Marathi govt jobs   »   Daily Current Affairs In Marathi-7 July...

Daily Current Affairs In Marathi-7 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-7 जुलै 2021

- Adda247 Marathi

 

दैनिक चालू घडामोडी: 7 जुलै 2021

 

चालू घडामोडी हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येतात आणि ते पण खूप कमी वेळात आणि तो वेळ आपण दुसऱ्या प्रशांसाठी लावता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला 7 जुलै 2021चे सर्व महत्वाचे चालू घडामोडी पाहुयात.

 

राष्ट्रीय बातम्या

 1. सहकार चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने नवीन सहकार मंत्रालय स्थापन  केले

- Adda247 Marathi

 • भारतातील सहकारी चळवळीला चालना देण्यासाठी आणि स्वदेशी उद्योगांना उत्तेजना देण्यासाठी सरकारने सहकार मंत्रालय तयार केले आहे. लवकरच या मंत्रालयाचे मंत्री नियुक्त करण्यात येतील.
 • नवीन सहकार मंत्रालय “सहकार से समृद्धि” (सहकारातून समृद्धी) हा उद्देश साकार करण्यासाठी कार्य करेल आणि देशातील सहकारी चळवळीला चालना देण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय, कायदेशीर आणि धोरणात्मक चौकट उपलब्ध करेल.

 

2. भारत सरकारने मत्स्य शेतकर्‍यांसाठी मोबाइल अ‍ॅप ‘मत्स्य सेतु’ सुरु केले

- Adda247 Marathi

 • केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांनी ऑनलाईन कोर्स मोबाईल अ‍ॅप ‘मत्स्य सेतु’ सुरु केले आहे.
 • हैदराबादच्या राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाच्या (एनएफडीबी) अर्थसहाय्याने आयसीएआर-सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर एक्वाकल्चर (आयसीएआर-सीआयएफए), भुवनेश्वर यांनी हे अ‍ॅप विकसित केले आहे.
 • या ऑनलाईन कोर्स मुळे भारतातील मत्स्य शेतकऱ्यांना गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीतील नवनविन तंत्रज्ञान आणि पद्धती शिकता येतील.
 • अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर मासे उत्पादकांना ई-प्रमाणपत्र मिळणार आहे. तसेच या अ‍ॅप द्वारे शेतकरी तज्ञांना प्रश्न किंवा शंका देखील विचारू शकतात आणि सल्ला घेऊ शकतात.

 

राज्य बातमी

3. जयपूरमध्ये भारतातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारले जाणार

- Adda247 Marathi

 • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राजस्थान क्रिकेट असोसिएशनला (आरसीए) 100 कोटी रुपयांचे अनुदान दिले असून ते भारतातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे  क्रिकेट स्टेडियम (प्रेक्षागार) उभारण्यात वापरले जाईल.
 • हे प्रेक्षागार जयपूर मध्ये बांधण्यात येणार असून पुढील 24-30 महिन्यात त्याचे बांधकाम पूर्ण होणार आहे. प्रस्तावित स्टेडियमची क्षमता 75,000 असून त्यासाठी 290 कोटी रुपये खर्च येणार आहे.
 • यातील 100 करोड बीसीसीआय देईल आणि 100 करोड बँक कर्जाच्या स्वरुपात उभारले जातील आणि 90 करोड रुपयांचा खर्च आरसीए करणार आहे. भारतातील सर्वात मोठे प्रेक्षागार नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे आहे.

अर्थव्यवस्था बातम्या

4. जून मध्ये जीएसटीची महसूल वसुली एक लाख करोडपेक्षा कमी झाली

- Adda247 Marathi

 • सलग 8 महिन्यांकरिता 1 लाख करोड हून अधिक महसूल उत्पन्न झाल्यानंतर जून 2021 मध्ये जीएसटी महसूल वसुली 92,849 कोटी रुपयांपर्यंत घसरली आहे.
 • देशातील एकंदरीत कोव्हीड-19 परीस्थित सुधारणा झाल्यानंतर जुलै 2021 पासून जीएसटी चे महसूल उत्पन्न सतत वाढेल अशी केंद्र सरकारला अपेक्षा आहे.

मागील काही महिन्यांतील जीएसटी संकलनाची यादी

 • मे 2021: 1,02,709 कोटी रुपये
 • एप्रिल 2021: 1.41 लाख कोटी (सर्वाधिक)
 • मार्च 2021: रु. 1.24 लाख कोटी
 • फेब्रुवारी 2021: 1,13,143 कोटी रुपये
 • जानेवारी 2021: 1,19,847 कोटी रुपये

करार बातम्या

5. पाहुणचार आणि पर्यटन उद्योगाला उभारी देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने यात्रा कंपनीसह सामंजस्य करार केला

- Adda247 Marathi

 • पर्यटन आणि आतिथ्य उद्योगाला अधिक बळकट आणि सक्षम करण्याच्या उद्देशाने केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने यात्रा कंपनीसह सामंजस्य करार केला आहे.
 • पर्यटन मंत्रालय आणि भारतीय गुणवत्ता परिषद (क्यूसीआय) आयोजित कार्यक्रमात हा करार करण्यात आला.
 • सामंजस्य कराराविषयी:या करारानुसार दोन्ही पक्ष निवासव्यवस्था करणाऱ्या संस्थांना ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सी प्लॅटफॉर्मवरील (ओटीए) सिस्टम फॉर असेसमेंट, अवेयरनेस आणि ट्रेनिंग फॉर हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री (एसएएटीएचआय) वर नोंदणी करण्यास प्रोत्साहन देतील.
 • या वर्षाच्या सुरूवातीस, पर्यटन मंत्रालयाने क्लिअरट्रिप आणि इझ माय ट्रिप सह देखील सामंजस्य करार केला आहे.
 • ओटीए प्लॅटफॉर्मवर एनआयडीएचआय आणि एसएएटीएचआय येथे नोंदणीकृत निवासव्यवस्था पुरवठा संस्थाना या सामंजस्य करारा अधिक फायदा होणार आहे.
 • भारतीय गुणवत्ता परिषदेच्या सहकार्याने पर्यटन मंत्रालयाने एसएएटीएचआय (साथी) हा उपक्रम सुरु केला आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

 • पर्यटन मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र भार) : प्रह्लादसिंग पटेल

 

पुरस्कार बातम्या

6. एअर ट्रान्सपोर्ट वर्ल्डचा वर्षातील सर्वोत्तम विमान वाहतूक कंपनीचा पुरस्कार कोरियन एअरने जिंकला

- Adda247 Marathi

 • कोरियन एअरला विमान वाहतूक उद्योगातील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा एअर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड (एटीडब्ल्यू) 2021 साठीचा जगातील सर्वोत्तम विमान वाहतूक कंपनीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
 • कोव्हीड-19 मुळे झालेल्या विमान वाहतूक क्षेत्राच्या झालेल्या अभूतपूर्व हानीच्या पार्शभूमीवर या पुरस्काराचे महत्त्व अजून वाढले आहे.

व्यवसाय बातमी

7. पेटीएमने छोट्या स्वरूपातील कर्जे त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी ‘पोस्टपेड मिनी’ सुविधा सुरु केली

- Adda247 Marathi

 • पेटीएमने आदित्य बिर्ला फायनान्स लि. च्या भागीदारीत पोस्टपेड मिनी लघू कर्ज सुविधा सुरु केली आहे.
 • ज्यामुळे वापरकर्त्यांना 250 ते 1000 रुपयांपर्यंतची कर्जे सहज उपलब्ध होऊ शकतात. हे उत्पादन पेटीएमच्या ‘आता विकत घ्या, नंतर पैसे भरा’ या सेवेची पुढची पायरी असेल ज्याचा  अननुभवी कर्जदारांना फायदा होईल.
 • यामध्ये पेटीएम पोस्टपेड 0 टक्के व्याजावर कर्ज परतफेड करण्यासाठी 30 दिवसांपर्यंतची मुदत देत आहे. पेटीएम पोस्टपेडच्या त्वरित 60000 रुपयापर्यंत कर्ज योजने व्यतिरिक्त 250 ते 1000 रुपयांपर्यंतची लघू कर्जे देणार आहे.
 • याचा उपयोग ग्राहकांना त्यांचा दैनंदिन खर्च आणि मासिकबिल भरणा वेळेवर करण्यास मदत होणार आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

 • पेटीएम मुख्यालय: नोएडा, उत्तर प्रदेश
 • पेटीएम संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: विजय शेखर शर्मा
 • पेटीएम स्थापना: 2009 

नियुक्ती बातम्या

8. नेहा पारीख यांची क्राऊड सोर्सड नेव्हीगेशन अ‍ॅप ‘वेझ’च्या सीईओपदी नियुक्ती

- Adda247 Marathi

 • भारतीय-अमेरिकन नेहा पारीख यांची क्राऊड सोर्सड नेव्हीगेशन (दीकचलन) अ‍ॅप ‘वेझ’ च्या सीईओपदी नियुक्ती करण्यात असून ती गुगल ची एक उप-कंपनी आहे. वेझ अ‍ॅप 56 वेगवेगळ्या भाषांमध्ये दिशानिर्देश देऊ शकते.
 • त्याची स्थापना 2008 साली इस्रायलमध्ये झाली आणि 2013 मध्ये गुगलने  ही कंपनी 1.1अब्ज डॉलर्स (110 कोटी) ला विकत घेतली.

 

9. डिजिटल मक्तेदारी रोखण्यासाठी डीपीआयआयटीने 9 सदस्यीय गटाची स्थापना केली आहे

- Adda247 Marathi

 • डिजिटल मक्तेदारी रोखण्याच्या उद्देशाने ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) {डिजिटल व्यापाराकरिता मुक्त जाळे} च्या विकासासाठी केंद्र सरकारने नऊ-सदस्यीय गटाची स्थापना केली आहे.
 • हा ओएनडीसी प्रकल्प वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग (डीपीआयआयटी) ने सुरू केला असून त्याची अंमलबजावणी भारतीय गुणवत्ता परिषद (क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया) करणार आहे.
 • ही समिती भारत सरकारला संपूर्ण मूल्य साखळीचे डिजिटलायझेशन करणे, सर्व प्रक्रिया प्रमाणित करणे, पुरवठादारांच्या समावेशास प्रोत्साहन देणे, पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढविणे इत्यादी गोष्टींवर सल्ले देणार आहे.

समितीचे सदस्य: 

 1. नंदन निलेकणी: अ-कार्यकारी अध्यक्ष इन्फोसिस
 2. आरएस शर्मा: राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी
 3. आदिल जैनुलभाई: क्यूसीआयचे अध्यक्ष
 4. अवानाली बन्सल: अवाना कॅपिटलचे संस्थापक आणि अध्यक्ष
 5. अरविंद गुप्ता: डिजिटल इंडिया फाऊंडेशनचे सह-संस्थापक आणि प्रमुख
 6. दिलीप असबे: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
 7. सुरेश सेठी: एनएसडीएल ई-गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
 8. प्रवीण खंडेलवाल: अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे सरचिटणीस
 9. कुमार राजगोपालन: रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी

 

महत्वाचे दिवस

10. 7 जुलै: जागतिक चॉकलेट दिन

- Adda247 Marathi

 • जागतिक चॉकलेट दिन दरवर्षी 7 जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस आपल्या जीवनात चॉकलेटच्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करण्यासठी आयोजित केला जातो.
 • हा दिवस चॉकलेट खाऊन आणि प्रियजनांना वाटून साजरा केला जातो. जागतिक चॉकलेट दिन प्रथम 2009 साली साजरा करण्यात आला.
 • काही जणांच्या मतानुसार 7 जुलै 1550 रोजी युरोप मध्ये शोध लागला म्हणून त्या दिवासाची आठवण म्हणून हा दिवस पाळतात.

 

निधन बातम्या

11. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

- Adda247 Marathi

 • दिलीप कुमार या व्यावसायिक नावाने ओळखले जाणारे हिंदी चित्रपट सृष्टीतील महान अभिनेते मोहम्मद युसुफ खान यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले.
 • ते बॉलिवूडचे शोकांतिका सम्राट (ट्रॅजीडी किंग) म्हणून लोकप्रिय होते. त्यांचा शेवटचा चित्रपट 1998 सालचा ‘किला’ हा होता. 1954 साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकणारे ते पहिले अभिनेते होते.
 • त्यांनी एकूण 8 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी पेशावर (सध्याचा पाकिस्तानात) येथे झाला.
 • 1944 सालचा ज्वार भाटा हा त्यांचा पहिला चित्रपट मात्र 1947 सालच्या जुगनू या चित्रपटाने ते लोकप्रिय झाले. त्यांना 1994 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार आणि 2015 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

 

12. ‘सुपरमॅन’ चित्रपटाचे दिग्दर्शक रिचर्ड डोनर यांचे निधन

- Adda247 Marathi

 • मूळ सुपरमॅन चित्रपट, लिथल वेपन्स चित्रपट मालिका आणि ‘द गोनीज’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे प्रथितयश दिग्दर्शक रिचर्ड डोनर यांचे निधन झाले आहे.
 • ते 91 वर्षांचे होते. त्यांनी मुख्य प्रवाहातील सिनेमाच्या इतिहासातील अनेक चित्रपटशैली हाताळल्या. त्यांचा पहिला यशस्वी चित्रपट ‘द ओमेन’ नावाचा भयपट होता आणि मूळ सुपरमॅन चित्रपटाने त्यांना अमाप यश मिळवून दिले.

 

विविध बातम्या

13. ‘खादी प्राकृतिक रंगाचे’ सदिछादूत म्हणून नितीन गडकरी यांची निवड

- Adda247 Marathi

 • केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी आभासी पद्धतीने गायीच्या शेणापासून बनविलेल्या “खादी प्राकृतिक रंगाचे” अनावरण केले.
 • हा भारतातील अशाप्रकारचा पहिला व एकमेव रंग आहे. या व्यतिरिक्त नितीन गडकरी, या रंगाचा देशभरात प्रचार व्हावा आणि तरुण उद्योजकांनी अशा प्रकारच्या रंगांचे अधिकाधिक उत्पादन करावे या स्वत:च या रंगाचे सदिछादूत म्हणून काम करणार आहेत.
 • खादी व ग्रामीण उद्योग आयोग (केव्हीआयसी) चा एक घटक असलेल्या जयपूर येथील कुमारप्पा नॅशनल हँडमेड पेपर इन्स्टिट्यूट (केएनएचपीआय) च्या आवारात खादी प्राकृतिक रंगाचा  स्वयंचलित उत्पादन प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.

 

14. जिम व्हाइटहर्स्ट यांनी आयबीएम च्या अध्यक्षपदाच्या राजीनामा दिला

- Adda247 Marathi

 • जिम व्हाइटहर्स्ट यांनी आयबीएम च्या अध्यक्षपदाच्या राजीनामा दिल्याचे जाहीर केले.
 • त्यांच्या राजीनाम्यामुळे तंत्रज्ञानातील महाकाय कंपनीच्या समभांगांचे मूल्य 4.8% ने घसरून $139.83 वर आले जी मागील पाच महिन्यातील सर्वात मोठी घसरण आहे.
 • आयबीएमचे अध्यक्ष म्हणून व्हाइटहर्स्ट यांची मागील वर्षी निवड करण्यात आली होती जेव्हा अनेक वर्षातून पहिल्यांदाच कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि अध्यक्षपदी भिन्न व्यक्तींची निवड केली होती.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

 • आयबीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी: अरविंद कृष्णा
 • आयबीएम मुख्यालय: आर्मोंक, न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स

 

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Daily Current Affairs In Marathi-7 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-7 जुलै 2021 -_30.1

Sharing is caring!

Congratulations!

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

Download your free content now!

We have already received your details.

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.
Was this page helpful?