Table of Contents
आदिवासी विकास विभाग उच्च श्रेणी लघुलेखकसाठी पात्रता निकष 2023
आदिवासी विकास विभाग पात्रता निकष 2023: कोणत्याही परीक्षेसाठी अर्ज करताना त्यातील पदांसाठी आवश्यक असणारा पात्रता निकष माहित असणे खूप गरजेचे आहे. महाराष्ट्र शासन- आदिवासी विकास विभागाने विविध संवर्गातील एकूण 602 पदांसाठी आदिवासी विकास विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. त्यातील 03 जागा उच्च श्रेणी लघुलेखक पदासाठी एकूण 18 संवर्गातील पदांसाठी ही भरती जाहीर झाली असून प्रत्येक पदासाठी पात्रता निकष वेगळा आहे. या लेखात आपण पदानुसार आदिवासी विकास विभाग उच्च श्रेणी लघुलेखकसाठी पात्रता निकष 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
आदिवासी विकास विभाग पात्रता निकष 2023: विहंगावलोकन
आदिवासी विकास भरती 2023 अंतर्गत विवध संवर्गातील एकूण 602 पदांसाठी भरती होणार आहे. आदिवासी विकास विभाग पात्रता निकष 2023 चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.
आदिवासी विकास विभाग भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
कंपनीचे नाव | आदिवासी विकास विभाग |
भरतीचे नाव | आदिवासी विकास विभाग भरती 2023 |
पदाचे नाव | गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील विविध पदे |
एकूण रिक्त पदे | 602 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा |
नोकरीचे ठिकाण | नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर |
अधिकृत संकेतस्थळ | https://tribal.maharashtra.gov.in/ |
आदिवासी विकास विभाग भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 23 नोव्हेंबर 2023 रोजी सुरु होणार असून इतर महत्वाच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. जसे आदिवासी विकास विभाग भरती 2023 च्या तारखा जाहीर होतील तसे आम्ही या लेखात अपडेट करू.
आदिवासी विकास विभाग भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
आदिवासी विकास विभाग भरती 2023 अधिसुचना तारीख | 22 नोव्हेंबर 2023 |
आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख | 23 नोव्हेंबर 2023 |
आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख | 13 डिसेंबर 2023 |
आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी परीक्षेची तारीख | लवकरच जाहीर करण्यात येईल |
आदिवासी विकास विभाग भरती 2023 उच्च श्रेणी लघुलेखकसाठी पात्रता निकष
उमेदवार हा भारतीय नागरिक व महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
वयोमर्यादा-
- जाहिरातीत नमुद केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 01.11.2023 या तारखेस गणण्यात येईल.
- जाहिरातीत नमुद केलेल्या पदांसाठी सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. एसआरव्ही- 2015/प्र.क्र.404/ कार्या.12, दिनांक 25 एप्रिल 2016 मधील तरतुदीनुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा किमान वय 18 वर्ष असावे व कमाल वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
शैक्षणिक अर्हता-
पदाचे नाव | शैक्षणिक अर्हता |
उच्च श्रेणी लघुलेखक |
अ) शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम ब)1. उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी)- शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण 2. उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी) – शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण वरील ब मधील 1 व 2 करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन 120 शब्द प्रति मिनीट असल्यास प्राधान्य) क) टंकलेखन (इंग्रजी) 40 शब्द प्रतिमिनीट ड) टंकलेखन (मराठी) 30 शब्द प्रतिमिनीट इ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी. संगणक अर्हता परीक्षा वा समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ई) सदर पदासाठी व्यावयासिक चाचणी परीक्षा नियमानुसार घेण्यात येईल. |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.