Table of Contents
महात्मा फुले व छत्रपती शाहू महाराज : आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अभ्यास साहित्य
महात्मा फुले व छत्रपती शाहू महाराज : आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अभ्यास साहित्य : महाराष्ट्रातील समाजसुधारक हा विषय आदिवासी विकास विभाग भरती 2023 तसेच महाराष्ट्रातील अन्य भरती परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त आहे.या लेखात आपण महात्मा फुले व छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर उपयुक्त अशी माहिती पाहणार आहोत. यावर परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात.
महात्मा फुले व छत्रपती शाहू महाराज: विहंगावलोकन
महात्मा फुले व छत्रपती शाहू महाराज : विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
विषय | महाराष्ट्रातील समाजसुधारक |
उपयोगिता | आदिवासी विकास विभाग भरती 2023 आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी |
लेखाचे नाव | महात्मा फुले व छत्रपती शाहू महाराज |
लेख तुम्हाला काय प्रदान करतो? | महात्मा फुले व छत्रपती शाहू महाराज यांचे जीवनकार्य |
महात्मा ज्योतिबा फुले
महात्मा फुलेंचे कार्य-
- महात्मा जोतीबा फुले यांचा जन्म इ. स. 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला.
- महाराष्ट्रात स्त्रियांच्या शिक्षणासाठी व उद्धारासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी इ. स. 1848 मध्ये पुणे येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून स्त्री- शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.
- इ. स. 1852 मध्ये दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा सुरू केली.
- महात्मा फुले यांनी विधवा पुनर्विवाहास चालना दिली.
- त्यांनी पुण्यात स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधगृहाची स्थापना केली.
- काशीबाई नावाच्या विधवेचा मुलगा स्वतः दत्तक घेतला.
- विधवेच्या केशवपनाची चाल बंद व्हावी म्हणून त्यांनी न्हाव्यांचा संप घडवून आणला.
- महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी ‘सत्यशोधक समाजाची’ स्थापना केली.
- शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले.
- ना.म.लोखंडे यांना ‘मिलहॅण्ड असोसिएशन’ या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
- मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर विठ्ठलराव वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून ‘महात्मा’ ही पदवी प्रदान केली.
महात्मा फुलेंची काही पुस्तके –
- ब्राह्मणांचे कसब
- गुलामगिरी
- शेतकऱ्यांचा असूड
- इशारा
- सार्वजनिक सत्यधर्म
राजर्षी छत्रपती शाहू महाराज
छत्रपती शाहूंचे कार्य –
- करवीर नगरीच्या छत्रपती शाहू महाराजांना ‘राजर्षी’ हा मानाचा किताब बहाल करण्यात आला. यापूर्वी हा किताब भारतीय इतिहासात फक्त ‘विश्वामित्र’ व ‘जनक’ यांनाच दिला गेला आहे.
- त्यांचा जन्म कागल जहागिरीमध्ये 26 जून 1874 रोजी झाला.
- शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला.
- त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.
- अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. 1919 साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली.
- जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला.
- इ.स. 1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.
- बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. 1916 साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापन केली.
- त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाताखाली झाले.
- त्यांनी राधानगरी धरणाची उभारणी केली.
- शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.
- गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात चहाचे दुकान काढून दिले.
- कोल्हापूर संस्थानात मागास जातींना 50 टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली.
- तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली.
- त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते.
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.