टाईम्स ग्रुपच्या अध्यक्षा इंदू जैन यांचे निधन
अग्रणी समाजसेवी आणि टाइम्स ग्रुपच्या अध्यक्षा इंदू जैन यांचे कोविडशी संबंधित आजारामुळे निधन झाले आहे. प्रसिद्ध भारतीय माध्यम व्यक्तिमत्त्व, इंदू जैन या टाइम्स ऑफ इंडिया आणि इतर मोठ्या वर्तमानपत्रांचे मालक असलेल्या टाईम्स ग्रुप म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘बेनेट, कोलमन अँड कंपनी लिमिटेड‘ या भारतातील सर्वात मोठ्या मीडिया ग्रुपच्या अध्यक्षा होत्या.
महाराष्ट्र राज्य विविध परीक्षा साहित्य
अध्यात्मवादी असल्याने जैन यांना प्राचीन शास्त्रांचे सखोल ज्ञान होते आणि त्या श्री श्री रविशंकर आणि सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या अनुयायी होत्या. याशिवाय जैन स्त्रियांच्या हक्कांबद्दलही उत्कट होत्या आणि फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन (एफएलओ) च्या संस्थापक अध्यक्षा होत्या.