Marathi govt jobs   »   Study Materials   »   लिंग व वचन

लिंग व वचन : आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अभ्यास साहित्य

लिंग व वचन

महाराष्ट्रातील बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी भाषा हा विषय असतोच. मराठी भाषेत सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी व्याकरण. आदिवासी विकास विभाग भरती 2023 परीक्षेमध्ये मराठी विषयात मराठी व्याकरणावर हमखास प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मराठी व्याकरण हा कमी वेळेमध्ये जास्त गुण मिळवून देणारा विषय आहे. थोड्याशा सरावाने या विषयामध्ये जास्त गुण मिळवता येतात. आज या लेखात आपण मराठी व्याकरणातील लिंग व वचन, त्यांच्या व्याख्या व अधिक सरावासाठी त्यावर काही उदाहरणे याबद्दल माहिती पाहणार आहोत.

लिंग व वचन: विहंगावलोकन 

लिंग व वचन: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता आदिवासी विकास विभाग भरती 2023 आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
विषय मराठी व्याकरण
लेखाचे नाव लिंग व वचन
लेखातील प्रमुख मुद्दे
  • लिंग व वचन
  • नमुना प्रश्न

लिंग

लिंग: नामाच्या रूपावरुन एखादी वस्तु वास्तविक अगर काल्पनिक पुरुषजातीची आहे की, स्त्रीजातीची आहे की, दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्याचे लिंग असे म्हणतात.

मराठी भाषेत लिंगाचे तीन प्रकार पडतात.

  1. पुल्लिंगी
  2. स्त्रीलिंगी
  3. नपुसकलिंगी

लिंग भेदामुळे नामांच्या रूपात होणारे बदल

  1. ‘अ’ कारान्त पुल्लिंगी प्राणीवाचक नामांचे स्त्रीलिंगी रूप ‘ई’ कारान्त होते व त्याचे नपुसकलिंगी ‘ए’ कारान्त होते. उदा. मुलगा – मुलगी – मुलगे
  2. काही प्राणीवाचक पुल्लिंग नामांना ईन प्रत्यय लागून त्यांचे स्त्रीलिंगी रूप होतात. उदा. पाटील – पाटलीण
  3. काही प्राणीवाचक ‘अ’ कारान्त, पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रुपे ‘ई’ कारान्त होतात. उदा. दास – दासी
  4. काही आकारान्त पुल्लिंगी पदार्थ वाचक नामांना ई प्रत्यय लावून त्यांची स्त्रीलिंगी रूप बनतात. उदा. सुरा – सुरी
  5. संस्कृतातून मराठी आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूप ई प्रत्यय लागून होतात. उदा जनक – जननी
  6. काही नामांची स्त्रीलिंगी रुपे स्वतंत्ररित्या होतात. पुरुष – स्त्री
  7. मराठीतील काही शब्द निरनिराळ्या लिंगात आढळतात. उदा. व्याधी (स्त्री. पु.)
  8. परभाषेतून आलेले शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या शब्दांच्या लिंगावरून ठरवितात. उदा. क्लास(वर्ग) – पुल्लिंगी
  9. सामासिक शब्दांचे लिंग हे शेवटच्या लिंगाप्रमाणे असते. उदा. साखरभात (पु.)
  10. गरुड, टोळ, पोपट, मासा, साप, सुरवंट या प्राण्यांच्या/पक्ष्यांच्या/कीटकांच्या नामाचा उल्लेख पुल्लिंगीच करतात. तर ऊ, घार, घूस, जळू, पिसू, मैना, सुसर या प्राण्यांच्या/पक्ष्यांच्या/कीटकांच्या नामांचा उल्लेख केवळ स्त्रीलिंगीच करतात.

वचन

वचन: नामावरून जसे त्याचे लिंग समजते त्या नामाने दर्शवलेली वस्तु एक आहे की त्या वस्तु एकाहून अधिक आहेत हे ही कळते. नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो एक धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात.

मराठीत दोन वचने आहेत.

  1. एकवचन
  2. अनेकवचन

वाचनामुळे नामाच्या रुपात खालीलप्रमाणे बदल होतात.

  1. ‘आ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेक वचन ‘ए’ कारान्त होते. उदा. राजा – राजे
  2. ‘आ’ कारान्त शिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाचे रुपे दोन्ही वचनात सारखीच असतात. उदा. पक्षी – पक्षी
  3. ‘अ’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन केव्हा ‘आ’ कारान्त तर केव्हा ‘ई’ कारान्त होते. उदा. गाय – गायी
  4. ‘आ’ कारान्त स्त्रीलिंगी तत्सम नामांचे अनेकवचन एक वचनासारखेच असते. उदा. सभा -सभा
  5. ‘ऊ’ कारान्त स्त्रीलिंगी अनेक वचन ‘वा’ कारान्त होते. उदा. पिसू – पिसवा
  6. ‘ई’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन ‘या’ कारान्त होते. उदा. भाकरी – भाकऱ्या
  7. काही नामे नेहमी अनेकवचनी आढळतात. त्यांचे एकवचन होत नाही. उदा. कांजण्या

नमुना प्रश्न

Q1.विकारी शब्दांच्या ठिकाणी असलेला संख्या सुचविण्याचा गुणधर्म म्हणजे….

(a)   आगम

(b)  वचन

(c)   संख्या विशेषण

(d)  समुदायवाचक नाम

Q2.’मुलगा’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल ?

(a)   मुले

(b)  मुलगे

(c)   मुलगा

(d)  मुलांना

Q3. ‘सौ. नालिनीताई ह्या आमच्या आता विहीण बाई आहेत” या वाक्यातील ‘विहीण’ या शब्दाचे अनेकवचनी रुप ओळखा.

(a)   विहिण्या

(b)  विहिणा

(c)   विहिणी

(d)  वाहिन्या

Q4. अकारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन कसे होईल ?

(a)   उ-कारान्त

(b)  ई-कारान्त

(c)   ए-कारान्त

(d)  आ-कारान्त

Q5. पुढील शब्दातील ‘एकवचनी’ रुप ओळखा. 

(a)   भाषा

(b)  डब्या

(c)   नद्या 

(d)  वह्या

Q6. पुढे काही शब्दांची स्त्रीलिंगी रुपे दिली आहेत. 

पती-पत्नी, दीर- जाऊ, रेडा-म्हैस, तर खोंड-?

(a)   कालवड

(b)  भाटी

(c)   लांडोर

(d)  गाय

Q7.’गायरान’ या शब्दाचे लिंग ओळखा.

(a)   पुल्लिंग

(b)  नपुसकलिंग

(c)   स्त्रीलिंग

(d)  यापैकी नाही

Q8. ‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रुप ओळखा.

(a)   पंडिता

(b)  विदुषी 

(c)   हुषार

(d)  यापैकी  नाही

Q9. खाली दिलेल्या शब्दांच्या यादीतून एकाच अर्थाचे शब्द तीन वेगवेगळ्या लिंगात आढळतात. योग्य पर्याय निवडा.

(a)   कन्या, दुहिता, पोरगी, बेटी

(b)  लोटा, लोटी, लाटणे

(c)   रुमाल, पागोटे, पगडी

(d)  झरा, ओढा, नदी

Q10. पुढील पर्यायांमधून ‘बोका’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द निवडा.

(a)   बोकी

(b)  बोकीन

(c)   वरील दोन्ही

(d)  भाटी

Q11. ‘माझे गाव मला फार आवडते’.  या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा.

(a)   पुल्लिंगी

(b)  नपुसकलिंगी

(c)   स्त्रीलिंगी 

(d)  यापैकी नाही

Q12.‘दिवाळीत पणत्या लावतात’. या वाक्यातील अधोरेखित नामाचे वचन ओळखा.

(a)   एकवचन

(b)  बहुवचन

(c)   द्विवचन

(d)  अनामवचन

Q13. मला टाचण्या आणून द्या. ‘टाचण्या‘ चे वचन ओळखा.

(a)   एकवचन

(b)  उभयवचन

(c)   अनेकवचन

(d)  यापैकी नाही

Q14. ‘मडके’ या शब्दाचे अनेकवचनी रुप ओळखा.

(a)   मडके

(b)  मडक्या

(c)   मडकी

(d)  मडक

Q15. पुढील शब्दाचे अनेकवचनी रुप ओळखा.

लेखणी 

(a)   लेखणे

(b)  लेख

(c)   लेखण्या

(d)  लेखी

Solutions-

S1. Ans (b)

Sol.  

विकारी शब्दांच्या ठिकाणी असलेला संख्या सुचविण्याचा गुणधर्म म्हणजे वचन

वचन या शब्दाचा अर्थ बोलणे होय.

S2. Ans (b)

Sol. 

आकारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ‘ए’कारान्त होते.

उदा – मुलगा –  मुलगे

फळा- फळे 

वाडा -वाडे 

S3. Ans (c)

Sol. 

अकारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन ‘आ’कारान्त’ तर कधी ‘ई’कारान्त होते.

विहीण – विहिणी 

S4. Ans (c)

Sol.

‘अकारान्त नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन हे ‘ए’कारान्त होते.

उदा – घर- घरे 

शेत – शेते 

फूल -फुले

S5. Ans (a)

Sol.

एक भाषा – अनेक भाषा

नदी-नद्या, 

डबी- डब्या, 

वही- वहह्या

S6. Ans (a)

Sol.

खोंड – कालवड 

इतर काही उदाहरणे – वाघ्या-मुरळी ,उंट-सांडणी, पोपट- मैना,मोर-लांडोर,एडका-मेंढी. 

S7. Ans (b)

Sol. 

‘गायरान’ – सामासिक शब्द. 

सामासिक शब्दाचे लिंग हे शेवटच्या शब्दाप्रमाणे असते. 

ते रान – नपुसकलिंग 

S8. Ans (b)

Sol. 

विद्वान – विदुषी 

S9. Ans (c)

Sol. 

तो – रुमाल, ती -पगडी, ते – पागोटे.

S10. Ans (d)

Sol. 

बोका- भाटी 

S11. Ans (b)

Sol.

ते गाव – नपुसकलिंगी 

S12. Ans (b)

Sol.

एकवचन – पणती  

अनेकवचन-पणत्या 

S13. Ans (c)

Sol. 

एकवचन –  टाचणी 

अनेकवचन – टाचण्या 

S14. Ans (c)

Sol.

एकारान्त नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन ईकारान्त होते.

मडके – मडकी

S15. Ans (c)

Sol.

एकवचन – लेखणी 

अनेकवचन – लेखण्या 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

लिंग व वचन हा topic आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी महत्वाचा आहे का ?

होय, लिंग व वचन हा topic आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी महत्वाचा आहे.

लिंग व वचन या topic वरील आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी उपयुक्त प्रश्न - उत्तरे मला कोठे मिळतील ?

लिंग व वचन या topic वरील आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी उपयुक्त प्रश्न - उत्तरे या लेखात मिळतील.