Marathi govt jobs   »   Daily Current Affairs In Marathi-22 July...

Daily Current Affairs In Marathi-22 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-22 जुलै 2021

दैनिक चालू घडामोडी: 22  जुलै 2021

Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB,  अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला 22 जुलै 2021 चे सर्व महत्वाचे Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) पाहुयात.

 

राष्ट्रीय बातम्या 

 1. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी जागतिक विद्यापीठांच्या शिखर परिषद 2021 ला संबोधित केले

Daily Current Affairs In Marathi-22 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-22 जुलै 2021_40.1
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी जागतिक विद्यापीठांच्या शिखर परिषद 2021 ला संबोधित केले
  • भारताचे उपराष्ट्रपती श्री. एम. व्यंकय्या नायडू यांनी जागतिक विद्यापीठांच्या शिखर परिषदेचे उद्घाटन केले व मुख्य अतिथी या नात्याने संबोधित केले.
  • यावेळेस केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकास मंत्री श्री.धर्मेंद्र प्रधान यांनीही या शिखर परिषदेला संबोधित केले.
  • या शिखर परिषदेचे आयोजन हरियाणाच्या सोनीपत येथे ओ.पी. जिंदल विश्व विद्यालयातर्फे करण्यात आले होते.
  • शिखर परिषदेची संकल्पना होती “भविष्यातील विद्यापीठे: संस्थात्मक लवचिकता,सामाजिक उत्तरदायित्व आणि समुदाय परिणाम यांची निर्मिती करणे”. 

 

राज्य बातम्या 

 2. तेलंगणाचे सीएम केसीआर ‘तेलंगणा दलित बंधू’ योजना सुरू करणार

Daily Current Affairs In Marathi-22 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-22 जुलै 2021_50.1
तेलंगणाचे सीएम केसीआर ‘तेलंगणा दलित बंधू’ योजना सुरू करणार
  • तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव लवकरच ‘तेलंगणा दलित बंधू’ नावाची दलित सशक्तीकरण योजना हुजूरबाद विधानसभा मतदार संघातून प्रायोगिक तत्वावर सुरु करणार आहेत.
  • योजनेचा एक भाग म्हणून पात्र दलित कुटुंबांना त्यांच्या बँक खात्यात 10 लाख रुपये जमा केले जातील.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • तेलंगणाची राजधानी: हैदराबाद
  • तेलंगणाचे राज्यपाल: तामिळसाई सौंदाराजन
  • तेलंगणाचे मुख्यमंत्री: के. चंद्रशेकर राव

 

आंतरराष्ट्रीय बातम्या 

 3. पेड्रो कॅस्टिलो: पेरू देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष

Daily Current Affairs In Marathi-22 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-22 जुलै 2021_60.1
पेड्रो कॅस्टिलो: पेरू देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष
  • ग्रामीण शिक्षक-डाव्या विचारसरणीचे राजकीय नेते, पेड्रो कॅस्टिलो पेरूच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी ठरले आहे. ही या देशातील 40 वर्षातील सर्वात मोठी निवडणुक ठरली आहे.
  • कॅस्टिलो यांनी उजव्या विचारसरणीचे राजकारणी कीको फुजीमोरी यांना केवळ 44,000 मतांनी पराभूत केले.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • पेरूची राजधानी: लिमा
  • पेरूचे चलन: सोल

 

 4. एरियल हेनरी: हैतीचे नवीन पंतप्रधान

Daily Current Affairs In Marathi-22 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-22 जुलै 2021_70.1
एरियल हेनरी: हैतीचे नवीन पंतप्रधान
  • एरियल हेनरी यांनी हैतीचे पंतप्रधानपद औपचारिकपणे स्वीकारले आहे.
  • राजधानी पोर्ट-ऑ-प्रिन्समधील समारंभात त्यांनी पश्चिम गोलार्धातील सर्वात गरीब देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली.
  • अध्यक्ष जोवेल मॉस यांची हत्या झाल्यापासून निर्माण झालेल्या अनागोंदीतून बाहेर पडून देशात स्थिरता निर्माण करण्याची जबाबदारी नवीन पंतप्रधानांवर आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • हैतीची राजधानी: पोर्ट-ऑ-प्रिन्स
  • हैतीचे चलन: हैतीन गॉर्डे
  • हैती खंड: उत्तर अमेरिका

 

अर्थव्यवस्था बातम्या 

 5. ‘आयसीआयसीआय बँक एचपीसीएल सुपर सेव्हर’ क्रेडिट कार्ड सुरू

Daily Current Affairs In Marathi-22 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-22 जुलै 2021_80.1
‘आयसीआयसीआय बँक एचपीसीएल सुपर सेव्हर’ क्रेडिट कार्ड सुरू
  • आयसीआयसीआय बँकेने हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) सह को-ब्रँडेड ‘आयसीआयसीआय बँक एचपीसीएल सुपर सेव्हर क्रेडिट कार्ड’ सुरू करण्याची घोषणा केली आहे.
  • या मुळे एका ग्राहकाला एकाधिक क्रेडिट कार्ड वापरण्याचे लाभ आणि बक्षीस गुण मिळू शकतील. हे कार्ड ग्राहकांना त्यांच्या इंधन तसेच वीज आणि मोबाइल, बिग बाजार आणि डी-मार्ट सारख्या विभागीय स्टोअर आणि ई-कॉमर्स पोर्टलसह इतर रोजच्या खर्चावर उत्कृष्ट बक्षिसे आणि फायदे देते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • आयसीआयसीआय बँक मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र
  • आयसीआयसीआय बँकेचे एमडी व मुख्य कार्यकारी अधिकारी: संदीप बख्शी
  • आयसीआयसीआय बँक टॅगलाइनः हम है ना, ख्याल आपका
  • हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुख्यालय: मुंबई
  • हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी: मुकेश कुमार सुराणा

 

संरक्षण बातम्या 

 6. डीआरडीओने स्वदेशी बनावटीच्या एमपीएटीजीएम ची यशस्वी चाचणी केली

Daily Current Affairs In Marathi-22 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-22 जुलै 2021_90.1

  • संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) स्वदेशी बनावटीच्या एमपीएटीजीएम: मॅन-पोर्टेबल अँटी टॅंक गाईडेड मिसाईल (मानवाने वाहून नेण्यायोग्य रणगाडा विरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्र) च्या तिसऱ्या पिढीची सर्वात कमी भेदन काक्षेकारिता यशस्वी चाचणी केली.
  • एमपीएटीजीएम हे कमी वजन, मारा करा आणि विसरून जा पद्धतीचे क्षेपणास्त्र असून अत्याधुनिक एनिओनिक्ससह अत्याधुनिक लघू अवरक्त छायाचित्रणा सह सुसज्ज आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • डीआरडीओचे अध्यक्ष : जी. सतीश रेड्डी.
  • डीआरडीओचे मुख्यालय: नवी दिल्ली.
  • डीआरडीओची स्थापना: 1958.

 

 7. डीआरडीओने ‘आकाश-एनजी’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली

Daily Current Affairs In Marathi-22 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-22 जुलै 2021_100.1

  • संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) ओडीशाच्या किनाऱ्यावरील एकात्मिक चाचणी रेंज (आयटीआर) वरून नव्या पिढीतील आकाश क्षेपणास्त्राची (आकाश-एनजी) ची यशस्वी चाचणी केली.
  • या क्षेपणास्त्राची निर्मिती डीआरडीओच्या हैदराबाद येथील प्रयोगशाळेत झाली असून डीआरडीओच्या इतर संस्थांचा देखील सहभाग यात आहे.
  • आकाश क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेत मारा करणारे, 60 किमी भेदन कक्षा असलेले आणि 2.5 मॅक पर्यंत गती असेलेले आधुनिक क्षेपणास्त्र आहे.

 

क्रीडा बातम्या

 8. ऑस्ट्रेलिया: 2032च्या ऑलिम्पिक आणि पॅरालंपिक खेळांचे आयोजक

Daily Current Affairs In Marathi-22 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-22 जुलै 2021_110.1

  • आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहराला 2032 सालच्या  ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक व पॅरालंपिक खेळांचे यजमान शहर म्हणून घोषीत केले आहे.
  • याधी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न (1956) आणि सिडनी (2000) शहरांनी ऑलिम्पिकचे आयोजन केले आहे.
  • तीन वेगेवेगळ्या शहरांमध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करणारा ऑस्ट्रेलिया अमेरिकेनंतरचा दुसरा देश आहे.

 

 9. अमन गुलिया आणि सागर जगलान नवे कॅडेट विश्वविजेता

Daily Current Affairs In Marathi-22 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-22 जुलै 2021_120.1

  • भारताच्या युवा कुस्तीपटू अमन गुलिया आणि सागर जगलान यांनी हंगेरीतील बुडापेस्ट येथे झालेल्या कॅडेट विश्व अजिंक्यपद स्पर्धा 2021 च्या दुसर्‍या दिवशी शानदार प्रदर्शन करत आपापल्या गटातील विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले.
  • गुलियाने 48 किलो वजनी गटात अंतिम सामन्यात अमेरिकच्या ल्यूक जोसेफला 5-2 असे हरवले, तर जगलानने 80 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत जेम्स मॉकलर रौलीला 4-0 असे हरवले.

 

करार बातम्या

 10. कोटक महिंद्रा बँक आणि भारतीय नौदल यांच्यात सामंजस्य करार

Daily Current Affairs In Marathi-22 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-22 जुलै 2021_130.1

  • भारतीय नौदलाने कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन खाते चालविण्यासाठी कोटक महिंद्रा बँकेसोबत सामंजस्य करार केला आहे.
  • या करारामुळे कोटक महिंद्रा बँक नोदालाच्या कर्मचाऱ्यांना विशेष वेतन खात्यावर विविध अतिरिक्त लाभ देणार आहे जसे वैयक्तिक अपघात विमा संरक्षण, मुलांसाठी विशेष शैक्षणिक लाभ, आणि मुलींना अतिरिक्त फायदा, तसेच वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज आणि कार कर्जावरील शून्य प्रक्रिया शुल्क यासारख्या लाभ देणार आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • नौदलप्रमुख: अ‍ॅडमिरल करंबीर सिंह.
  • भारतीय नौदलाची स्थापनाः 26 जानेवारी 1950.
  • कोटक महिंद्रा बँक स्थापना: 2003
  • कोटक महिंद्रा बँक मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र
  • कोटक महिंद्रा बँकेचे एमडी व मुख्य कार्यकारी अधिकारी: उदय कोटक

 

 11. एसबीआयने केली राष्ट्रीय कॉर्पोरेट व्यवसाय प्रतिनिधी म्हणून पैसालोची निवड

Daily Current Affairs In Marathi-22 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-22 जुलै 2021_140.1

  • स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) किओस्कद्वारे बँकिंग सेवा पुरवून आर्थिक समावेश करण्यासाठी “पैसालो डिजिटल” बँकेची राष्ट्रीय कॉर्पोरेट व्यवसाय प्रतिनिधी म्हणून निवड केली आहे.
  • भारताच्या 365 दशलक्ष बँक खाते नसलेल्या लोकसंख्येसाठी लघु कर्जाच्या माध्यमातून पैसालो 8 लाख कोटी रुपयांच्या बाजारपेठेची संधी निर्माण करत आहे.
  • पैसालो डिजिटल लिमिटेड 1992 साली स्थापन झालेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे नोंदणीकृत बिगर बँकिंग वित्तीय संस्था असून ती 1995 साली सार्वजनिक लिमिटेड कंपनीत रूपांतरित झाली. सध्या कंपनी एनएसई आणि बीएसई वर सूचीबद्ध आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • एसबीआय अध्यक्ष: दिनेशकुमार खारा.
  • एसबीआय मुख्यालय: मुंबई.
  • एसबीआय स्थापना केली: 1 जुलै 1955

 

निधन बातम्या

 12. ज्येष्ठ नाटककार उर्मिल कुमार थापलियाल यांचे निधन

Daily Current Affairs In Marathi-22 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-22 जुलै 2021_150.1

  • उत्तरप्रदेशचे प्रख्यात रंगकर्मी आणि साहित्यिक उर्मिल कुमार थपलिया यांचे निधन झाले आहे. थप्पलियाल यांनी आयुष्यभर नाटकांच्या पुनरुज्जीवनासाठी आणि नाट्यगृहाच्या लोकप्रियतेसाठी काम केले.
  • ते लखनऊ येथील दर्पण या नाट्य समूहाशी निगडीत होते. त्यांनी ऑल इंडिया रेडिओवर देखील काम केले आहे.

 

नियुक्ती बातम्या 

 13. अरमाणे गिरीधर यांना एनएचएआय अध्यक्षपदाचा अतिरिक्त पदभार

Daily Current Affairs In Marathi-22 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-22 जुलै 2021_160.1

  • रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाचे (एमओआरटीएच) सचिव, अरामाणे गिरीधर (आयएएस) यांना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) च्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
  • एनएचएआयचे विद्यमान अध्यक्ष सुखबीरसिंग संधू यांची उत्तराखंडचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण स्थापना: 1988
  • भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मुख्यालय: नवी दिल्ली

 

अहवाल आणि निर्देशांक 

 14. जेएनसीएएसआर, पदार्थ विज्ञानासाठी नेचर निर्देशांकात पहिल्या पन्नासात दाखल

Daily Current Affairs In Marathi-22 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-22 जुलै 2021_170.1

  • बेंगळुरू येथील जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ऍडव्हान्सड सायंटिफिक रीसर्च (जेएनसीएएसआर) पदार्थ विज्ञानातील संशोधनाकरिता घेतलेल्या सर्वेक्षणात नेचर निर्देशांकात 23 व्या स्थानी मजल मारली आहे.
  • या निर्देशांकात ही एकमेव भारतीय संस्था असून शांघाय जिआयओ टोंग विद्यापीठ पहिल्या क्रमांकावर आहे.

 

पुरस्कार बातम्या 

 15. कचर जिल्ह्याला राष्ट्रीय रौप्य स्कॉच पुरस्कार मिळाला

Daily Current Affairs In Marathi-22 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-22 जुलै 2021_180.1

  • दीनानाथपूर बागिचा गावातील घरांमध्ये पोषण-बगीचा निर्माण करून ‘पुष्टी निर्भोर’ (पोषण-निर्भर) या प्रकल्पांतर्गत परिवर्तन आणि विकास साध्य करण्यासाठी  कचर जिल्ह्याचे उपायुक्त कीर्ती जल्ली यांनी राष्ट्रीय रौप्य स्कॉच पुरस्कार स्वीकारला. हे गाव कचर जिल्ह्यातील काटीगोरा सर्कलमधील भारत-बांगलादेश सीमेजवळ आहे.
  • या प्रकल्पांतर्गत लाभार्थ्यांमध्ये भाजीपाला, फळे आणि हर्बल वनस्पतींचे 30000 रोप वाटिकांचे वाटप करण्यात आले.प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी गावातील प्रत्येक घराने 75 मनुष्य दिवसांचे योगदान दिले.
  • महामारीच्या वेळी गावातील लोकांना स्वावलंबी होण्यासाठी  प्रशिक्षिण देणे, त्यांच्या पौष्टिक गरजा भागविण्यासाठी पुरेसे खाद्य उत्पादन घेणे आणि अतिरिक्त उत्पादन विकून पैसे कमविणे हा उद्देश होता.
  • 2003 मध्ये स्थापित, एसओओसीएच पुरस्कार लोक, प्रकल्प आणि संस्थांना सन्मान करतो जे भारताला एक चांगले राष्ट्र बनविण्यासाठी अतिरिक्त मेहनत करतात.

 

 

Daily current affairs in Marathi (दैनंदिन चालू घडामोडी) मुळे आपल्याला MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांमध्ये जसे गट ब संयुक्त आणि गट क संयुक्त विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Daily Current Affairs In Marathi-22 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-22 जुलै 2021_190.1

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Daily Current Affairs In Marathi-22 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-22 जुलै 2021_210.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

Daily Current Affairs In Marathi-22 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-22 जुलै 2021_220.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.