Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

12 August: International Youth Day | 12 ऑगस्ट: आंतरराष्ट्रीय युवा दिन

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

12 ऑगस्ट: आंतरराष्ट्रीय युवा दिन

जगभरातील तरुणांच्या समस्यांकडे सरकार आणि इतर सर्वांचे लक्ष वेधून घेण्याच्या उद्देशाने दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिन पाळला जातो. हा दिवस तरुणांनी समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नांना अधोरेखित करण्यासाठी तसेच तरुणांच्या सकारात्मक योगदानांद्वारे त्यांना त्यांच्या समुदायांमध्ये अधिक सक्रियपणे सामील करून घेण्यासाठी आयोजित केला जातो. तरुणांसाठी जबाबदार जागतिक मंत्र्यांच्या परिषदेने (लिस्बन, 8-12ऑगस्ट 1998)) केलेल्या शिफारशीला मान्यता देत 1999 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने 12 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय युवा दिवस म्हणून घोषित केला. 12 ऑगस्ट 2000 रोजी हा दिवस पहिल्यांदा पाळण्यात आला.

2021 ची संकल्पना: “अन्नप्रणाली बदलणे: मानव आणि पृथ्वीच्या आरोग्यासाठी युवा शोध”(ट्रान्सफॉर्मिंग फूड सिस्टीम: युथ इनोव्हेशन फॉर ह्यूमन अँड प्लॅनेटरी हेल्थ)

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!