प्रख्यात कव्वाली गायक फरीद साबरी यांचे निधन
प्रसिद्ध साबरी ब्रदर्स जोडीतील कव्वाली गायक फरीद साबरी यांचे निधन झाले आहे. सबरी ब्रदर्स (फरीद साबरी आणि अमीन साबरी) त्यांच्या ‘देर न हो जाए कहीं देर न हो जाये’ आणि ‘एक मुलाकात जरुरी है सनम’ सारख्या सदाहरित गाण्यांसाठी परिचित होते. भाऊ व त्यांचे वडील सईद साबरी यांनी भारतीय व परदेशात झालेल्या अनेक कार्यक्रमांमध्ये कव्वाली सादर केली.