Marathi govt jobs   »   Daily Current Affairs In Marathi-21 July...

Daily Current Affairs In Marathi-21 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-21 जुलै 2021

Daily Current Affairs In Marathi-21 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-21 जुलै 2021_30.1

दैनिक चालू घडामोडी: 21  जुलै 2021

Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. Current Affairs (चालू घडामोडीं) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB,  अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येतात आणि ते पण खूप कमी वेळात आणि तो वेळ आपण दुसऱ्या प्रशांसाठी लावता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला 21 जुलै 2021 चे सर्व महत्वाचे Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) पाहुयात.

 

राष्ट्रीय बातम्या 

 1. भारत सरकारने ‘स्टँड अप इंडिया’ योजना 2025 पर्यंत वाढविली

Daily Current Affairs In Marathi-21 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-21 जुलै 2021_40.1

  • भारत सरकारने ‘स्टँड अप इंडिया’ योजनेचा कालावधी 2025 पर्यंत वाढवला आहे.
  • सदर योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला उद्योजकांना कर्जपुरवठा करून त्यांच्यातील उद्योजकता वाढविण्याच्या उद्देशाने 5 एप्रिल 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते सुरु करण्यात आली होती.
  • स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित वाणिज्य बँका (एससीबी)  रु. 10 लाख आणि 1 कोटी पर्यंत कर्जपुरवठा करू शकतात.

 

 2. आयओसी उत्तर प्रदेश राज्यात पहिला ‘हरित हायड्रोजन’ प्रकल्प स्थापन करणार

Daily Current Affairs In Marathi-21 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-21 जुलै 2021_50.1

  • तेल-आधारित आणि स्वच्छ अशा दोन्ही प्रकारच्या उर्जेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भारतातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (आयओसी) त्याच्या मथुरा तेलशुद्धीकरण कारखान्यात देशातील पहिला ‘हरित हायड्रोजन’ प्रकल्प स्थापन करणार आहे.
  • टीटीझेड (ताज ट्रॅपेझियम झोन) च्या निकटतेमुळे मथुराची निवड झाली आहे. हायड्रोजन हा जगाच्या उर्जेच्या गरजा भागविण्यासाठी नवीनतम स्त्रोत आहे.
  • हायड्रोजन स्वतः एक स्वच्छ इंध असले तरी त्याचे उत्पादन करतांना खूप जास्त उर्जा लागते आणि कार्बन देखील तयार होतो.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष: श्रीकांत माधव वैद्य
  • इंडियन ऑईल कॉर्पोरेशन मुख्यालय: मुंबई
  • इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची स्थापना: 30 जून 1959

 

 3. आयआयटी रोपरने ऑक्सिजन नियंत्रण उपकरण ‘एम्लेक्स’ विकसित केले

Daily Current Affairs In Marathi-21 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-21 जुलै 2021_60.1

 

  • भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) रोपरने भारतातील पहिले ऑक्सिजन नियंत्रण उपकरण ‘एम्लेक्स’ विकसित केले आहे.
  • या उपकरणाच्या मदतीने अनावश्यक वाया जाणाऱ्या ऑक्सिजनमध्ये बचत होऊन त्याऐवजी वैद्यकीय ऑक्सिजन सिलिंडर्सचे आयुष्य तीन पटीने वाढते.
  • ‘एम्लेक्स’ या उपकरणाद्वारे रुग्णाच्या स्वत:च्या श्वासोच्छवासाच्या क्रीयेनुसार ऑक्सिजनचा प्रवाह नियंत्रित केला जातो त्यामुळे दीर्घकाळ चालणा-या ऑपरेशनसाठी टाकीतील ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात बचत होते.

 

 4. नोएडा येथे भारतीय वारसा संस्थेची स्थापना होणार

Daily Current Affairs In Marathi-21 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-21 जुलै 2021_70.1

  • नोएडा येथील गौतम बुद्ध नगर येथे भारतीय वारसा संस्था स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
  • हे विद्यापीठ पुढील संस्थांचे एकत्रीकरण करून निर्माण केले जाणार आहे.
  • पुरातत्वशास्त्र संस्था (पं. दीनदयाळ उपाध्याय पुरातत्व संस्थान), भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली अंतर्गत स्कूल ऑफ आर्किव्हल स्टडीज, नॅशनल रिसर्च लॅबोरेटरी ऑफ कल्चरल प्रॉपर्टीचे  (एनआरएलसी)लखनऊ, नॅशनल म्युझियम इंस्टिट्यूट ऑफ हिस्ट्री ऑफ आर्ट, कन्सर्वेशन अँड म्यूझोलॉजी (एनएमआयसीएचएम) आणि इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स (आयजीएनसीए), नवी दिल्ली शैक्षणिक शाखा.

 

राज्य बातम्या

 5. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी राष्ट्रीय खेळांत पदक विजेत्यांना शासकीय नोकर्‍या देण्याची हमी दिली

Daily Current Affairs In Marathi-21 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-21 जुलै 2021_80.1

  • आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांनी राष्ट्रीय खेळांत पदक जिंकणाऱ्या आसामच्या सर्व खेळाडूंना यापुढे शासकीय नोकरी दिली जाईल अशी हमी दिली.
  • ज्या खेळाडूंनी या आधी राष्ट्रीय खेळांमध्ये आसामसाठी पदक जिंकले आहे त्यांना शासनाकडून 10000 रुपयांचे क्रीडा अनुदान देण्यात येणार आहे.
  • टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्याच्या तयारीत असलेल्या आसामचा मुष्टियोद्धा लोव्हलिना बोरगोहेन याला शुभेच्छा देण्यात आल्या.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • आसामचे राज्यपाल: जगदीश मुखी
  • आसामचे मुख्यमंत्री: हिमंता बिस्वा सरमा

 

 6. उत्तराखंडमधील 6 नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी नवीन प्रकल्पांना एनएमजीसीने मान्यता दिली

Daily Current Affairs In Marathi-21 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-21 जुलै 2021_90.1

  • नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा (एनएमसीजी) ने आपल्या 36 व्या कार्यकारी बैठकीत उत्तराखंडमधील सहा नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी नवीन प्रकल्पांना मान्यता दिली आहे.
  • केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) नुसार उत्तराखंडमध्ये एकूण नऊ प्रदूषित नद्या असून त्यापैकी सहा उधमसिंह नगर जिल्ह्यात असून भेला, ढेला, किच्छा, नांदोर, पिलांका आणि कोसी या नद्यांचा समावेश आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • उत्तराखंडच्या राज्यपाल: बेबी राणी मौर्य
  • उत्तराखंडचे मुख्यमंत्री: पुष्करसिंग धामी

 

 7. पेरुमकुलम हे केरळमधील पहिले ‘पुस्तकांचे गाव’ ठरले आहे

Daily Current Affairs In Marathi-21 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-21 जुलै 2021_100.1

  • कोल्लम जिल्ह्यातील पेरुमकुलम या गावाला केरळचे पहिले ‘पुस्तकांचे गाव’ घोषीत करण्यात आले आहे.
  • वाचनाची सवय वाढविण्याच्या उद्देशाने वर्षानुवर्षे केलेल्या प्रयत्नांमधून प्रसिद्ध झालेले, पेरुमकुलम हे कोल्लम जिल्ह्यातील कोट्टारकरा जवळील कुलक्कड येथील एक लहान गाव आहे.
  • महान मल्याळम लेखक एम.टी. वासुदेव नायर यांनी या गावाचे ‘पुस्तकांचे  गाव’ म्हणून त्याचे कौतुक केले आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • केरळचे मुख्यमंत्री: पिनारई विजयन
  • केरळचे राज्यपाल: आरिफ मोहम्मद खान

 

अर्थव्यवस्था बातम्या

 8. वित्तीय वर्ष 2022 मध्ये भारताच्या आर्थिक वाढीचा दर 10 % असेल असा अंदाज एडीबीने वर्तवला

Daily Current Affairs In Marathi-21 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-21 जुलै 2021_110.1

  • आशियाई  विकास बँकेने (एडीबी) वित्तीय वर्ष 2021-2022 मध्ये भारताच्या आर्थिक वाढीचा दर 10 % असेल असा अंदाज वर्तवला आहे.
  • जुलै महिन्यातील आशियाई विकास दृष्टीकोन (एडीओ) मध्ये त्यांनी ही माहिती दिली. याआधी एडीबीने भारताची आर्थिक वाढ वित्तीय वर्ष 2022 मध्ये 11% असेल असे वर्तवले होते.
  • तसेच वित्तीय वर्ष 2022-2023 हीच वाढ आधीच्या 7% ऐवजी 7.5 % होईल असे सांगितले आहे.

 

 9. गोल्डमन सॅचने हैदराबाद येथे जागतिक केंद्र सुरु केले

Daily Current Affairs In Marathi-21 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-21 जुलै 2021_120.1

  • बँकिंग आणि वित्तीय सेवा प्रमुख गोल्डमन सॅचने भारतातील अभियांत्रिकी आणि व्यवसाय नाविन्यपूर्णतेचे जागतिक केंद्र बनविण्याच्या प्रतिबद्धतेचा एक भाग म्हणून हैदराबादमध्ये एक नवीन सुविधा सुरू केली आहे.
  • नवीन कार्यालयामध्ये वर्षाच्या अखेरीस सुमारे 800 लोक असतील आणि 2023 पर्यंत ते 2,500 पेक्षा जास्त लोक तिथे कार्य करतील अशी अपेक्षा आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • गोल्डमन सॅचचे मुख्य कार्यकारी अधिकारी: डेव्हिड एम. सोलोमन
  • गोल्डमन सॅचचे मुख्यालय: न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स
  • गोल्डमन सॅचची स्थापना: 1869

 

संरक्षण बातम्या 

 10. रशियाने एस -500 क्षेपणास्त्र यंत्रणेची यशस्वी चाचणी केली

Daily Current Affairs In Marathi-21 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-21 जुलै 2021_130.1

  • 20 जुलै 2021 रोजी रशियाने दक्षिणी प्रशिक्षण श्रेणी, कपुस्टिन यार येथून आपल्या नवीन एस -500 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणेची यशस्वी चाचणी केली.
  • अल्माझ-अँटी एअर डिफेन्स कन्सर्न या कंपनीने एस -500 क्षेपणास्त्र यंत्रणा विकसित केली आहे.
  • एस -500 ही जगातील सर्वात आधुनिक क्षेपणास्त्र-विरोधी प्रणाली असून त्याची कक्षा 600 किलोमीटर असेल.
  • या क्षेपणास्त्रास प्रोमेटे किंवा 55आर6एम “ट्रायूमफेटर-एम” म्हणूनही ओळखले जाते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • रशियाचे अध्यक्ष: व्लादिमीर पुतिन
  • रशियाची राजधानी: मॉस्को
  • रशियाची चलन: रशियन रूबल

 

 11. भारतीय नौसेनाला 25 रिमोट कंट्रोल बंदुकी ओएफटी कडून सुपूर्द

Daily Current Affairs In Marathi-21 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-21 जुलै 2021_140.1

  • तिरुचिराप्पल्ली येथील ऑर्डनन्स फॅक्टरी ने 12.7 मिमी एम 2 नाटोची स्थिरीकृत 15  रिमोट कंट्रोल बंदुकी भारतीय नौदलाला आणि 10 भारतीय तटरक्षक दलाला सुपूर्द केल्या आहेत.
  • या बंदुकींची निर्मिती इस्राईलच्या एल्बिट सिस्टम्सकडून तंत्रज्ञानाच्या  हस्तांतरणा कराराच्या द्वारे करण्यात आली आहे.
  • ही बंदूक सीसीडी कॅमेरा, थर्मल इमेजर आणि दिवसरात्र लक्ष्यांचे निरीक्षण आणि शोध घेण्यासाठी लेसर श्रेणी शोधक ने सुसज्ज आहे.

 

नियुक्ती बातम्या 

 12. मुख्तार अब्बास नक्वी यांची राज्यसभेच्या उपनेतेपदी नियुक्ती

Daily Current Affairs In Marathi-21 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-21 जुलै 2021_150.1

  • भारतीय जनता पक्षाने (भाजपा) केंद्रीय अल्पसंख्यांक कार्यमंत्री, मुख्तार अब्बास नक्वी यांची राज्यसभेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली.
  • नुकतेच राज्यसभेच्या नेतेपदी नियुक्ती झालेल्या  पियुष गोयल यांच्या जागी नक्वी यांची नियुक्ती करण्यात आली.

 

विविध बातम्या 

 13. जेफ बेझोस यांनी न्यू शेपर्ड रॉकेटच्या सहाय्याने अवकाशात प्रक्षेपण केले

Daily Current Affairs In Marathi-21 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-21 जुलै 2021_160.1

  • जेफ बेझोस यांनी न्यू शेपर्ड रॉकेटच्या सहाय्याने अवकाशात प्रक्षेपण केले.
  • त्यांच्या समवेत त्यांचे बंधू मार्क बेझोस, 82 वर्षीय वॉली फ़ंक आणि 18 वर्षीय विद्यार्थी ऑलिव्हर डीमन यांचा समावेश आहे.
  • बेजोस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ कंपनीने न्यू शेपर्ड हे अंतराळ पर्यटनासाठी वाढत्या बाजारपेठेची सेवा करण्यासाठी यान डिझाइन केलेले आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी: अँड्र्यू आर. जॉसी
  • अ‍ॅमेझॉनची स्थापना: 5 जुलै 1994

 

 14. चीनने 600 किमी प्रतितास धावणाऱ्या मॅगलेव्ह ट्रेनचे अनावरण केले

Daily Current Affairs In Marathi-21 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-21 जुलै 2021_170.1

  • चीनने 600 किमी प्रतितास धावणाऱ्या जगातील सर्वात वेगवान मॅगलेव्ह ट्रेनचे अनावरण केले.
  • ही ट्रेन चीन ने स्वत: विकसित केली असून किनिंगदाओ शहरात तिची निर्मिती करण्यात आली आहे.
  • विद्युतचुंबकीय बलाचा वापर करून निर्माण केलेली ही ट्रेन ट्रॅकच्या वर तरंगते त्यामुळे कोणतेही घर्षण होणार नाही.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • चीनची राजधानी: बीजिंग
  • चीनचे चलन: रेन्मिन्बी
  • चीनचे अध्यक्ष: शी जिनपिंग

 

15. एलआयसीने आरोग्य रक्षक विमा योजना सुरू केली

Daily Current Affairs In Marathi-21 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-21 जुलै 2021_180.1

  • भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एलआयसी) आरोग्य रक्षक ही नॉन-लिंक्ड, भाग न घेणारी, नियमित प्रीमियम, वैयक्तिक, आरोग्य विमा योजना सुरू केली आहे.
  • या योजनेत विशिष्ट आरोग्य जोखमींच्या विरूद्ध निश्चित लाभ आरोग्य विमा संरक्षण देण्यात आले आहे. हे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर सहाय्य करते आणि विमाधारकास आणि त्याच्या कुटुंबास कठीण काळात आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहण्यास मदत करते.
  • आरोग्य रक्षक पॉलिसी प्रत्यक्ष वैद्यकीय उपचारांच्या खर्चाकडे दुर्लक्ष करून विम्याच्या रक्कमेइतकी लम्प सम रकमेचा लाभ देते.
  • व्यक्ती स्वत: साठी तसेच (विमाधारकाचा प्रमुख म्हणून), त्यांचे जीवनसाथी, सर्व मुले आणि पालक एकाच पॉलिसीखाली विमा घेऊ शकतात.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे:

  • एलआयसी मुख्यालय: मुंबई;
  • एलआयसीची स्थापनाः 1 सप्टेंबर 1956;
  • एलआयसीचे अध्यक्ष: एम. आर. कुमार.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Daily Current Affairs In Marathi-21 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-21 जुलै 2021_190.1

 

 

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Daily Current Affairs In Marathi-21 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-21 जुलै 2021_210.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

Daily Current Affairs In Marathi-21 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-21 जुलै 2021_220.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.