Table of Contents
शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक 2024
शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक 2024: दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती 2024 बद्दल प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ज्यानुसार लवकरच शिक्षक भरती 2024 अंतर्गत उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे. या लेखात आपण शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक 2024: विहंगावलोकन
पवित्र पोर्टलवर दि. 25 एप्रिल 2024 रोजी शिक्षक भरती 2024 नियुक्ती बद्दल सूचना जारी झाली असून शिक्षक भरती 2024 नियुक्तीस मान्यता चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात पाहू शकता.
शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | निकाल |
विभाग | शिक्षण विभाग |
भरतीचे नाव | शिक्षक भरती 2024 |
एकूण रिक्त पदे | 21678 |
निकारीचे ठिकाण | महाराष्ट्र |
शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक 2024: प्रमुख मुद्दे
- दिनांक 25/02/2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या निवड यादीतील अभियोग्यताधारकांना यथाशीघ्र नियुक्ती आदेश देण्याच्या संदर्भात मा. केंद्रीय निवडणूक आयोग यांनी प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणातील नियुक्तीबाबत कार्यवाही करण्यास दिलेली परवानगी विचारात घेता, मा प्रधान सचिव, ग्राम विकास विभाग यांना विनंती करण्यात आली असून त्याप्रमाणे सर्व संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना त्यांचेकडून निर्देश दिले जात आहेत.
- पहिल्या फेरीतील कार्यवाही सुरू असतानाच पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून प्रशासकीय
- प्रक्रिया करण्यात येत आहे. पुढील फेरीमधील माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व तत्समपदातील वेगवेगळ्या घटकांच्या मागण्या विचारात घेता समन्यायी पद्धतीने व शासन निर्णयातील सूचनांचे योग्य ते पालन करून कार्यवाही भविष्यात कोणतीही न्यायालयीन गुंतागुंत होऊ नये याची योग्य ती दक्षता घेऊन करण्यात येत आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन पुढील निवड फेरी सुद्धा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.
- सन 2017 भरती मधील दिनांक 29/11/2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीबाबत न्यायालयीन प्रकरणांमधील स्थागनादेश उठवणेच्या दृष्टीने सिविल एप्लीकेशन दाखल करण्यासंदर्भात शासकीय अभियोग्यता यांना विनंती करण्यात आली असून त्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे.
- उर्वरित भरती प्रक्रिया तसेच भरती प्रक्रियेतील अन्य अडचणी दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सतत केला जात आहे.
- या भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासूनच काही मंडळी कोणतीही अधिकृत माहिती नसताना तसेच प्रशासकीय कार्यपद्धती. निर्णय प्रक्रिया अथवा नियम याची जुजबी माहिती सुद्धा नसताना स्वतःच्या मनाने काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यांचे पासून सावध राहावे.
- ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्या त्यावेळी बुलेटिन द्वारे माहिती दिली जाईल.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप