब्द कशास म्हणतात?

एक शब्द वापरणाऱ्या वाक्प्रचार किंवा शब्दांच्या गटासाठी पर्यायी शब्दाला पर्यायी शब्द किंवा शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे म्हणतात.

ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असे काय?

ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही त्याला अतुलनीय म्हणतात.

अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष ठेवणाऱ्यास काय म्हणतात?

अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष ठेवणाऱ्यास अष्टावधानी असे म्हणतात.