Marathi govt jobs   »   Study Materials   »   महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग

महाराष्ट्रातील विभाग: प्रशासकीय आणि प्रादेशिक विभागाबद्दल सविस्तर माहिती, WRD भरती 2023 साठी अभ्यास साहित्य

महाराष्ट्रातील विभाग

महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग: आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्रात सुरुवातीला 26 जिल्हे होते. आज काळाच्या ओघात यात वाढ झाली. सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे अस्तित्वात आहेत. प्रशासकीय हेतूने त्यांची विभागणी सहा महसूली विभागांत आणि आठ शैक्षणिक विभागांत करण्यात आली आहे. या 36 जिल्ह्यांची विभागणी 109 उपविभाग आणि 355 तालुक्यांमध्ये करण्यात आली आहे. राज्यात स्थानिक अथवा जिल्हा स्तरावर नियोजनाच्या सक्षम यंत्रणांची दीर्घ परंपरा आहे. आगामी काळातील WRD जलसंपदा विभाग परीक्षा व इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा महत्वाचा घटक आहे. आज या लेखात आपण महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग याबद्दल माहिती जसे की महाराष्ट्रातील प्रशाकीय विभाग कोणते आहे. प्रादेशिक विभाग कोणते याबद्दल माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातील विभाग: विहंगावलोकन

महाराष्ट्रात एकूण 06 प्रशासकीय विभाग असून आपण या लेखात महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांबद्दल थोडक्यात खालील तत्क्त्यात माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील विभाग: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता WRD भरती व  सर्व स्पर्धा परीक्षा
विषय महाराष्ट्राचा भूगोल
लेखाचे नाव महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग
महाराष्ट्रातील एकूण प्रशासकीय विभाग 06
प्रशासकीय विभागांची नावे
  • कोकण
  • नाशिक
  • पुणे
  • छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)
  • अमरावती
  • नागपूर

प्रशासकीय विभाग म्हणजे काय

प्रादेशिक विभागाच्या प्रशासनाकरिता शासनाने संपूर्ण महाराष्ट्राची काही प्रशासकीय विभागात विभागणी केली आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी चार प्रशासकीय विभाग अस्तित्वात होते. ते म्हणजे कोकण, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर. सध्या महाराष्ट्राचे 6 प्रशासकीय विभाग आहेत. अमरावती आणि नाशिक हे दोन नविन प्रशासकीय विभाग करण्यात आले.

Maharashtra Division
प्रादेशिक विभागाचा नकाशा

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग आणि त्यांच्याविषयी माहिती खालील तक्त्यात दिली आहे.

प्रशासकीय विभाग   क्षेत्रफळ

(चौ.कि.मी.)

जिल्हे तालुके मोठा जिल्हा (चौ. कि.मी.) लहान जिल्हा (चौ. कि.मी.)
कोकण 30728 7 50    रत्नागिरी (8208) मुंबई शहर (157)
नाशिक 54493 5 54 अहमदनगर (17,048) नंदुरबार (5034)
पुणे 57275 5 58 पुणे (15,643) कोल्हापूर (7685)
छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) 64813 8 76 बीड (10,693) हिंगोली (4524)
अमरावती 46027 5 56 यवतमाळ (13,552) वाशीम (5153)
नागपूर 51377 6 64 गडचिरोली (14,412) भंडारा (3895)

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागानुसार जिल्हे

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागानुसार जिल्हे खालीलप्रमाणे आहेत.

प्रशासकीय विभाग जिल्हे
नाशिक नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार
छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर
कोकण मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पुणे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
अमरावती अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशीम
नागपुर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागाबद्दल महत्वाचे मुद्दे

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागाबद्दल महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहे.

प्रशासकीय विभागाची क्षेत्रफळानुसार क्रमवारी

  1. छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) 64813 (चौ.कि.मी.)
  2. नाशिक 57493 (चौ.कि.मी.)
  3. पुणे 57275 (चौ.कि.मी.)
  4. नागपूर 51377 (चौ.कि.मी.)
  5. अमरावती 46027 (चौ.कि.मी.)
  6. कोकण 30728 (चौ.कि.मी.)

क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे 05 जिल्हे:-

  1. अहमदनगर: 17048चौ.कि.मी
  2. पुणे: 15643 चौ.कि.मी
  3. नाशिक: 15530 चौ.कि.मी
  4. सोलापूर: 14895 चौ.कि.मी
  5. गडचिरोली: 14412 चौ.कि.मी

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान शेवटचे पाच जिल्हे :- 

  1. मुंबई शहर: 157 चौ.कि.मी
  2. मुंबई उपनगर: 446 चौ.कि.मी
  3. भंडारा: 3896 चौ.कि.मी
  4. ठाणे: 4214 चौ.कि.मी
  5. हिंगोली: 4524 चौ.कि.मी

प्रादेशिक विभाग म्हणजे काय

महाराष्ट्र हा भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागला आहे. या विभागांना प्रादेशिक विभाग असे म्हणतात. ते विभाग पुढीलप्रमाणे आहेत:

  1. कोकण
  2. पश्चिम महाराष्ट्र
  3. मराठवाडा
  4. उत्तर महाराष्ट्र / खानदेश
  5. विदर्भ

महाराष्ट्रातील प्रादेशिक विभागानुसार जिल्हे

महाराष्ट्रातील प्रादेशिक विभागानुसार जिल्हे खालीलप्रमाणे आहेत.

प्रादेशिक विभाग जिल्ह्याची संख्या जिल्हे
कोकण 7 मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पश्चिम महाराष्ट्र 7 पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर
मराठवाडा 8 औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर
उत्तर महाराष्ट्र / खानदेश 3 जळगाव, धुळे, नंदुरबार
विदर्भ 11 नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशीम

महाराष्ट्रातील नवीन जिल्हे व निर्मिती दिनांक

महाराष्ट्रातील नवीन जिल्हे व निर्मिती दिनांक खालीलप्रमाणे आहे.

मूळ जिल्हा नविन जिल्हा निर्मिती
रत्नागिरी सिंधूदुर्ग 1 मे 1981
औरंगाबाद जालना
उस्मनाबाद लातूर 15 ऑगस्ट 1982
चंद्रपूर गडचिरोली 26 ऑगस्ट 1982
बृहन्मुबई मुंबई उपनगर 4 ऑक्टोंबर 1990
अकोला वाशिम 1 जुलै 1998
धुळे नंदुरबार
भंडारा गोंदिया 1 मे 1999
हिंगोली परभणी
ठाणे पालघर 1 ऑगस्ट 2014

महाराष्ट्रातील सर्वाधिक तालूक्यांची संख्या असणारे जिल्हे: 

  • नांदेड व यवतमाळ: प्रत्येकी 16 तालुके
  • नाशिक, जळगाव, चंद्रपुर, रायगड: प्रत्येकी 15 तालुके
  • पुणे, अहमदनगर, नागपूर: प्रत्येकी 14 तालुके
  • कोल्हापूर व गडचिरोली: प्रत्येकी 12 तालुके

महाराष्ट्रातील समान नावाचे तालुके असणारे जिल्हे :-

  • नांदगाव:नाशिक-अमरावती
  • शिरूर: बीड-पुणे
  • आष्टी: बीड-वर्धा
  • खेड:  पुणे-रत्नागिरी
  • कळंब: यवतमाळ-उस्मानाबाद
  • मालेगाव: नाशिक-वाशिम
  • कारंजा: वाशिम-वर्धा
  • कर्जत: अहमदनगर-रायगड
  • सेलू: परभणी-वर्धा

महाराष्ट्रातील विभाग: नमुना प्रश्न 

प्रश्न 1. खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त तालुके आहेत?

(a) पुणे

(b) यवतमाळ

(c) कोल्हापूर

(d) अहमदनगर

उत्तर (b)

प्रश्न 2. खालील पैकी कोणत्या प्रादेशिक विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत?

(a) विदर्भ

(b) मराठवाडा

(c) पश्चिम महाराष्ट्र  

(d) कोकण

उत्तर (a)

प्रश्न 3. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा सर्वात नवीन जिल्हा आहे?

(a) विदर्भ

(b) मराठवाडा

(c) पश्चिम महाराष्ट्र  

(d) कोकण

उत्तर (a)

प्रश्न 4. खालील पैकी जिल्ह्यांच्या संख्येनुसार प्रादेशिक विभागांचा योग्य उतरता क्रम निवडा?

(a) विदर्भ>पश्चिम महाराष्ट्र >खानदेश>मराठवाडा 

(b) विदर्भ >मराठवाडा> पश्चिम महाराष्ट्र >खानदेश 

(c) पश्चिम महाराष्ट्र >मराठवाडा> कोकण>खानदेश  

(d) कोकण>मराठवाडा> विदर्भ>खानदेश 

उत्तर (b)

प्रश्न 5. क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसरा सर्वात मोठा जिल्हा कोणता?

(a) पुणे

(b) यवतमाळ

(c) कोल्हापूर

(d) अहमदनगर

उत्तर (a)

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

WRD परीक्षेसाठी उपयुक्त अभ्यास साहित्य 

महाराष्ट्रातील आगामी WRD जलसंपदा विभाग भरती 2023 व इतर सर्व सरळ सेवा भरती साठी सर्व महत्वपूर्ण विषयांवर अड्डा247 ने एक लेखमालिका सुरु केली आहे. दररोज यात नवनवीन घटकांची भर पडत आहे. WRD परीक्षेसाठी इतर महत्वाचे लेख पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

लेखाचे नाव लिंक
Direct – Indirect Speech
भारताचे नागरिकत्व
शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार
सहसंबंध पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्राचे विभाग का केले?

प्रादेशिक विभागांच्या कारभारासाठी शासनाने संपूर्ण महाराष्ट्राची काही प्रशासकीय विभागांमध्ये विभागणी केली आहे.

महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत?

राज्यात 36 जिल्हे आहेत जे सहा महसुली विभागांमध्ये विभागले गेले आहेत ते पुढीलप्रमाणे कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर.

महाराष्ट्राचे प्रसासकीय आणि प्रादेशिक विभाग किती आहेत?

महाराष्ट्र 6 प्रशासकीय विभाग आणि 5 प्रादेशिक विभागांमध्ये विभागलेला आहे.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे?

औरंगाबाद हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे.