Table of Contents
वार्षिक ‘वर्ल्ड कोरिओग्राफी अवॉर्ड 2020’ जिंकणारा सुरेश मुकुंद पहिला भारतीय
एम्मी पुरस्काराने नामांकित भारतीय नृत्यदिग्दर्शक सुरेश मुकुंद यांनी दहावा वार्षिक ‘जागतिक नृत्य दिग्दर्शन 2020’ जिंकला आहे, (हा कोरेओ अवॉर्ड्स म्हणूनही ओळखला जातो), हा प्रतिष्ठित सन्मान जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. हिट अमेरिकन टीव्ही रिअॅलिटी शो ‘वर्ल्ड ऑफ डान्स’ यातील कामगिरीबद्दल त्यांना ‘टीव्ही रिअलिटी शो / स्पर्धा’ प्रकारात हा पुरस्कार मिळाला.
महाराष्ट्र राज्य विविध परीक्षा साहित्य
मुकुंद हा भारतीय नृत्य गट ‘द किंग्ज’ चे दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शक आहे, ज्याने वर्ल्ड ऑफ डान्सच्या 2019 चा हंगाम जिंकला. दरवर्षी लॉस एंजेल्समध्ये पार पडणारा “नृत्यांचा ऑस्कर” म्हणून ओळखला जाणारा जागतिक नृत्यदिग्दर्शक पुरस्कार हा दूरचित्रवाणी, चित्रपट, जाहिराती, डिजिटल सामग्री आणि संगीतातील व्हिडिओ यामध्ये जगातील सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शकांकडून करण्यात आलेल्या सर्वात अभिनव आणि मूळ कामगिरीसाठी देण्यात येतो.