Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

Tokyo Olympics 2020 Closing Ceremony Highlights | टोकियो ऑलिम्पिक 2020 समापन समारंभ

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

टोकियो ऑलिम्पिक 2020 समापन समारंभ

टोकियो ऑलिम्पिक 2020 ची सांगता 08 ऑगस्ट 2021 रोजी झाली. ही आंतरराष्ट्रीय बहु-क्रीडा स्पर्धा 23 जुलै ते 08 ऑगस्ट 2021 पर्यंत टोकियो, जपानमध्ये आयोजित करण्यात आली होती. यापूर्वी टोकियो 1964 (उन्हाळी), साप्पोरो 1972 (हिवाळी) आणि नागानो 1998 (हिवाळी) येथे ऑलिम्पिक खेळ आयोजित केल्यानंतर जपानने ऑलिम्पिक खेळांचे चौथ्यांदा आयोजन केले. याशिवाय दोनदा उन्हाळी  ऑलिम्पिक खेळ आयोजित करणारे टोकियो हे पहिले आशियाई शहर ठरले आहे.

पदक तक्ता: 

  • अमेरिकेने 113 पदकांसह अव्वल स्थान मिळवले आहे, ज्यात 39 सुवर्ण, 41 रौप्य आणि 33 कांस्यपदकांचा समावेश आहे.
  • भारताने 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकांसह 7 पदके जिंकली आणि पदक तक्त्यात भारत 86 देशांपैकी 48 व्या स्थानावर आहे.

पदकतालिकेतील पहिली पाच राष्ट्रे:

  • युनायटेड स्टेट्स: 113 (सुवर्ण: 39, रौप्य: 41, कांस्य: 33)
  • चीन: 88 (सुवर्ण: 38, रौप्य: 32, कांस्य: 18)
  • जपान: 58 (सुवर्ण: 27, रौप्य: 14, कांस्य: 17)
  • ग्रेट ब्रिटन: 65 (सुवर्ण: 22, रौप्य: 21, कांस्य: 22)
  • आरओसी (रशियन ऑलिम्पिक समिती): 71 (सुवर्ण: 20, रौप्य: 28, कांस्य: 23)

भारतीय पदक विजेत्यांची यादी:

सुवर्णपदक: 
पुरुषांची भालाफेक: नीरज चोप्रा

रौप्चांयपदक: 
महिलांचे 49 किलो वेटलिफ्टिंग: मीराबाई चानू
पुरुषांची फ्रीस्टाइल 57 किलो कुस्ती: रवी दहिया

कांस्यपदक:
महिलांची वेल्टरवेट बॉक्सिंग: लवलिना बोर्गोहेन
महिला एकेरी बॅडमिंटन: पीव्ही सिंधू
पुरुषांची 65 किलो फ्रीस्टाइल कुस्ती: बजरंग पुनिया
पुरुष हॉकी: भारतीय पुरुष हॉकी संघ

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!