Marathi govt jobs   »   Daily Current Affairs In Marathi-4th and...

Daily Current Affairs In Marathi-4th and 5th July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 4 आणि 5 जुलै 2021

Daily Current Affairs In Marathi-4th and 5th July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 4 आणि 5 जुलै 2021_2.1

 

दैनिक चालू घडामोडी: 4 आणि 5 जुलै 2021

 

चालू घडामोडी हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येतात आणि ते पण खूप कमी वेळात आणि तो वेळ आपण दुसऱ्या प्रशांसाठी लावता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला 4 आणि 5 जुलै 2021चे सर्व महत्वाचे चालू घडामोडी पाहुयात.

 

राज्य बातम्या

  1. जम्मू-कश्मीरने 149 वर्षांची दरबार हलविण्याची परंपरा संपुष्टात आणली

Daily Current Affairs In Marathi-4th and 5th July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 4 आणि 5 जुलै 2021_3.1

  • उन्हाळी राजधानी श्रीनगर आणि हिवाळी राजधानी जम्मू यांच्यात सरकारी कार्यालये हलविण्याच्या 149 वर्षांच्या द्विवार्षिक परंपरेला जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी औपचारिकपणे संपुष्टात आणले.
  • जम्मू आणि श्रीनगरमध्ये प्रशासनाने कर्मचार्‍यांना ‘दरबार मूव्ह’ संबंधित निवासी सोयी यंत्रणा तीन आठवड्यात रिकामे करण्याची नोटीस दिली.
  • डोगरा सम्राट महाराजा गुलाब सिंह यांनी 1872 मध्ये राजधानी हलविण्याची परंपरा सुरू केली असे मानले जाते.
  • काश्मीर आणि जम्मू भागातील दोन भिन्न भाषिक आणि सांस्कृतिक गटांमध्ये संवाद वाढविण्याचे प्रमुख माध्यम म्हणून याच्याकडे पाहिले गेल्यामुळे जम्मू-काश्मीरच्या राजकीय वर्गाने ही परंपरा 1947 नंतर सुरू ठेवली.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल: मनोज सिन्हा

 

नियुक्ती बातम्या

2. सतीश अग्निहोत्री यांनी एनएचएसआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला

Daily Current Affairs In Marathi-4th and 5th July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 4 आणि 5 जुलै 2021_4.1

  • सतीश अग्निहोत्री यांनी नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लि.(राष्ट्रीय अतिवेगवान रेल्वे निगम लि.) चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे.
  • मेगा रेल इन्फ्रास्ट्रक्चर (बृहत रेल्वे  पायाभूत सुविधा विकास) प्रोजेक्ट अंमलबजावणीचा 20 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या अग्निहोत्री यांनी या आधी  रेल्वे मंत्रालयांतर्गत ‘ए’ श्रेणीतील सार्वजनिक क्षेत्र उपक्रम असलेल्या रेल्वे विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जवळपास 9 वर्षे म्हणून काम केले आहे.

 

3. के एन भट्टाचार्जी यांची त्रिपुराचे नवीन लोकायुक्त म्हणून नियुक्ती

Daily Current Affairs In Marathi-4th and 5th July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 4 आणि 5 जुलै 2021_5.1

  • ज्येष्ठ वकील कल्याण नारायण भट्टाचार्जी यांची तीन वर्षांकरिता त्रिपुराचे तिसरे लोकायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • 2008 पासून त्रिपुरामध्ये लोकायुक्त कायदा लागू झाला आणि 2012 साली गुजरात आणि गुवाहाटीचे माजी न्यायाधीश प्रदीपकुमार सरकार यांना त्रिपुराचे पहिले लोकायुक्त नियुक्त करण्यात आले होते. लोकायुक्तपदी निवड होणारे भट्टाचार्जी पहिले वकील आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता महत्त्वाची माहिती:

  • त्रिपुराचे मुख्यमंत्री: बिप्लब कुमार देब
  • त्रिपुराचे  राज्यपाल: रमेश बैस

 

करार बातम्या

4. अ‍ॅक्सिस बँकेने डिजिटल बँकिंग सेवा सक्षम करण्यासाठी एडब्ल्यूए सह भागीदारी केली

Daily Current Affairs In Marathi-4th and 5th July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 4 आणि 5 जुलै 2021_6.1

  • देशातील तिसर्‍या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेने अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (एडब्ल्यूएस) सह बँकेच्या डिजिटल रूपांतरण उपक्रमाला अधिक बळकट करण्यासाठी बहु-वर्षीय करार केला आहे.
  • या करारमुळे एडब्ल्यूएस च्या साहय्याने बँक आपल्या ग्राहकांना 6 मिनिटांत ऑनलाईन बँक खाते उघडणे, त्वरित डिजिटल पेमेंट यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देणार आहे ज्यामुळे  बँकेच्या ग्राहकांचे समाधान 35 टक्क्यांनी वाढेल आणि आणि त्यांच्या खर्चात 24 टक्के घट होईल.

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता आवश्यक माहिती: 

  • अ‍ॅक्सिस बँक मुख्यालय: मुंबई
  • अ‍ॅक्सिस बँक स्थापना: 1993
  • अ‍ॅक्सिस बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: अमिताभ चौधरी

 

बँकिंग बातम्या

5. आरबीआयने ठोठावला पंजाब आणि सिंध बँकेला 25 लाख रुपयांचा दंड

Daily Current Affairs In Marathi-4th and 5th July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 4 आणि 5 जुलै 2021_7.1

  • बँकांमधील सायबर सुरक्षा चौकटीचे पालन न केल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब आणि सिंध बँकेला 25 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
  • पंजाब आणि सिंध बँकेने 16 आणि 20 मे 2020 दरम्यान काही सायबर घटना आरबीआयकडे नोंदवल्याची माहिती आरबीआयने दिली. त्यानुसार, आरबीआयने दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्यास दंड का लावला जाऊ नये, अशी विचारणा मध्यवर्ती बँकेने पंजाब आणि सिंध बँकेला कारणे दाखवा नोटीस च्या माध्यमातून केली आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता महत्त्वाची माहिती: 

  • पंजाब आणि सिंध बँक संस्थापक: वीरसिंग
  • पंजाब आणि सिंध बँक स्थापना: 24 जून 1908
  • पंजाब आणि सिंध बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: एस. कृष्णन

 

6. इंडियन ओव्हरसीज बँक ही दुसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक भांडवल कर्ज देणारी बँक बनली आहे 

Daily Current Affairs In Marathi-4th and 5th July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 4 आणि 5 जुलै 2021_8.1

  • इंडियन ओव्हरसीज बँक (आयओबी) 50 हजार कोटी हून अधिक बाजार भांडवलासह दुसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक (पीएसबी) बनली आहे.
  • खासगीकरणाच्या सवलतीमुळे बँकेच्या गेल्या एका महिन्यात बीएसईच्या समभागांची 80 % वृद्धी झाली आहे. बीएसई वर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार आयओबीने रु.51887 करोड बाजार मुल्यासह दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे तर पीएनबी (46411 करोड) आणि बीओबी (44112 करोड) मुल्यासह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

  • इंडियन ओव्हरसीज बँक मुख्यालय: चेन्नई
  • इंडियन ओव्हरसीज बँक स्थापना: 10 फेब्रुवारी 1937, चेन्नई
  • इंडियन ओव्हरसीज बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी: पार्थ प्रथम सेनगुप्ता
  • इंडियन ओव्हरसीज बँक संस्थापक: एम. सी. एम. चिदंबरम चेट्टीर

 

पुरस्कार बातम्या

7. इन्व्हेस्ट इंडियाने 2021 साठीचा सर्वाधिक अभिनव गुंतवणूक प्रोत्साहन संस्था पुरस्कार जिंकला

Daily Current Affairs In Marathi-4th and 5th July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 4 आणि 5 जुलै 2021_9.1

  • ओसीओ ग्लोबलतर्फे इन्व्हेस्ट इंडियाला जगातील सर्वात नाविन्यपूर्ण गुंतवणूक संस्था 2021 या पुरस्काराने सन्मानित केले आहे. ओसीओ ग्लोबल हे  परदेशी गुंतवणूकीतील अग्रणी प्राधिकरण आहे.
  • इन्व्हेस्ट इंडिया विषयी: 2009 साली स्थापन झालेला इन्व्हेस्ट इंडिया हा उद्योग व अंतर्गत व्यापार विभाग, वाणिज्य व उद्योग मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत एक ना-नफा उपक्रम आहे.ही राष्ट्रीय गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा  संस्था आहे.

 

विज्ञान आणि तंत्रज्ञान

8. इस्रो ने उपग्रह दूरचित्रवाणीसंच युक्त वर्गांच्या अंमलबजावणीसाठी संसदीय समितीला मान्यता दिली

Daily Current Affairs In Marathi-4th and 5th July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 4 आणि 5 जुलै 2021_10.1

  • भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) कोव्हीड-टाळेबंदीमुळे उद्भवलेली शिक्षणातील दरी दूर करण्यासाठी असलेल्या उपग्रह दूरचित्रवाणीसंच युक्त वर्गखोल्यांच्या अंमलबजावणीला संसदीय स्थायी शिक्षण समितीला तांत्रिक सहकार्य करण्यासाठी मान्यता दिली आहे.
  • विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील संसदीय समितीने यापूर्वी कोव्हीड-टाळेबंदीमुळे नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपग्रह दूरचित्रवाणीसंच युक्त वर्गखोल्यांची साठी तांत्रिक सहकार्य करण्याची मागणी इस्रो कडे केली होती.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

  • इस्रोचे अध्यक्ष: के. सिवन
  • इस्रो मुख्यालय: बेंगळुरू, कर्नाटक
  • इस्रोची स्थापनाः 15 ऑगस्ट 1969

 

9. भारतीय-अमेरिकन सिरीशा बंडला करणार अंतराळात उड्डाण

Daily Current Affairs In Marathi-4th and 5th July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 4 आणि 5 जुलै 2021_11.1

  • 11 जुलैला न्यू मेक्सिको येथून उड्डाण करणार्‍या व्हर्जिन गॅलॅक्टिकच्या ‘व्हीएसएस युनिटी’ मधून भारतीय वंशाची महिला सिरीशा बंडला अवकाशात प्रक्षेपण करणार आहे.
  • कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्सनंतर अंतराळात गेलेली भारतीय वंशाची ती तिसरी महिला ठरणार आहे.
  • बंडला यांच्याविषयी: वॉशिंग्टन डीसी मधील व्हर्जिन गॅलॅक्टिकच्या सरकारी कामकाजाच्या उपाध्यक्ष असलेल्या बंडला आपले वरिष्ठ आणि कंपनीचे सर्वेसर्वा रिचर्ड ब्रॅन्सन आणि इतर चार जणांसह कंपनीच्या अवकाशयानातून प्रवास करणार आहेत.
  • 34 वर्षीय बंडला मुळच्या आंध्रप्रदेशातील गुंटूरच्या आहेत.

 

संरक्षण बातम्या

10. भारतीय लष्कर प्रमुख भारतीय सैनिकांसाठीच्या युद्ध स्मारकाचे इटलीमध्ये उद्घाटन करणार

Daily Current Affairs In Marathi-4th and 5th July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 4 आणि 5 जुलै 2021_12.1

  • भारतीय लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे, युनायटेड किंगडम (यूके) आणि इटलीच्या अधिकृत दौर्‍यावर जाणार असून या दरम्यान ते आपल्या समकक्ष आणि वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.
  • या दौऱ्याचा सर्वात महत्त्वाचा बिंदू म्हणजे जनरल नरवणे यांच्या हस्ते इटलीतील प्रसिद्ध शहर कॅसिनो येथे भारतीय सैन्य स्मारकाचे उद्घाटन.
  • दुसर्‍या महायुद्धाच्या काळात माँटे कॅसिनोच्या युद्धात इटलीला फॅसिस्ट सैन्यापासून वाचवण्यासाठी लढताना 5000 हून अधिक भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती.
  • सप्टेंबर 1943 ते एप्रिल 1945 दरम्यान 50 हजाराहून अधिक भारतीय सैनिकांनी इटलीच्या मुक्तिसंग्रामात भाग घेतला होता.

 

क्रीडा बातम्या

11. नॉर्वेच्या कारस्टन वारहोलमने पुरुषांच्या 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीचा जागतिक विक्रम मोडला

Daily Current Affairs In Marathi-4th and 5th July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 4 आणि 5 जुलै 2021_13.1

  • नॉर्वेचा 25 वर्षीय खेळाडू कार्स्टन वारहोलमने बिस्लेट खेळांदरम्यान 400 मीटरच्या अडथळ्यांच्या शर्यतीतील दीर्घकाळापासून असलेला जागतिक विक्रम मोडला.
  • यापूर्वी हा विक्रम अमेरिकन अडथळा शर्यत पटू (हर्डलर) केव्हिन यंग याच्या नावे 29 वर्षे होता. स्पेनच्या बार्सिलोना येथे 1992 च्या ऑलिम्पिकमध्ये त्याने 46.78 सेकंदात हे अंतर पूर्ण केले होते आणि कार्स्टन ने हे अंतर 46.70 सेकंदाच्या अधिकृत वेळेत पार केले.

 

12. एडवर्डला मागे टाकत मिथाली राज ठरली सर्वाधिक धावा करणारी खेळाडू

Daily Current Affairs In Marathi-4th and 5th July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 4 आणि 5 जुलै 2021_14.1

  • इंग्लंडची माजी कर्णधार शार्लोट एडवर्ड्सच्या 10,273 धावांच्या विक्रमाला मागे टाकत भारतीय कर्णधार मिथाली राज महिला-क्रिकेट मध्ये सर्व प्रकारांमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे.
  • न्यूझीलंडची सुझी बेट्स 7849 धावांसह तिसऱ्या स्थानावर असून स्टेफनी टेलर (7832) आणि मेग लॅनिंग (7024) या पहिल्या पाचात आहेत. 2020 मध्ये आयसीसीच्या दशकातील एकदिवसीय संघात तिचा समावेश करण्यात आला होता.

 

13. मॅक्स व्हर्स्टापेनने फॉर्म्युला 1ऑस्ट्रियन ग्रँड प्रिक्स 2021 जिंकली

Daily Current Affairs In Marathi-4th and 5th July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 4 आणि 5 जुलै 2021_15.1

  • रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने 2021 फॉर्म्युला 1 जागतिक अजिंक्य स्पर्धेच्या हंगामातील नवव्या शर्यतीतील रेड बुल रिंगमध्ये ऑस्ट्रिया ग्रँड प्रिक्स शर्यत जिंकली.
  • मर्सिडीज-एएमजीचा वाल्टेरी बोटास दुसऱ्या स्थानावर तर मॅकलरेनचा लँडो नॉरिस आणि लुईस हॅमिल्टन अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर आले.

 

पुस्तके आणि लेखक

14. कविता राव यांनी लिहिलेले “लेडी डॉक्टर्सः द अनटोल्ड स्टोरीज ऑफ इंडियाच्या फर्स्ट वुमन इन मेडिसिन” पुस्तक प्रकाशित

Daily Current Affairs In Marathi-4th and 5th July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 4 आणि 5 जुलै 2021_16.1

  • कविता राव यांनी “लेडी डॉक्टर: द अनटोल्ड स्टोरीज ऑफ इंडियाज फर्स्ट वुमन इन मेडिसिन” नावाच्या पुस्तकाचे लेखन केले आहे.
  • इतिहासात कायम दुर्लक्षित राहिलेल्या महिला डॉक्टरांच्या कथा या पुस्तकात सापडतात उदाहरणार्थ रुखमाबाई राऊत.
  • रुखमाबाई एक भारतीय चिकित्सक आणि स्त्रीवादी होत्या. 1884 ते 1888 दरम्यानच्या बाल वधू म्हणून तिच्या विवाहाशी संबंधित असलेल्या महत्त्वाच्या कायदेशीर खटल्याच्यानिमित्ताने त्या सर्वाधिक परिचित झाल्या होत्या.

 

विविध बातम्या

15. भारत सरकारने एलआयसी अध्यक्षांच्या सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षांपर्यंत वाढविले

Daily Current Affairs In Marathi-4th and 5th July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 4 आणि 5 जुलै 2021_17.1

  • भारतीय आयुर्विमा महामंडळ (कर्मचारी) विनियम 1960 मध्ये दुरुस्ती करून सरकारने एलआयसीचे अध्यक्ष एम. आर. कुमार यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे केले आहे.
  • 30 जून 2021 रोजी शासकीय अधिसूचनेनुसार, नियमांमध्ये केलेल्या बदलांना भारतीय जीवन विमा महामंडळ (कर्मचारी) दुरुस्ती नियम, 2021 म्हटले जाईल.
  • एसबीआय सारख्या सारख्या संस्थांचा अपवाद वगळता इतर सर्व सरकारी उद्योगांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे असते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

  • एलआयसी मुख्यालय: मुंबई
  • एलआयसीची स्थापनाः 1 सप्टेंबर 1956

 

[sso_enhancement_lead_form_manual title=”मासिक चालू घडामोडी PDF | जून 2021″ button=”Download करा” pdf=”/jobs/wp-content/uploads/sites/11/2021/07/01114018/Monthly-Current-Affairs-June-2021.pdf”]

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!