Marathi govt jobs   »   Daily Current Affairs In Marathi |...

Daily Current Affairs In Marathi | 19 June 2021 Important Current Affairs In Marathi

Daily Current Affairs In Marathi | 19 June 2021 Important Current Affairs In Marathi_30.1

 

दैनिक चालू घडामोडी: 19 जून 2021

 

चालू घडामोडी हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येतात आणि ते पण खूप कमी वेळात आणि तो वेळ आपण दुसऱ्या प्रशांसाठी लावता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला 19 जून 2021 चे सर्व महत्वाचे चालू घडामोडी पाहुयात.

 

राष्ट्रीय बातम्या

  1. पंतप्रधान मोदींनी एक लाख ‘कोविड योद्धे’ प्रशिक्षित करण्यासाठी क्रॅश कोर्स घोषीत केला

Daily Current Affairs In Marathi | 19 June 2021 Important Current Affairs In Marathi_40.1

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भविष्यातील उद्भवू शकणाऱ्या कोव्हीड महामारीचा मुकाबला करण्यासाठी एका लाखाहून अधिक कोव्हीड योद्धांना प्रशिक्षण देण्यासाठी एक क्रॅश कोर्स (संक्षिप्त उपक्रम) घोषीत केला आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम, पुढील 2-3 महिन्यात, 26 राज्यातून 111 प्रशिक्षण केंद्रांत घेण्यात येणार आहे.
  • कोविड योद्धांना 6 प्रकारच्या कामांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे- गृह संगोपन आधार, मुलभूत संगोपन आधार, प्रगत संगोपन आधार, आपत्कालीन संगोपन आधार, नमुना संकलन आणि वैद्यकीय उपकरणे हाताळणे.

राज्य बातम्या

2. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी ‘जहां वोट, वहां व्हॅक्सीनेशन’ मोहीम सुरू केली

Daily Current Affairs In Marathi | 19 June 2021 Important Current Affairs In Marathi_50.1

  • दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येत्या चार आठवड्यांत दिल्लीत कोव्हीड -19 च्या विरुद्ध 45 वर्षांवरील सर्व लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवून ‘जहां वोट, वहां व्हॅक्सीनेशन’ (जिथे मतदान तिथे लसीकरण) हे अभियान सुरू केले आहे.
  • दिल्लीत जवळपास 57 लाख लोक 45 वर्षाच्या वर आहेत.यासाठी बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांना (बीएलओ) प्रशिक्षण दिले जात आहे. बीएलओ प्रत्येक घरात जाऊन तिथे  45 वर्षांवरील लोक राहतात का याची चौकशी करतील आणि असल्यास हे अधिकारी नजीकच्या बूथवर लसीकरणासाठी उपलब्ध असलेल्या जागांची माहिती देतील.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

  • दिल्लीचे मुख्यमंत्री: अरविंद केजरीवाल
  • दिल्लीचे नायब राज्यपाल: अनिल बैजल.

 

पुरस्कार बातम्या

3. पर्यावरणीय संस्था ‘फॅमिलीयल फॉरेस्ट्री’ ने जिंकला प्रतिष्ठित यूएन पुरस्कार
Daily Current Affairs In Marathi | 19 June 2021 Important Current Affairs In Marathi_60.1
  • 2021 ‘लँड फॉर लाइफ’ पुरस्कार राजस्थानच्या ‘फॅमिलीअल फॉरेस्ट्रीने’ जिंकला आहे, ही एक अद्वितीय संकल्पना आहे जी एका कुटुंबाला एका झाडाशी जोडते आणि त्या कुटुंबाचा हरित सदस्य म्हणून वाढवले जाते.
  • वाळवंटीकरणाशी लढण्यासाठी युएन चा करार (यूएनसीसीडी) दर दोन वर्षांनी ‘लँड फॉर लाइफ’ पुरस्काराचे वितरण करते जो जमीनाचा तोल सांभाळण्याच्या नाविन्यपूर्ण प्रयत्नांना अधोरेखित करतो.
  • 2021 ची संकल्पना: “निरोगी जमीन, निरोगी जीवन”. या पुरस्काराची सुरुवात 2011 च्या यूएनसीसीडी च्या 10 व्या बैठीकीत झाली. आणि हा पुरस्कार जमीन संवर्धन आणि जीर्णोद्धारासंदर्भात जगातील सर्वोच्च मानला जातो.
फॅमिलीअल फॉरेस्ट्री संस्थेविषयी: 
  • स्थापना- पर्यावरण कार्यकर्ते श्याम सुंदर ज्यानी यांनी 15 वर्षांपूर्वी केली.
  • मागील 15 वर्षांत वायव्य राजस्थानातील वाळवंटी प्रदेशातील सुमारे 15000 गावांनी मिळून 25 लाखाहून अधिक रोपट्यांची लागवड केली आहे ज्यात विद्यार्थी आणि वाळवंटातील रहिवाश्यांनी पुढाकार घेतला आहे.

 

4. एलटीआयला स्नोफ्लेक ग्लोबल इनोव्हेशन पार्टनर ऑफ द इयर पुरस्कार 

Daily Current Affairs In Marathi | 19 June 2021 Important Current Affairs In Marathi_70.1

  • डेटा क्लाऊड कंपनी स्नोफ्लेक यांनी जागतिक तंत्रज्ञान सल्लागार आणि डिजिटल सोल्यूशन कंपनी लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक ला “ग्लोबल इनोव्हेशन पार्टनर ऑफ द इयर”(वर्षातील सर्वोत्कृष्ट जागतिक नवकल्पना भागीदार) म्हणून मान्यता दिली आहे. स्नोफ्लेक भागीदार आभासी शिखर परिषदेदरम्यान एलटीआयला ही प्रतिष्ठित मान्यता मिळाली

 

5. रीन्यू पॉवर चे सीएमडी सुमंत सिन्हा यांना यूएनजीसीने एसडीजी प्रणेते म्हणून मान्यता

Daily Current Affairs In Marathi | 19 June 2021 Important Current Affairs In Marathi_80.1

  • यूएन नेशन्स ग्लोबल कॉम्पॅक्टने रीन्यू पॉवर चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुमंत सिन्हा यांना त्यांच्या स्वच्छ आणि परवडणाऱ्या उर्जेची सुगमता वाढविण्याच्या कार्याचा गौरव म्हणून 2021 साठी दहापैकी एक एसडीजी प्रणेते म्हणून नियुक्ती केली आहे.
  • शाश्वत विकास उद्दिष्टांची पूर्तता करण्यसाठी विलक्षण कार्य करणाऱ्या व्यावसायिकांचे यूएन ग्लोबल कॉम्पॅक्ट एसडीजी प्रणेते म्हणून नामनिर्देशन करते. हा सुमंत यांच्या  स्वच्छ आणि परवडणाऱ्या उर्जेची सुगमता वाढविण्याच्या कार्याला (एसडीजी 7) मिळालेली मान्यताच आहे.

 

बँकिंग बातम्या

6. इंडसइंड बँकेने सुरु केले “इंडसएसी क्रेडिट” डिजिटल कर्ज वितरणाचे व्यासपीठ

Daily Current Affairs In Marathi | 19 June 2021 Important Current Affairs In Marathi_90.1

  • इंडसइंड बँकेने ‘इंडसएसी क्रेडिट’ हा एक व्यापक डिजिटल कर्ज वितरणाचे व्यासपीठ बाजारात आणण्याची घोषणा केली ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या घरातून अत्यंत आरामात त्यांच्या आर्थिक गरजा भागवता येतील.
  • याचा लाभ इंडसइंड बँकेचे खातेधारक तसेच इतर ग्राहकांनाही मिळणार आहे. ‘इंडसएसीक्रेडिट’ संपूर्णपणे डिजिटल प्रक्रिया असून ते भारताच्या सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा-‘इंडियास्टॅक‘ च्या साहय्याने पेपरविरहित, सुकर आणि कॅशलेस पद्धतीने वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड ऑफर करते

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • इंडसइंड बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी: सुमंत काठपालिया
  • इंडसइंड बँक मुख्यालय: पुणे
  • इंडसइंड बँक संस्थापक: एस. पी. हिंदुजा
  • इंडसइंड बँक स्थापना: एप्रिल 1994, मुंबई.

 

7. पीएमसी बँक ताब्यात घेण्यासाठी सेंट्रमला आरबीआयची तत्त्वत: मान्यता मिळाली आहे

Daily Current Affairs In Marathi | 19 June 2021 Important Current Affairs In Marathi_100.1

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडला (सीएफएसएल) लघु वित्त बँक (एसएफबी) तयार करण्यासाठी मंजूर दिली आहे, जी पंजाब व महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी बँक) ताब्यात घेईल. ऑपरेशन सुरू करण्यासाठी त्याला 120 दिवसांचा कालावधी मिळेल.
  • पीएमसी बँक ताब्यात घेण्यात सेंटरम आणि भारतपे या संघटनेने रस दर्शविला होता. वृत्तानुसार, सेंट्रम आणि भारतपे या दोहोंची लघु वित्त बँकेत 50 टक्के हिस्सा असेल आणि मल्टीस्टेट सहकारी बँकेची मालमत्ता आणि लिएबिलिटीएस त्यांचेकडे दिले जातील.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे टेकवे:

  • पीएमसी बँकेचे प्रशासक: एके दीक्षित.
  • पीएमसी बँक स्थापना केली: 1984.
  • पीएमसी बँक मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र.

 

रँक आणि अहवाल बातम्या

8. आयएमडीच्या जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2021 मध्ये भारताने 43 वे स्थान कायम ठेवले 
Daily Current Affairs In Marathi | 19 June 2021 Important Current Affairs In Marathi_110.1
  • इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेन्ट (आयएमडी) यांनी तयार केलेल्या वार्षिक जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकात भारताने 64 अर्थ्व्याव्स्थांपैकी 43 व्या क्रमांकावर स्थान कायम राखले असून यावर्षी जगभरातील अर्थव्यवस्थांवर कोविड 19 चा काय परिणाम झाला आहे याची तपासणी केली गेली आहे.
  • एक्झिक्यूटिव्हकडून आलेल्या सर्वेक्षणांच्या प्रतिक्रियेद्वारे आणि कठोर आकडेवारीद्वारे कोणता देश आपल्या नागरिकांची आर्थिक प्रगती मोजून देशाची समृद्धी मोजते. निर्देशांक: क्रमांक 1: स्वित्झर्लंड, क्रमांक 2: स्वीडन, क्रमांक 3: डेन्मार्क

 

क्रीडा बातम्या

9. आयर्लंडच्या केव्हिन ओ’ब्रायनने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली
Daily Current Affairs In Marathi | 19 June 2021 Important Current Affairs In Marathi_120.1
  • आयर्लंडचा अष्टपैलू खेळाडू केविन ओब्रायनने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे तो टी-20 आणि कसोटी क्रिकेट खेळेल. त्याच्या तडाखेबाज 50 चेंडूतील शतकाच्या जोरावर 2011 च्या विश्वकपमध्ये आयर्लंडने बंगळुरू येथे इंग्लंडला तीन गडी राखून पराभूत केले होते. जो आजही विश्वकपमधील सर्वात वेगवान शतक आहे.

महत्वाचे दिवस

10. संघर्षादरम्यानच्या लैंगिक हिंसाचाराच्या निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस

Daily Current Affairs In Marathi | 19 June 2021 Important Current Affairs In Marathi_130.1

  • दरवर्षी जागतिक स्तरावर 19 जून रोजी संघर्षादरम्यानच्या लैंगिक हिंसाचाराच्या निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस पाळला जातो. 2021 हे या दिवसाचे 7 वे वर्ष आहे.
  • 19 जून हा दिवस निवडण्याचे कारण याच दिवशी 2008 साली सुरक्षा परिषदेने ध्येय क्रमांक 1820 चा स्वीकार केला होता ज्याचा उद्देश युद्धाची रणनीती आणि शांतता निर्मितीत अडथळा म्हणून लैंगिक हिंसाचार रोखणे हा होता.

 

11. 19 जून: राष्ट्रीय वाचन दिवस

Daily Current Affairs In Marathi | 19 June 2021 Important Current Affairs In Marathi_140.1

  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) दरवर्षी  19 जून रोजी राष्ट्रीय वाचन दिन साजरा करते. हा दिवस ‘केरळमधील वाचनालय चळवळी’ चे जनक, दिवंगत पी.एन. पाणिकर, ज्यांची पुण्यतिथी 19 जून रोजी आहे, यांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. 2021 या दिवसाचे 26 वे वर्ष आहे.
  • या निमित्ताने 19 जून  नंतरचा आठवडा ‘वाचन सप्ताह‘ आणि 18 जुलै पर्यंत ‘वाचन महिना‘ पाळला जाणार आहे. पहिला वाचन दिन 1996 मध्ये आयोजित करण्यात आला होता. 19 जून, 2017 रोजी पंतप्रधानांनी 22 वा राष्ट्रीय वाचन महिन्याचा उत्सव सुरू करतांना 2022 पर्यंत देशातील सर्व नागरिकांमध्ये ‘वाचन आणि विकास ’ हा संदेश देण्यासाठी एकजुटीची विनंती केली.

 

निधन बातम्य

12. भारताचे महानतम धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन

Daily Current Affairs In Marathi | 19 June 2021 Important Current Affairs In Marathi_150.1

  • भारताचे महानतम धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन यांचे वयाच्या 91 व्या वर्षी कोरोना प्रादुर्भावाने निधन झाले. माजी सैन्य अधिकारी असलेल्या मिल्खा सिंग यांनी जगभरातील ट्रॅक आणि फिल्ड स्पर्धांमध्ये देशासाठी अनेक पदके जिंकली आहेत.
  • सिंग यांनी 1958 मध्ये टोकियो एशियाडमध्ये 200 मीटर आणि 400 मीटर शर्यती जिंकून आशियायी खेळांमध्ये भारतासाठी चार सुवर्ण पदके जिंकली होती. त्यानंतर 1962 च्या जकार्ता एशियाडमध्ये 400 मीटर आणि 4 X 400 मीटर  रिले स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली. ते 1960 रोम ऑलिम्पिक मध्ये 400 मीटर शर्यतीत अंतिम फेरीत चौथ्या स्थानी आले होते.

 

13. झांबियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष केनेथ कौंडा यांचे निधन

Daily Current Affairs In Marathi | 19 June 2021 Important Current Affairs In Marathi_160.1

  • झांबियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करणारे झांबियन राजकारणी केनेथ कौंडा यांचे निधन झाले आहे. श्री.कौंडा यांनी 1964 ते 1991 पर्यंत 27 वर्षे स्वतंत्र झांबियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला. ऑक्टोबर 1964 मध्ये झांबियाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • झांबियाची राजधानी: लुसाका
  • चलन: झांबियन क्वाचा

 

14. पहिल्यांदा गोजरी भाषेत कुराणचे भाषांतर करणारे मुफ्ती फैज-उल-वहीद यांचे निधन
Daily Current Affairs In Marathi | 19 June 2021 Important Current Affairs In Marathi_170.1
  • जम्मू येथील प्रख्यात इस्लामिक विद्वान मुफ्ती फैज-उल-वहीद ज्यांनी पहिल्यांदा गोजरी भाषेत कुराणचे भाषांतर केले त्यांचे जम्मू येथे निधन झाले. सिराज-उम-मुनेरा’, ‘अहकाम-ए-मयत’ आणि ‘नमाज कें  मसाईल कुरान-ओ-हडीस की रोशनी मे’ सारखी अनेक पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत.
  • गुर्जरी – ज्याला गुजरी, गुज्री, गोजारी किंवा गोजरी असेही म्हटले जाते – हा इंडो-आर्यन भाषेचा चा एक प्रकार असून ही भाषा भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील गुर्जर आणि इतर जमाती बोलतात. भारतात ही भाषा मुख्यतः जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, पंजाब, दिल्ली आणि इतर भागात बोलली जाते. 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Daily Current Affairs In Marathi | 19 June 2021 Important Current Affairs In Marathi_180.1

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Daily Current Affairs In Marathi | 19 June 2021 Important Current Affairs In Marathi_200.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

Daily Current Affairs In Marathi | 19 June 2021 Important Current Affairs In Marathi_210.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.