Table of Contents
Padma Awards 2021: Study Material for MHADA Bharti 2021: देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्म पुरस्कार- पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन प्रकारात प्रदान केले जातात. MPSC राज्यसेवा परीक्षा, MPSC गट ब व गट क च्या परीक्षा, तसेच MPSC घेत असलेल्या इतर स्पर्धा परीक्षामध्ये, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद भरती, म्हाडा भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी ला फार महत्व आहे. MHADA भरती परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या असून सर्व क्लस्टर च्या परीक्षा डिसेंबर महिन्यात होणार आहे. डिसेंबर मध्ये होणाऱ्या MHADA च्या परीक्षेत सामान्य ज्ञान यावर 50 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यात चालू घडामोडी वर 8 ते 10 प्रश्न विचारु शकतात. त्यामुळे याचा अभ्यास आवश्यक आहे कारण चालू घडामोडी याचा अभ्यास असेल तर आपण 2-3 मिनिटात हे प्रश्न सोडवून बाकी प्रश्नांना वेळ देऊ शकतो.
पद्म पुरस्कार 2021 (Padma Awards 2021) हा घटक स्टॅटिक जनरल नॉलेज व चालू घडामोडी या विषयात येतो. त्यामुळे आगामी MPSC Grp B and Grp C, MHADA भरती व जिल्हा परिषद भरती परीक्षेत यावर प्रश्न विचारू शकतात. आज आपण या लेखात पद्म पुरस्कार 2021 (Padma Awards 2021) मिळालेल्या व्यक्ती व त्यांची क्षेत्र व महाराष्ट्रात कोणाला पद्म पुरस्कार मिळाले याबद्दल माहिती पाहणार आहोत.
Padma Awards 2021 | पद्म पुरस्कार 2021
Padma Awards 2021: पद्म पुरस्कार हे दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर केले जाणारे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहेत. पद्म पुरस्कारांचे तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाते ते म्हणजे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. पुरस्कार विजेत्यांच्या कामगिरीनुसार विविध क्षेत्रातील पुरस्कार दिले जातात. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादींसाठी हा पुरस्कार दिला जातो.
- ‘पद्मविभूषण’ असाधारण आणि विशिष्ट सेवेसाठी दिला जातो
- उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मभूषण’
- कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मश्री’.
दरवर्षी पंतप्रधानांनी स्थापन केलेल्या पद्म पुरस्कार समितीने केलेल्या शिफारशींवर पद्म पुरस्कार प्रदान केले जातात. नामांकन प्रक्रिया लोकांसाठी खुली आहे. स्व-नामांकन देखील करता येते. राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातात. यावर्षी राष्ट्रपतींनी 119 पद्म पुरस्कारांना मान्यता दिली आहे, ज्यात 7 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि 102 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. या यादीमध्ये 29 महिला, 10 परदेशी व्यक्ती आणि 16 मरणोत्तर पुरस्कार विजेते आणि 1 ट्रान्सजेंडर पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा समावेश आहे.
Padma Awards 2021: Padma Vibhushan | पद्म पुरस्कार 2021: पद्मविभूषण
Padma Awards 2021: Padma Vibhushan: 2021 साली एकूण 7 जणांना पद्मविभूषण पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. त्याचे नाव, क्षेत्र व त्यांचे राज्य/ देश खाली टेबलमध्ये दिलेले आहे.
अ. क्र. | नाव | क्षेत्र | राज्य/देश |
1 | श्री शिंजो आबे | सार्वजनिक व्यवहार | जपान |
2 | श्री एसपी बालसुब्रमण्यम (मरणोत्तर) |
कला | तामिळनाडू |
3 | डॉ.बेले मोनाप्पा हेगडे | औषध | कर्नाटक |
4 | नरिंदर सिंह कपानी (मरणोत्तर) | विज्ञान आणि अभियांत्रिकी | युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका |
5 | मौलाना वहिदुद्दीन खान | इतर – अध्यात्मवाद | दिल्ली |
6 | श्री बी.बी.लाल | इतर- पुरातत्व | दिल्ली |
7 | श्री सुदर्शन साहू | कला | ओडिशा |
भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी
Padma Awards 2021: Padma Bhushan | पद्म पुरस्कार 2021: पद्मभूषण
Padma Awards 2021: Padma Bhushan: 2021 साली एकूण 10 जणांना भूषण पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. त्याचे नाव, क्षेत्र व त्यांचे राज्य खाली टेबलमध्ये दिलेले आहे.
अ. क्र. | नाव | क्षेत्र | राज्य |
1 | कु. कृष्णन नायर शांताकुमारी चित्रा |
कला | केरळ |
2 | श्री तरुण गोगोई (मरणोत्तर) |
सार्वजनिक व्यवहार | आसाम |
3 | श्री चंद्रशेखर कंबरा | साहित्य आणि शिक्षण |
कर्नाटक |
4 | कु.सुमित्रा महाजन | सार्वजनिक व्यवहार | मध्य प्रदेश |
5 | श्री नृपेंद्र मिश्रा | नागरी सेवा | उत्तर प्रदेश |
6 | श्री रामविलास पासवान (मरणोत्तर) |
सार्वजनिक व्यवहार | बिहार |
7 | श्री केशुभाई पटेल (मरणोत्तर) |
सार्वजनिक व्यवहार | गुजरात |
8 | श्री काल्बे सादिक (मरणोत्तर) |
इतर – अध्यात्मवाद | उत्तर प्रदेश |
9 | श्री रजनीकांत देविदास श्रॉफ | व्यापार आणि उद्योग | महाराष्ट्र |
10 | श्री तरलोचन सिंग | सार्वजनिक व्यवहार | हरियाणा |
Padma Awards 2021: Padma Shri | पद्म पुरस्कार 2021: पद्मश्री
Padma Awards 2021: Padma Shri: कला, साहित्य आणि शिक्षण, सामाजिक कार्य, क्रीडा, वैद्यक इत्यादी क्षेत्रातील 102 जणांना यावर्षी पद्मश्री पुरस्कार मिळाला. सर्व पद्मश्री पुरस्कार विजेत्यांची यादी PDF डाउनलोड करून पाहू शकता.
पद्मश्री पुरस्कार विजेत्यांची यादी PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Padma Awards 2021: Awardee in Maharashtra | पद्म पुरस्कार 2021: महाराष्ट्रातील पुरस्कार विजेते
Padma Awards 2021: Awardee in Maharashtra: महाराष्ट्रातील सहा व्यक्तींना भारत सरकारचा प्रतिष्ठेचा ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाला आहे. या सर्वांचे नावे व त्याची क्षेत्रे खालील टेबलमध्ये दिलेले आले आहे.
अ. क्र. | नाव | क्षेत्र | पुरस्काराचे नाव |
1 | रजनीकांत श्रॉफ | उद्योग | पद्मभूषण |
2 | परशुराम गंगावणे | कला | पद्मश्री |
3 | नामदेव कांबळे | साहित्य आणि शिक्षण | पद्मश्री |
4 | जसवंतीबेन पोपट | उद्योग | पद्मश्री |
5 | गिरीश प्रभुणे | सामाजिक कार्य | पद्मश्री |
6 | सिंधूताई सपकाळ | सामाजिक कार्य | पद्मश्री |
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परशुराम गंगावणे यांना कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कळसूत्री बाहुल्या ही लोककला जपून समाजामध्ये जनजागृती आणि प्रभोधन केल्यामुळे गंगावणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तर अनेक अनाथांना आसरा देत अनाथांची माऊली अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार मिळला. सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी आयुष्यभर समर्पित वृत्तीने सामाजिक कार्य केले. पारधी समाजातील मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि सामाजिक समरसतेसाठी त्यांनी केलेले कार्य विलक्षण आहे. गिरीश प्रभुणे यांना देखील पद्मश्री पुरस्कार मिळाला. लिज्जत पापड उद्योगाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार देणाऱ्या जसवंतीबेन पोपट यांना देखील पद्मश्री पुरस्कार मिळाला.
Study material for MHADA Exam 2021 | MHADA भरती 2021 परीक्षेसाठी अभ्यास साहित्य
Study material for MHADA Exam 2021: म्हाडा भरती 2021 मध्ये सामान्य ज्ञान विषयाला चांगले वेटेज आहे. त्यामुळे या विषयाचा अचूक व पक्का अभ्यास असणे आवश्यक आहे. हा विषय तुम्हाला परीक्षेत यश मिळऊन देऊ शकतो. MHADA परीक्षेत सर्वसाधारण पदे (Non Technical Post) मध्ये प्रत्येक विषयाला 50 गुण आहेत. त्याचा विचार करता सर्व विषय कव्हर करण्याचा प्रयत्न Adda 247 मराठी करणार आहे. त्या अनुषंगाने मराठी, इंग्लिश व सामान्य ज्ञान या विषयावर काही लेख (Study material for MHADA Exam 2021) प्रसिद्ध केले आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला आगामी होणाऱ्या म्हाडा (MHADA) व जिल्हा परिषदेच्या पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.
FAQs Padma Awards 2021: Study Material for MHADA Bharti 2021
Q1. पद्म पुरस्कार हे दरवर्षी कधी जाहीर होतात?
Ans. पद्म पुरस्कार हे दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर केले जातात.
Q2. कोणकोणत्या क्षेत्रासाठी पद्म पुरस्कार दिल्या जातो?
Ans. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा या क्षेत्रांसाठी हा पुरस्कार दिला जातो
Q3. महाराष्ट्रात किती जणांना 2021 साली पद्म पुरस्कार मिळाले?
Ans. महाराष्ट्रात 6 जणांना 2021 साली पद्म पुरस्कार मिळाले.
Q4. MHADA भरती 2021 चे सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?
Ans. MHADA भरती 2021 चे सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो