दैनिक चालू घडामोडी: 25 जून 2021
चालू घडामोडी हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येतात आणि ते पण खूप कमी वेळात आणि तो वेळ आपण दुसऱ्या प्रशांसाठी लावता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला 25 जून 2021 चे सर्व महत्वाचे चालू घडामोडी पाहुयात.
अर्थव्यवस्था बातम्या
1. S & P ने वित्तीय वर्ष 2022 मधील भारताच्या वाढीचा दर 9.5% अंदाजित केला
- S & P ने भारताच्या विकासाचा दर, कोव्हीड -19 आलेल्या लाटेमुळे वित्तीय वर्ष 2022 साठी 11% वरून 9.5% पर्यंत कमी केला.आणि पुढे येणाऱ्या लाटांमुळे तो अजून खालावू शकतो अशी भीती देखील व्यक्त केली आहे तसेच 31 मार्च 2023 साली संपणाऱ्या वित्तीय वर्षाचा अंदाज 7.8% वर्तवला आहे.
नियुक्ती बातम्या
2. कर्णम मल्लेश्वरी यांची दिल्ली क्रीडा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरुपदी नियुक्ती
- दिल्ली सरकारने माजी ऑलिम्पिक पदक विजेत्या भारोत्तलनपटू कर्णम मल्लेश्वरी यांची दिल्ली क्रीडा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे. त्या ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत.
- त्यांनी 2000 सिडनी ऑलिम्पिक मध्ये भारोत्तलन स्पर्धेत ब्राँझ पदक जिंकले होते. त्यांना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.
पुरस्कार बातम्या
3. कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विमानतळ सेवा गुणवत्तेत सन्मान
- कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला (सीआयएएल) विमानतळ सेवा गुणवत्तेत आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषद (एसीआय) महासंचालकांचा रोल ऑफ एक्सलन्स (उत्कृष्ट कामगिरी) या सन्मानाने गौरविण्यात आले.
- हा सन्मान कोचीन विमानतळाला मागील 10 वर्षांत 5 व्यांदा मिळाला आहे. 2021 मध्ये सन्मान प्राप्त झालेल्या जगातील सहा विमानतळांपैकी कोचीन एक आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषद मुख्यालय: मॉन्ट्रियल, कॅनडा
- आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषद स्थापना: 1991
समिट आणि कॉन्फरन्स
4. 9 व्या आशियाई उर्जामंत्री गोलमेज परिषदेचे आयोजन भारतात
- 9 व्या आशियाई मंत्री ऊर्जामंत्री गोलमेज परिषदेचे (एएमईआर 9) आयोजन भारतात होण्यास आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंचने (आयईएफ) मान्यता दिली आहे. ही परिषद 2022 मध्ये पार पडेल या मध्ये 2018 साली अबुधाबीत झालेल्या चर्चांना पूर्णरूप देण्यात येईल.
- आयईएफचे सरचिटणीस जोसेफ मॅकमोनिगल आणि उर्जामंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यात झालेल्या आभासी बैठकीनंतर भारताने या ऊर्जा गोलमेज परिषदेचे यजमानपद स्वीकारले.
- आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंच (आयईएफ) ही जागतिक उर्जा बाजाराच्या 70 टक्के वाटा असणारी 71 सदस्यीय जगातील सर्वात मोठी उर्जा संस्था आहे. हा मंच ऊर्जा सुरक्षा, बाजार स्थिरता आणि शाश्वतआणि समावेशक भविष्यातील संक्रमणामध्ये पारदर्शकता वाढविणारी उर्जा संवाद आयोजित करते.
करार बातम्या
5. भारत आणि जागतिक बँकेदरम्यान मिझोरम राज्यासाठी 32 दशलक्ष डॉलर्स कर्जाचा करार
- मिझोरम राज्याची आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी मिझोरम सरकार, भारत सरकार आणि जागतिक बँक यांच्या दरम्यान 32 दशलक्ष डॉलर्स कर्जाचा करार करण्यात आला.
- या प्रकल्पामुळे मिझोरामच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग (डीओएचएफडब्ल्यू) आणि त्याच्या सहाय्यक संस्थांच्या कारभाराची आणि व्यवस्थापन व्यवस्थेस बळकटी मिळेल.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- जागतिक बँकेचे मुख्यालय: वॉशिंग्टन, डी.सी., युनायटेड स्टेट्स
- जागतिक बँकेची स्थापना: जुलै 1944
- जागतिक बँकेचे अध्यक्ष: डेव्हिड मालपास
- मिझोरमचे मुख्यमंत्री: पु ज़ोरमथंगा
- मिझोरमचे राज्यपाल: पी.एस. श्रीधरन पिल्लई
6. इस्रो, एनओएएच्या नेतृत्वाखालील बहुराष्ट्रीय प्रकल्पाला संयुक्त राष्ट्र संघटनेची मान्यता
- संयुक्त राष्ट्र संघटनेने “कमिटी ऑन अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईटस्, कोस्टल ऑब्झरवेशन्स, अप्लिकेशन, सर्व्हिसेस, अँड टूल्स (सीईओएस सीओएएसटी) या बहुराष्ट्रीय प्रकल्पाला अधिमान्यता दिली आहे.
- हा प्रकल्प इस्रो आणि युएस च्या एनओएएच्या (राष्ट्रीय समुद्री आणि वातावरणीय प्रशासन /नॅशनल ओशनिक अँड ऍटमोस्फीअरिक ऍडमिनीस्ट्रेशन) नेतृत्वाखाली केला जाणार आहे.
- या उपक्रमाचा उद्देश उपग्रह आणि भू-आधारित निरीक्षणाच्या आधारे किनाऱ्यावरील माहितीची अचूकता सुधारणे आणि त्याद्वारे महासागराशी निगडीत 17 शाश्वत विकास उद्दिष्टांपैकी अनेक उद्दिष्टे पूर्ण करण्यात सहाय्य करणे हा आहे.
7. एसबीआय कार्ड फॅबिंडियासह भागीदारी करून फबिंडिया एसबीआय कार्ड लॉन्च करेल
- एसबीआय कार्ड आणि देशातील कारागीरांकडून हस्तकलेच्या विविध उत्पादनांचे किरकोळ प्लॅटफॉर्म असलेल्या फॅबिनियाने “फबिंदिया एसबीआय कार्ड” नावाचे खास को-ब्रँडेड कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड सुरू करण्यासाठी भागीदारी केली आहे.
- हे कार्ड फॅबिंडिया एसबीआय कार्ड सेलेक्ट आणि फॅबिंडिया एसबीआय कार्ड अशा दोन प्रकारांमध्ये आहे. ग्राहकांना डिजिटल पेमेंट स्वीकारण्यास सक्षम बनविण्यासाठी आणि देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेस हातभार लावण्यासाठी
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे:
- एसबीआय कार्डचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: राम मोहन राव अमारा;
- एसबीआय कार्ड स्थापित: ऑक्टोबर 1998;
- एसबीआय कार्ड मुख्यालय: गुरुग्राम, हरियाणा.
बँकिंग बातम्या
8. एसबीआयने ‘आरोग्यम’ हेल्थकेअर व्यवसाय कर्ज सुरू केले
- स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) या महामारीच्या काळात आरोग्य सेवा क्षेत्रास वर्धित सहाय्य देण्याचे दृष्टीने ‘आरोग्यम’ हेल्थकेअर व्यवसाय कर्ज सुरु केले आहे.
- या उत्पादनाअंतर्गत आरोग्य सेवे करिता सर्वसमावेशक असे रु.100 करोड पर्यंतचे (भौगोलिक क्षेत्रानुसार बदलू शकते) कर्ज प्राप्त होऊ शकते ज्याची परतफेड 10 वर्षांत करणे अपेक्षित आहे. हे कर्ज नवीन व्यवसायाकरिता किंवा विस्तार करण्यासाठी मिळू शकते.
- महानगरात या कर्जाची जास्तीतजास्त रक्कम 100 करोड असून टियर I शहरांना 20 कोटी आणि टियर II ते टियर IV शहरांना 10 कोटी आहे. 2 करोड पर्यंतचे कर्ज कोणत्याही तराणाशिवाय मिळणार आहे कारण हे कर्ज मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेज (सीजीटीएमएसई) क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्टच्या हमी योजनेंतर्गत येईल
सर्व स्पर्धा परीक्षांकरिता महत्त्वाची माहिती:
- एसबीआय अध्यक्ष: दिनेशकुमार खारा.
- एसबीआय मुख्यालय: मुंबई
- एसबीआय स्थापना: 1 जुलै 1955
पुस्तके आणि लेखक
9. रस्किन बाँड यांचे ‘इट्स अ वंडरफूल लाईफ’ पुस्तक प्रसिद्ध
- भारतीय ब्रिटिश लेखक रस्किन बाँड यांनी ‘इट्स अ वंडरफुल लाइफ’ नावाच्या नवीन पुस्तकाचे लेखन केले असून ते अॅलेफ बुक कंपनीने प्रकाशित केले आहे.
- ते पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित आहेत ‘रूम ऑन द रुफ’ ही त्यांची पहिली कादंबरी आहे.
क्रीडा बातम्या
10. ऑस्ट्रेलियन जलतरणपटू कायली मॅकेउनने 100 मीटर बॅकस्ट्रोक मधील विश्वविक्रम मोडला
- ऑस्ट्रेलियन जलतरणपटू कायली मॅकेउनने 100 मीटर बॅकस्ट्रोक मधील विश्वविक्रम मोडला ऑस्ट्रेलियन जलतरणपटू कायली मॅकेउनने 2019 मधील 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारातील अमेरिकन रेगन स्मिथचा 57.77 सेकंदांचा विश्वविक्रम 57.45 सेकंद वेळ नोंदवत दक्षिण ऑस्ट्रेलियन जलतरण केंद्रात झालेल्या शर्यतीत मोडीत काढला.
संरक्षण बातम्या
11. भारताने निर्भय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली
- संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) ओडिशाच्या बालासोरमधील चंडीपुर येथे एकात्मिक चाचणी रेंज (आयटीआर) वरून 24 जून 2021 रोजी सबॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘निर्भय’ ची यशस्वी चाचणी केली. याची पहिली चाचणी 12 मार्च 2013 करण्यात आली होती.
- निर्भय हे डीआरडीओ ने विकसित केलेले भारतीय बनावटीचे लाबं पल्ल्याचे सर्व हवामानातील सबॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. (ध्वनीच्या वेगापेक्षा कमी वेगाने जाणारे)
- हे क्षेपणास्त्र एकाधिक प्लॅटफॉर्मवरुन प्रक्षेपित केले जाऊ शकते आणि पारंपारिक व आण्विक अस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. निर्भय हे दोन-चरणांचे क्षेपणास्त्र आहे.
- या क्षेपणास्त्राची लांबी 6 मीटर, रुंदी 0.52 मीटर, पंख 2.7 मीटर आणि वजन सुमारे 1500 किलो आहे. याचा मारक पल्ला सुमारे 1500 किमी आहे.
12. हिंदी महासागर प्रदेशात भारत-यूएसए दरम्यान नेव्ही पॅसेज सराव
- भारतीय नौदल आणि हवाई दलाने हिंदी महासागरीय प्रदेशात (आयओआर), अमेरिकन नेव्ही कॅरियर स्ट्राइक ग्रुप (सीएसजी) रोनाल्ड रेगन यांच्यासह दोन दिवसांच्या पॅसेज सरावास सुरुवात केली.
- भारतातर्फे पी -8 आय लाँग-रेंज सागरी गस्त विमान आणि मिग 29 के तसेच नेव्हीचे आयएनएस कोची आणि तेग या नौका सहभागी झाल्या होत्या तर युएसए कडून निमित्झ श्रेणीचे विमान वाहक रोनाल्ड रेगन, आर्लेघ बुर्के-क्लास गाईडेड-मिसाईल विनाशक यूएसएस हॅले आणि तिकोन्डरोगा क्लास गाईडेड मिसाईल क्रूझर यूएसएस शिलोह सहभागी झाले होते.
महत्वाचे दिवस
13. 25 जून: जागतिक त्वचारोग (कोड) दिवस
- व्हिटिलिगो(त्वचारोग) विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी 25 जून रोजी जागतिक व्हिटिलिगो(त्वचारोग) दिन आयोजित केला जातो.
- व्हिटिलिगो एक त्वचा विकार आहे ज्यात त्वचेचा रंग नाहीसा होऊ लागतो आणि त्वचेवर विविध आकाराचे वर्णहीन पट्टे तयार होतात. 25 जून, 2011 रोजी पहिला जागतिक त्वचारोग (कोड) दिन पाळण्यात आला.
14. 25 जून: जागतिक दर्यावर्दी दिन
- जगभरातील दर्यावर्दी आणि खलाशी जे सागरी वाहतुक करून संपूर्ण जगाला मदत करत असतात त्यांच्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुद्री संघटना (आयएमओ) दरवर्षी 25 जून रोजी जागतिक दर्यावर्दी दिन साजरा करते. 2021 हे या दिवसाचे 11 वे वर्ष आहे.
- 2021 ची संकल्पना: “दर्यावर्दी: जहाज वाहतुकीच्या भविष्याचा गाभा” (“सीफेअरर्स: ऍट द कोर ऑफ शिंपिंगज फ्युचर”) आयएमओ ने 2010 साली हा दिवस प्रस्तावित केला होता. पहिला जागतिक दर्यावर्दी दिन 2011 साली पाळण्यात आला.
निधन बातम्या
15. मॅकॅफी अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचे संस्थापक जॉन मॅकॅफी यांचे निधन
- ब्रिटिश-अमेरिकन सॉफ्टवेअर उद्योजक आणि मॅकाफी अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचे निर्माता जॉन डेव्हिड मॅकॅफी यांचे बार्सिलोना जवळ असलेल्या तुरूंगात त्यांच्या कोठडीत निधन झाले.
- करचुकवेगिरी च्या आरोपाखाली ते ऑक्टोबर 2020 पासून तुरुंगात होते. नुकतेच स्पेनच्या राष्ट्रीय न्यायलयाने त्यांचे अमेरिकेला प्रत्यार्पण करण्याची परवानगी दिली होती.
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा