Marathi govt jobs   »   Daily Current Affairs In Marathi-27 and...

Daily Current Affairs In Marathi-27 and 28 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 27 आणि 28 जून 2021

Daily Current Affairs In Marathi-27 and 28 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 27 आणि 28 जून 2021_2.1

 

दैनिक चालू घडामोडी: 27 आणि 28 जून 2021

 

चालू घडामोडी हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येतात आणि ते पण खूप कमी वेळात आणि तो वेळ आपण दुसऱ्या प्रशांसाठी लावता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला 27 आणि 28 जून 2021 चे सर्व महत्वाचे चालू घडामोडी पाहुयात.

 

राज्य बातम्या

  1. रेबीज (जलसंत्रास) मुक्त होणारे गोवा ठरले पहिले राज्य

Daily Current Affairs In Marathi-27 and 28 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 27 आणि 28 जून 2021_3.1

  • गोवा हे देशातील पहिले रेबीजमुक्त (जलसंत्रास मुक्त) राज्य बनल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. 2018 पासून राज्यात रेबीजची एकही घटना आढळली माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
  • 2014 साली सुरु केलेल्या ‘मिशन रेबीज’ अंतर्गत दरवर्षी सुमारे एक श्वानांना रेबीज विरोधी लस देण्यात आली आणि त्याच बरोबर या उपक्रमाअंतर्गत 5.2 लाख विद्यार्थ्यांना आणि 23000 शिक्षकांना या विषाणू विषयी माहिती देण्यात आली.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती:

  • गोवा राजधानी: पणजी
  • गोव्याचे राज्यपाल: भगतसिंग कोश्यारी
  • गोव्याचे मुख्यमंत्री: प्रमोद सावंत

 

आंतरराष्ट्रीय बातम्या

2. अश्गबाद – परदेशी कामगारांसाठी जगातील सर्वात महागडे शहर

Daily Current Affairs In Marathi-27 and 28 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 27 आणि 28 जून 2021_4.1

  • मध्य आशियातील तुर्कमेनिस्तानची राजधानी असलेल्या अश्गाबाद शहराला परदेशी कामगारांसाठी जगातील सर्वात महागडे शहर म्हणून घोषीत करण्यात आले आहे.
  • कन्सल्टन्सी फर्म मर्सरने केलेल्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वेक्षणात या शहराचा पहिला क्रमांक असून त्यानंतर हाँगकाँग, लेबनॉनमधील बेरूत आणि जपानमधील टोकियो अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. या वार्षिक अहवालात गृहनिर्माण, अन्न आणि वाहतूक यासारख्या खर्चाच्या किंमतीवर आधारित 209 शहरांचा समावेश आहे. 
  • अश्गाबाद विषयी: अश्गाबादआपल्या संगमरवरी इमारती आणि स्मारकांसाठी प्रसिद्ध आहे. येथे मध्य आशियातील सर्वात रंगीबेरंगी बाजारपेठ तुलतुक्का बाजार देखील आहे.
  • इतर पर्यटन आकर्षणांमध्ये नॅशनल म्युझियम, व्हाइट मार्बल, तुर्कमेनिशी केबलवे, ललित कला संग्रहालय, अलेम कल्चरल अँड एंटरटेनमेंट सेंटर आणि तुर्कमेन कार्पेट संग्रहालय आहे.
  • भारतातील शहरे: 78 व्या क्रमांकावर असलेले मुंबई हे भारतातील सर्वात महागडे शहर आहे परंतु मागील वर्षीच्या तुलनेत त्याच्या स्थानात 15 अंकांची घसरण झाली आहे. भारतातील नवी दिल्ली (117), चेन्नई (158), बेंगळुरू (170) आणि कोलकाता (181) ही इतर शहरे या यादीमध्ये आहेत.

 

अर्थव्यवस्था बातम्या

3. इंड-आरए ने भारताचा वित्तीय वर्ष 2022 मधील जीडीपीचा सुधारित विकास दर 9.6% इतका वर्तवला

Daily Current Affairs In Marathi-27 and 28 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 27 आणि 28 जून 2021_5.1

  • इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च (इंड-आरए) संस्थेने भारताचा वित्तीय वर्ष 2022 मधील जीडीपी वाढीचा दर 10.1% वरून सुधारून 9.6% केला आहे. तथापि, हा दर 31 डिसेंबर 2021 पर्यंत संपूर्ण प्रौढ लोकांचे  लसीकरण करण्यावर अवलंबून आहे.

 

नियुक्ती बातम्या

4. दक्षता आयुक्त सुरेश एन पटेल यांची कार्यवाहक सीव्हीसी म्हणून नियुक्ती

Daily Current Affairs In Marathi-27 and 28 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 27 आणि 28 जून 2021_6.1

  • सध्याचे दक्षता आयुक्त सुरेश एन पटेल यांची संजय कोठारी यांच्याजागी केंद्रीय दक्षता आयोगात कार्यवाहक केंद्रीय दक्षता आयुक्त (सीव्हीसी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • ते नवीन केंद्रीय दक्षता आयुक्त नियुक्त होईपर्यंत पदग्रहण करतील. केंद्रीय दक्षता आयोगात एक केंद्रीय आयुक्त आणि इतर दोन आयुक्त असतात, सध्या सुरेश पटेल हेच आयुक्त आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती: 

  • केंद्रीय दक्षता आयोग स्थापना: फेब्रुवारी 1964 
  • केंद्रीय दक्षता आयोग मुख्यालय: नवी दिल्ली

 

करार बातम्या

5. जेएससीए आणि सेल-बीएसएल यांच्यादरम्यान बोकारो आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणीसाठी सामंजस्य करार

Daily Current Affairs In Marathi-27 and 28 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 27 आणि 28 जून 2021_7.1

  • झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनने (जेएससीए) बोकारो शहरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या उभारणीसाठी सेलच्या बोकारो स्टील प्लांट (बीएसएल) सह सामंजस्य करार केला आहे.
  • स्टेडियमचे बांधकाम झाल्यानंतर कारो झारखंडमधील जमशेदपूर आणि रांचीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असणारे तिसरे शहर ठरेल. या कराराअंतर्गत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या बांधकामासाठी बोकारो स्टील प्लांट बोकारोच्या बालिडीह भागातील 20.17 एकर जमीन 33 वर्षांसाठी जेएससीएकडे हस्तांतरित करेल.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती:

  • झारखंडचे मुख्यमंत्री: हेमंत सोरेन
  • राज्यपाल: श्रीमती द्रौपदी मुर्मू

 

6. जागतिक बँकेने केरळ राज्यासाठी 125 दशलक्ष डॉलर्सच्या आर्थिक सहाय्याला मंजुरी दिली

Daily Current Affairs In Marathi-27 and 28 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 27 आणि 28 जून 2021_8.1

  • जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळाने नैसर्गिक आपत्ती, हवामान बदलाचे परिणाम, रोगाचा प्रादुर्भाव आणि साथीच्या आजारांविरोधात सज्जतेसाठी असलेल्या केरळ राज्याच्या  “रेझिलीअंट केरळ” (संवेदनक्षम केरळ) या कार्यक्रमासाठी 125 दशलक्ष डॉलर्स अर्थसहाय्याला मंजुरी दिली आहे.
  • आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक (आयबीआरडी) मार्फत देण्यात येणाऱ्या या कर्जाची रक्कम 14 वर्षांत परतफेड करायची असून 6 वर्षे अतिरिक्त कालावधी देण्यात आला आहे.
  • “रेझिलीअंट केरळ” कार्यक्रमाविषयी: यात शहरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुख्य योजनांमध्ये आपत्ती जोखीम नियोजन समाविष्ट केले जाईल जेणेकरून आर्थिक नुकसान कमी होईल. आरोग्य, जलव्यवस्थापन, शेती आणि रस्ते क्षेत्राला आपत्तींसाठी अधिक लवचिक अथवा संवेदनक्षम बनविण्यास येईल

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती: 

  • केरळचे मुख्यमंत्री: पिनारायी विजयन
  • केरळचे राज्यपाल: आरिफ मोहम्मद खान
  • जागतिक बँकेचे मुख्यालय: वॉशिंग्टन, डी.सी., युनायटेड स्टेट्स
  • जागतिक बँकेची स्थापना: जुलै 1944
  • जागतिक बँकेचे अध्यक्ष: डेव्हिड मालपास

 

पुरस्कार बातम्या

7. फ्रेंच लेखक इमॅन्युएल कॅरेरे यांना स्पेन चा साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार

Daily Current Affairs In Marathi-27 and 28 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 27 आणि 28 जून 2021_9.1

  • आपल्या नॉन फिक्शन (सत्य प्रसंगांवर आधारित) पुस्तकांतील उच्च साहित्यिक मूल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या फ्रेंच लेखक इमॅन्युएल कॅरेरे यांना 2021 चा स्पॅनिश प्रिन्सेस ऑफ अस्टुरियस लिटरेचर  पुरस्कार देण्यात आला आहे.
  • या पुरस्काराची रक्कम 50000 युरो असून राजकुमारी लिओनोर यांच्या नावे सुरु करण्यात आलेला.

 

8. आर.के.सभरवाल यांना मंगोलिया चा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

Daily Current Affairs In Marathi-27 and 28 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 27 आणि 28 जून 2021_10.1

  • इंजीनियर्स इंडिया लिमिटेड (ईआयएल) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी), आर. के. सभरवाल यांना मंगोलियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘द ऑर्डर ऑफ पोलर स्टार’ मंगोलीयाचे भारतातील राजदूत गोंचिंग गॅनबोल्ड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
  • मंगोलियातील पहिल्या ओईल रिफायनरीच्या स्थापनेत दिलेल्या योगदानाबद्दल मंगोलियाच्या राष्ट्रपतींतर्फे सभरवाल यांना हा सन्मान देण्यात आला.
  • ऑर्डर ऑफ पोलर स्टार’ हा मंगोलियाच्या राष्ट्राध्यक्षांमार्फत देण्यात येणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे जो मंगोलियाच्या उत्कर्षासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकांना देण्यात येतो.
  • हा पुरस्कार मंगोलियाच्या मित्र राष्ट्रांतील तसेच त्या देशातील कला, संस्कृती, विज्ञान आणि मानवता या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदानासाठी देण्यात येतो.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती:

  • मंगोलियाची राजधानी: उलानबातर
  • मंगोलिया चलन: मंगोलियन टोग्रोग
  • मंगोलियाचे अध्यक्ष: उखना खुरेलसुख

 

संरक्षण बातम्या

9. डीआरडीओने ओडिशा किनाऱ्यावरून वर्धित पिनाका क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली

Daily Current Affairs In Marathi-27 and 28 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 27 आणि 28 जून 2021_11.1

  • संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) स्वदेशी विकसित केलेल्या पिनाका रॉकेटच्या वृद्धिंगत कक्षा असलेल्या आवृत्तीची यशस्वी चाचणी केली.
  • हे क्षेपणास्त्र ओडिशा किनाऱ्यावरील चंडीपूर येथील एकात्मिक चाचणी कक्षा (इंटिग्रेटेड टेस्ट रेंज- आयटीआर) येथून मल्टी-बॅरल क्षेपणास्त्र प्रक्षेपकाद्वारे ( मल्टी-बॅरल रॉकेट लॉन्चर – एमबीआरएल) प्रक्षेपित करण्यात आले होते.
  • क्षेपणास्त्राची वृद्धिंगत भेदन कक्षा- 45 किमी. पिनाका रॉकेट यंत्रणा पुणे स्थित आर्ममेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट आस्थापना (एआरडीई) आणि हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी (एचईएमआरएल) यांनी संयुक्तपणे नागपूर येथील एम/एस  इकॉनॉमिक एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड यांच्या सहाय्याने विकसित केली आहे.

 

पुस्तके आणि लेखक

10. सुंदीप मिश्रा यांचे “फियर्सली फिमेलः द दुती चंद स्टोरी” पुस्तक प्रकाशित

Daily Current Affairs In Marathi-27 and 28 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 27 आणि 28 जून 2021_12.1

  • पत्रकार सुंदीप मिश्रा यांचे “फियर्सली फिमेलः द दुती चंद स्टोरी” हे नवीन पुस्तक प्रकाशित झाले असून त्यात दुती चंद यांचा जीवनपट उलगडण्यात आला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन वेस्टलँड बुक्स ने केले आहे.
  • दुती चंद यांच्याविषयी: दुती चंद या भारतातील पहिल्या जाहीररित्या समलैंगिक खेळाडू असून त्या नॅपल्समधील वर्ल्ड युनिव्हर्सिएड येथे 100 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय खेळाडू आहेत.
  • ओडिशाच्या एका छोट्याशा खेड्यातून येणाऱ्या दुती चंदने महिलांच्या 100 मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदविला आणि 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 100 मीटरमध्ये स्पर्धेत भाग घेणाऱ्या त्या पाचव्या भारतीय महिला धावपटू आहेत.

 

 

क्रीडा बातम्या

11. क्रिस्टियानो रोनाल्डो बनला पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये संयुक्तपणे सर्वाधिक गोल करणारा खेळाडू

Daily Current Affairs In Marathi-27 and 28 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 27 आणि 28 जून 2021_13.1

  • 1993 ते 2006 दरम्यान 149 सामन्यांत 109 वेळा गोल करणाऱ्या इराणचा दिग्गज फुटबॉलपटू अली डेई यांच्या विक्रमाशी बरोबरी करत क्रिस्टियानो रोनाल्डो पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये जगातील सर्वात जास्त गोल करणारा खेळाडू ठरला आहे.
  • रोनाल्डो ने 176 सामन्यांत 109 गोल केले आहेत.

 

12. 2021 स्टायरियन ग्रँड प्रिक्स स्पर्धा मॅक्स व्हर्स्टापेनने जिंकली

Daily Current Affairs In Marathi-27 and 28 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 27 आणि 28 जून 2021_14.1

  • 2021 स्टायरियन ग्रँड प्रिक्स शर्यत मॅक्स व्हर्स्टापेन (नेदरलँड्स-रेड बुल) ने जिंकली आहे. हे त्याचे 2021 फॉर्म्युला वन हंगामातील चौथे विजेतेपद आहे.
  • तसेच, या विजयासह, व्हर्स्टापेनने 2021 मधील फॉर्म्युला वन अजिंक्यपद स्पर्धेत 156 गुणांसह आघाडी घेतली असून हॅमिल्टन (138) गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या शर्यतीत लुईस हॅमिल्टन (ब्रिटन-मर्सिडीज) दुसऱ्या आणि व्हॅल्टेरी बोटास (फिनलँड- मर्सिडीज) तिसऱ्या स्थानावर आले.

 

महत्वाचे दिवस

13. 27 जून: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिवस

Daily Current Affairs In Marathi-27 and 28 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 27 आणि 28 जून 2021_15.1

  • स्थानिय आणि जागतिक अर्थव्यवस्थेमधील एमएसएमईच्या कार्याचा आणि शाश्वत विकासासाठी असलेल्या त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाद्वारे 2017 पासून 27 जून रोजी दरवर्षी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिवस पाळण्यात येतो.
  • शाश्वत विकास ध्येये पूर्ण करण्यासाठी या उद्योगांचे महत्त्व पटवून देणे हा सुद्धा या दिवसाचा उद्देश आहे. 2021 ची संकल्पना: “एमएसएमई 2021: सर्वसमावेशक आणि शाश्वत पुनरुत्थानाची गुरुकिल्ली” (एमएसएमई 2021: की टू अ‍ॅन इंक्लुजिव्ह अँड सस्टनेबल रिकव्हरी)

 

विविध बातम्या

14. अ‍ॅमेझॉन च्या एडब्ल्यूएसने एनक्रिप्टेड संदेशवहन अ‍ॅप ‘विकर्र’ चे अधिग्रहण केले

Daily Current Affairs In Marathi-27 and 28 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 27 आणि 28 जून 2021_16.1

  • कोव्हीड -19 च्या साथीमुळे मिश्र वातावरणात काम करायला लागणाऱ्या व्यापारी, सरकारी संस्था आणि खासगी व्यक्ती यांच्याकरिता अधिक सुरक्षित आणि त्वरित संदेश पोहोचविणाऱ्या “विकर्र” हे अ‍ॅप अ‍ॅमेझॉन च्या एडब्ल्यूएसने विकत घेतले.
  • विकर्र अ‍ॅप विषयी:  हे अ‍ॅप सर्वात सुरक्षित आणि एंड टू एंड एनक्रिप्टेड (कूटबद्ध) दळणवळण तंत्रज्ञान आहे जे इतर सामान्य संदेशवहन अ‍ॅप द्वारे उपलब्ध होत नाही.
  • हे अ‍ॅप अ‍ॅमेझॉन च्या क्लाऊड कंप्यूटिंग युनिट अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (एडब्ल्यूएस) विकत घेतले आहे. विकर्र ची स्थापना 2012 ला झाली असून याचा उपयोग प्रामुख्याने अमेरिकी सरकारी संस्था करतात.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती: 

  • अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी: जेफ बेझोस
  • अ‍ॅमेझॉनची स्थापना: 5 जुलै 1994

 

15. पैसाबाजार आणि एसबीएम बँकेने स्टेप अप क्रेडिट कार्ड सुरू केले

Daily Current Affairs In Marathi-27 and 28 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी- 27 आणि 28 जून 2021_17.1

  • पैसाबाजार.कॉम, भारतातील सर्वात मोठी कर्ज देणारी बाजारपेठ आणि क्रेडिट स्कोअर उपलब्ध करून देणारे व्यासपीठ आणि भारतातील सर्वात तरुण युनिव्हर्सल बँक, एसबीएम बँकेने “स्टेप अप क्रेडिट कार्ड” सुरु केले आहे जे कमी क्रेडीट स्कोअर असलेल्या ग्राहकांना ठराविक क्रेडीट स्कोअर तयार करण्यास मदत करणार आहे.
  • एसबीएम इंडिया बँकेच्या भागीदारीने सुरु केलेले स्टेप अप क्रेडिट कार्ड म्हणजे पैसाबाजारच्या नव-कर्ज देण्याच्या रणनीती अंतर्गत लाँच होणारे पहिले उत्पादन आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती: 

  • पैसाबाजार स्थापना: 15 डिसेंबर 2011
  • पैसाबाजार संस्थापक: नवीन कुकरेजा, यशिश दहिया

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!