राज्याच्या जलसंपदा विभागा अंतर्गत १४ संवर्गातील ४ हजार ४९७ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक ही अशी अनेक पदे समाविष्ट आहेत. नुकतीच याबाबत राज्य शासनाने अधिसूचना जाहीर केली आहे.तांत्रिक घटक हे संध्याकाळच्या वेळेत घेतले जातील.
- जलसंपदा विभाग भरती २०२३' मधील पदे आणि पदसंख्या:
- वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब - ०४ जागा
- निम्नश्रेणी लघुलेखक - १९ जागा
- कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक - १४ जागा
- भूवैज्ञानिक सहाय्यक - ०५ जागा
- आरेखक - २५ जागा
- सहाय्यक आरेखक - ६० जागा
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक - १५२८ जागा
- प्रयोगशाळा सहाय्यक - ३५ जागा
- अनुरेखक - २८४ जागा
- दप्तर कारकुन - ४३० जागा
- मोजणीदार - ७५८ जागा
- कालवा निरीक्षक - ११८९ जागा
