Marathi govt jobs   »   Study Materials   »   Information about Census of India 2011

Census of India 2011, Important Points of India Census 2011 – Study Material for ZP Bharti 2023, भारताची जनगणना: भारताची जनगणना 2011

Census of India 2011

Census of India 2011: Important Points of India Census 2011, A census is an official systematic survey of a country’s population. The last census of India was held in 2011 (census of India) and the next one was to be held this year i.e., 2021 but could not be held due to the outbreak of Corona. It will happen in the future. It is very important to study this topic. In this article, you will get detailed information about the Census of India and Important Points of India Census 2011, Important Points of Maharashtra Census 2011

ZP Revision Roadmap: Ace Your Exams with Confidence

Click here to view ZP Exam Time Table 2023

Click here to Download ZP Admit Card 2023

Census of India: Important Points of India Census 2011
Category Study Material
Subject Geography
Name Census of India: Important Points of India Census 2011
Useful for  All Competitive Exams

Census of India: Important Points of India Census 2011

Census of India: Important Points of India Census 2011: जनगणना हे देशाच्या लोकसंख्येचे अधिकृत पद्धतशीर सर्वेक्षण आहे. भारतातील शेवटची जनगणना 2011 (census of India) मध्ये झाली होती आणि पुढील या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये होणार होती पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे होऊ शकली नाही. ती आगामी काळात होईल. प्रत्येक स्पर्धा परीक्षेत भारताची जनगणना (Census of India)  यावर प्रश्न येतात. त्याची माहिती असणे आवश्यक ठरते. महाराष्ट्रातील सरळ सेवा जसे कि, आगामी काळातील जिल्हा परिषद भरती 2023, आरोग्य भरती 2023, नगर परिषद भरती 2023, MIDC भरती 2023 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा Topic आहे त्यामुळे याचा अभ्यास असणे महत्वाचे आहे. त्यामुळे या टॉपिकचा अभ्यास करणे फार आवश्यक आहे. आज या लेखात आपण भारताची जनगणना: भारताची जनगणना 2011 चे महत्त्वाचे मुद्दे (Census of India: Important Points of India Census 2011) पाहणार आहे.

Census of India: Important Points of India Census 2011 | भारताची जनगणना: भारताची जनगणना 2011 चे महत्त्वाचे मुद्दे

Census of India: Important Points of India Census 2011: जनगणना  ही एखाद्या राष्ट्राच्या हद्दीत राहणाऱ्या लोकांची मोजणी आहे. आधुनिक काळात प्रत्येक राष्ट्रातील शासनाचे जनगणना करणे  एक अटळ कर्तव्य झाले आहे. राष्ट्राची लोकसंख्या किती, त्यातील लोकांची सामाजिक व आर्थिक वैशिष्ट्ये कोणती, त्यांचे राष्ट्राच्या निरनिराळ्या भागांत वितरण कसे झाले आहे, सामाजिक व जीवशास्त्रीय फेरफारांचे त्यांच्यावर कसकसे परिणाम होतात इ. अनेक प्रश्न दैनंदिन प्रशासनासाठी महत्त्वाचे हाताळण्यासाठी आवश्यक असलेली माहिती जनगणनेद्वारा उपलब्ध होते. शासनाला केवळ जनगणनाच नव्हे, तर इतर अनेक प्रकारच्या गणना कराव्या लागतात. उदा., कृषिगणना, पशुधनगणना, उत्पादनगणना, घरांची मोजणी इत्यादी. अशा सर्व गणनांतून उपलब्ध होणारी आकडेवारी राष्ट्रीय प्रगती दर्शविते व राष्ट्राच्या अनेक समस्यांचा उलगडा करण्यास उपयोगी पडते. विशेष करून जनगणनेमध्ये मिळणारी माहिती राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व राष्ट्राचे मानवी भांडवलरूपी सामर्थ्य यांवर महत्त्वाचा प्रकाश टाकते.

Adda247 Marathi App
Adda247 Marathi App

History of Census | जनगणणेचा इतिहास

History of Census: लोकांची मोजणी करण्याची प्रथा शासनव्यवस्थेच्या स्थापनेइतकीच जुनी आहे. ईजिप्शियन, ग्रीक, रोमन, हिब्रू, पर्शियन, या लोकांनी लोकसंख्येची मोजणी वेळोवेळी केल्याचे इतिहासात नमूद आहे. चीन-जपानमध्येही पुरातन काळापासून अशी मोजणी होत असे. साधारणतः अशी मोजणी सैन्यभरतीस योग्य वय असलेल्या नागरिकांची किंवा करपात्र लोकांची संख्या समजण्यासाठी जरूर तेव्हा होत असे. सबंध शहराची लोकसंख्या मोजण्यास यूरोपमध्ये पंधराव्या व सोळाव्या शतकांत सुरुवात झाली. मद्रास शहराची अशी लोकसंख्या-मोजणी 1687 मध्ये झाल्याचे नमूद आहे. नंतर राष्ट्रीय स्वरूपाची जनगणना सुरू झाली.

2011 Census of India
2011 जनगणना टपाल तिकीट

स्वीडनमधील पहिली जनगणना 1750 मध्ये झाली. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात 1790 पासून व ग्रेट ब्रिटनमध्ये 1801 पासून दर दहा वर्षांनी जनगणना घेण्यात येतात. भारतातील पहिली जनगणना (Census of India) ब्रिटीश व्हाईसराय लॉर्ड मेयो यांच्या काळात 1872 मध्ये पार पडली व त्यानंतर 1881 पासून दर दहा वर्षांनी भारताची जनगणना (Census of India) घेण्यात आल्या. काही राष्ट्रे जनगणना दर पाच वर्षांनी घेतात, तर काही त्यांना जरूर वाटेल तेव्हा जनगणना करतात. हे काम बरेच खर्चाचे असल्यामुळे बहुतेक राष्ट्रांत दर दहा वर्षांनी जनगणना करण्याची प्रथा आहे. सुरुवातीस जनगणनेच्या वेळी प्रत्येक कुटुंबाविषयीच माहिती गोळा करीत, परंतु नंतर प्रत्येक व्यक्तीबद्दल माहिती गोळा करण्यात येऊ लागली. अशी व्यक्तिगत स्वरूपाची राष्ट्रीय जनगणना सर्व प्रथम बेल्जियममध्ये 1846 मध्ये घेण्यात आली.

See Complete Information about Missiles Of India

Important Points of India Census 2011 | भारताची जनगणना 2011 तील ठळक मुद्दे 

Important Points of India Census 2011: भारताची जनगणना 2011 (Indias Census 2011) तील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहे. जे तुम्हाला परीक्षेत नक्की मदत करेल.

ठळक मुद्दे आकडेवारी
2011 च्या जणगणणेनुसार एकूण लोकसंख्या
  • 1,21,05,69,573
पुरुषांची संख्या
  • 62,31,21,843
पुरुषांचे प्रमाण
  • 51.54%
महिलांची संख्या
  • 587447730
महिलांचे प्रमाण
  • 48.46%
2001 च्या तुलनेत लोकसंख्या वाढीचा दर
  • 17.69 %
ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण
  • 68.84%
शहरी  लोकसंख्येचे प्रमाण
  • 31.14%
सर्वाधिक शहरी लोकसंख्येचे राज्य
  • तामिळनाडू (48.45%)
  • केरळ (47.72%)
  • महाराष्ट्र (45.23%)
भारत: लोकसंख्येची घनता (प्रती चौरस किमी)
  • 382
सर्वाधिक लोकसंख्येची राज्ये
  • उत्तर प्रदेश
  • महाराष्ट्र
  • बिहार
  • प. बंगाल
सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य
  •  सिक्कीम
सर्वाधिक लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश
  • दिल्ली
सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश
  • लाक्ष्यद्वीप
सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा
  • दिबांग व्हॅली (अरुणाचल प्रदेश)
सर्वाधिक लोकसंख्येची घनता राज्ये (प्रती चौरस किमी)
  • बिहार
  • प. बंगाल
  • केरळ
  • उत्तरप्रदेश
सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य
  •  अरुणाचल प्रदेश
सर्वाधिक लोकसंख्येची घनताअसलेला केंद्रशासित प्रदेश
  • दिल्ली
सर्वात कमी  लोकसंख्येची घनता असलेला केंद्रशासित प्रदेश
  • अंदमान-निकोबार
भारत : स्त्री पुरुष प्रमाण (Sex Ratio)
  • 943 : 1000
सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण (Sex Ratio): राज्य
  • केरळ (1084 : 1000)
सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण (Sex Ratio): राज्य
  • हरियाणा (877 : 1000)
सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण (Sex Ratio): केंद्रशासित प्रदेश
  • पुदुच्चेरी (1037 : 1000)
सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण (Sex Ratio): केंद्रशासित प्रदेश
  • दिव-दमण (618 : 1000)
भारत : साक्षरता
  • 72.99%
भारत: स्त्री  साक्षरता
  • 80.89%
भारत: पुरुष साक्षरता
  • 64.64%
सर्वाधिक साक्षरता असलेले राज्य
  • केरळ (93.91%)
सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य
  • बिहार (63.82%)
सर्वात कमी स्त्री साक्षरतेचे राज्य
  • राजस्थान (52.66%)
100% साक्षर भारतातील जिल्हा
  • एर्नाकुलम (केरळ)
  • 2011 साली झालेली भारताची जनगणना (Census of India) ही 15 वी जनगणना होती.

Important Points of Maharashtra Census 2011 | महाराष्ट्र जनगणना 2011 तील ठळक मुद्दे 

Important Points of Maharashtra Census 2011: महाराष्ट्राची जनगणना 2011 (Census of Maharashtra) तील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहे. जे तुम्हाला परीक्षेत नक्की मदत करेल.

ठळक मुद्दे आकडेवारी
महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,74,333
महाराष्ट्रातील पुरुष लोकसंख्या 5,82,55,227
महाराष्ट्रातील महिलांची लोकसंख्या 5,41,19,106
भारताच्या एकूण लोकसंख्येची टक्केवारी 9.28%
महाराष्ट्राच्या लोकसंख्येची दशक वाढ 15.99%
महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण 45.23%
महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण 54.78%
महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा ठाणे
महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा सिंधुदुर्ग
महाराष्ट्राची लोकसंख्या घनता 365
महाराष्ट्र : सर्वाधिक लोकसंख्येची घनता (प्रती चौरस किमी) असलेला जिल्हा मुंबई उपनगर (20980)
महाराष्ट्र : सर्वात कमी लोकसंख्येची घनता (प्रती चौरस किमी) असलेला जिल्हा गडचिरोली (74)
महाराष्ट्र : स्त्री पुरुष प्रमाण (Sex Ratio) 929 : 1000
सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेला महाराष्ट्रातील जिल्हा रत्नागिरी (1122)
सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण असलेला महाराष्ट्रातील  जिल्हा  मुंबई शहर (832)
महाराष्ट्राचा साक्षरता दर 82.34%
महाराष्ट्रातील पुरुषांचा साक्षरता दर 88.36%
महाराष्ट्रातील महिलांचा साक्षरता दर 75.89%
महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता असलेला जिल्हा मुंबई उपनगर (89.91%)
महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा नंदुरबार (64.38%)

महाराष्ट्र लोकसंख्येची घनता (प्रती चौरस किमी) सर्वाधिक असलेले जिल्हे (उतरता क्रम) खाली दिलेले आहे. 

  • मुंबई उपनगर (20925)
  • मुंबई शहर (20038)
  • ठाणे (1157)
  • पुणे (603)
  • कोल्हापूर (504)

महाराष्ट्र लोकसंख्येची घनता (प्रती चौरस किमी) सर्वाधिक असलेले जिल्हे (चढता क्रम) खाली दिलेले आहे.

  • गडचिरोली (74)
  • सिंधुदुर्ग (163)
  • चंद्रपूर (192)
  • रत्नागिरी (196)
  • यवतमाळ (204)

महाराष्ट्र स्त्री – पुरुष प्रमाण सर्वाधिक असलेले जिल्हे (उतरता क्रम) खाली दिलेले आहे. (स्त्रियांचे प्रमाण प्रती 1000 पुरुषांमागे)

  • रत्नागिरी (1122)
  • सिंधुदुर्ग (1036)
  • गोंदिया (999)
  • सातारा (988)
  • भंडारा (982)

महाराष्ट्र स्त्री – पुरुष प्रमाण सर्वात कमी असलेले जिल्हे (उतरता क्रम) खाली दिलेले आहे. (स्त्रियांचे प्रमाण प्रती 1000 पुरुषांमागे)

  • बीड (916)
  • पुणे (915)
  • ठाणे (886)
  • मुंबई उपनगर (860)
  • मुंबई शहर (832)

महाराष्ट्र स्त्री – पुरुष (0-6 वर्षे बाल लिंग गुणोत्तर) प्रमाण सर्वाधिक असलेले जिल्हे (उतरता क्रम) खाली दिलेले आहे. (स्त्रियांचे प्रमाण प्रती 1000 पुरुषांमागे)

  • पालघर (967)
  • गडचिरोली (961)
  • गोंदिया (956)
  • चंद्रपूर (953)
  • भंडारा (950)

महाराष्ट्र स्त्री – पुरुष (0-6 वर्षे बाल लिंग गुणोत्तर) प्रमाण सर्वात कमी असलेले जिल्हे (चढता क्रम) खाली दिलेले आहे. (स्त्रियांचे प्रमाण प्रती 1000 पुरुषांमागे)

  • बीड (807)
  • जळगाव (842)
  • अहमदनगर (852)
  • औरंगाबाद (858)
  • कोल्हापूर (863)
World Health Organization (WHO)
Adda247 Marathi Telegram

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA STUDY MATERIAL

Study Material for ZP Exam 2023 | जिल्हा परिषद भरती 2023 साठी अभ्यास साहित्य

सरळ सेवा जसे की, जिल्हा परिषद भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, आरोग्य विभाग भरती 2023 व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda247 मराठी आपणासाठी सर्व महत्वाच्या टॉपिक वर महत्वपूर्ण लेखमालिका प्रसिद्ध करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला या Adda 247 मराठीच्या लेखमालिकेचा नक्कीच फायदा होईल.

लेखाचे नाव लिंक
भारतातील खनिज संपत्ती
प्रकाशाचे गुणधर्म
महाराष्ट्राची मानचिन्हे
भारतातील शेती
भौतिक राशी आणि त्यांचे एकके
राष्ट्रीय आणीबाणी कलम 352: व्याख्या, परिचय, प्रकार, कालावधी आणि परिणाम
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम (UIP)
महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग
भारतातल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळी
राष्ट्रीय आरोग्य अभियान
महाराष्ट्रातील लोकजीवन
भारतीय संविधानाची उद्देशिका
मराठा साम्राज्य – इतिहास, शासक, राज्य विस्तार आणि प्रशासन
2D आणि 3D आकारांसाठी मेन्सुरेशन फॉर्म्युला
जालियनवाला बाग हत्याकांड – पार्श्वभूमी, कारणे आणि परिणाम
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी व त्यांचा कार्यकाळ (1952-2023)
चांद्रयान-3 शी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे
चंद्रयान 3
भारताची जणगणना 2011
लोकपाल आणि लोकायुक्त
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
कार्य आणि उर्जा
गांधी युग
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
भारताचे नागरिकत्व
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय संविधानाची उद्देशिका
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिंधू संस्कृती
जगातील 07 खंड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आम्ल व आम्लारी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023
रोग व रोगांचे प्रकार
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
महाराष्ट्रातील लोकजीवन
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
वनस्पतीची रचना आणि कार्ये
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
लोकपाल आणि लोकायुक्त
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
पृथ्वीवरील महासागर
महाराष्ट्राचे हवामान
भारताची क्षेपणास्त्रे
महाराष्ट्रातील शहरांची यादी

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

When was the first census of India conducted?

The first census of India was taken in 1872 during the reign of British Viceroy Lord Mayo.

Indias Cendus 2011 was which no of the census?

Indias Census 2011 was the 15th census.

What is the literacy rate in Maharashtra?

Maharashtra has an average literacy rate of 82.34%.

Which is the densest district in Maharashtra?

Mumbai is the densest district in Maharashtra.