Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

7 Indian Companies Feature in Fortune Global 500 list for 2021 | 2021 च्या फॉर्च्यून ग्लोबल 500 सूचीमध्ये 7 भारतीय कंपन्यांचा समावेश

7 Indian Companies Feature in Fortune Global 500 list for 2021 | 2021 च्या फॉर्च्यून ग्लोबल 500 सूचीमध्ये 7 भारतीय कंपन्यांचा समावेश
2021 च्या फॉर्च्यून ग्लोबल 500 सूचीमध्ये 7 भारतीय कंपन्यांचा समावेश

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

2021 च्या फॉर्च्यून ग्लोबल 500 सूचीमध्ये 7 भारतीय कंपन्यांचा समावेश

सात भारतीय कंपन्यांना 2021 फॉर्च्युन ग्लोबल 500 यादीत स्थान मिळाले आहे. फॉर्च्यून ग्लोबल 500 हे जागतिक स्तरावरील आघाडीच्या 500 उपक्रमांचे वार्षिक क्रमवारी असते, जी व्यवसाय महसूलानुसार लावली जाते. मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी यादीत सर्वोच्च क्रमांकाची भारतीय कंपनी आहे, ज्याची उलाढाल जवळजवळ $ 63 अब्ज असून जागतिक स्तरावर 155 व्या स्थानावर आहे. जागतिक स्तरावर, वॉलमार्टने सलग आठव्या वर्षी आणि 1995 नंतर 16 व्या वेळी उलाढालीच्या बाबतीत अव्वल स्थान पटकावले आहे. चीनच्या या यादीत सर्वाधिक 143 कंपन्या असून  तैवानमधील कंपन्यांचा देखील यात समावेश आहे. यानंतर अनुक्रमे अमेरिका 122 आणि जपान 53 यांचा क्रमांक लागतो.

यादीतील पहिल्या 10 जागतिक कंपन्या:

  1. वॉलमार्ट (अमेरिका)
  2. स्टेट ग्रीड (चीन)
  3. अ‍ॅमेझोन (अमेरिका)
  4. चीन नॅशनल पेट्रोलियम (चीन)
  5. सिनोपेक (चीन)

यादीतील भारतीय कंपन्या:

  1. रिलायन्स इंडस्ट्रीज (155)
  2. भारतीय स्टेट बँक (205)
  3. इंडियन ऑइल (212)
  4. तेल आणि नैसर्गिक वायू (243)
  5. राजेश एक्सपोर्ट्स (348)
  6. टाटा मोटर्स (357)
  7. भारत पेट्रोलियम (394)

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!