Marathi govt jobs   »   Study Materials   »   Information about National Rural Health Mission

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) | National Rural Health Mission (NRHM) Study material for Arogya and ZP Bharti Exam 2021

Table of Contents

National Rural Health Mission (NRHM) Study material for Arogya and ZP Bharti Exam 2021:आरोग्य व जिल्हा परिषद परीक्षा मध्ये तांत्रिक विषयांमध्ये एकूण 40 प्रश्न विचारले जातात  त्यात सगळ्यात जास्त विचारला जाणारा टॉपिक म्हणजे सरकारी योजना. यावर एकूण 9-10 प्रश्न विचारले जातात त्यामुळे हा विषय गेम चेंजर ठरू शकतो.  याचा अभ्यास करणे आपल्याला फार आवश्यक आहे. Adda 247 मराठी, सर्व  तांत्रिक टॉपिक कव्हर करणार आहे. आज आपण राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) याबद्दल या लेखांमध्ये माहिती बघणार आहोत.

National Rural Health Mission (NRHM) Study material for Arogya and ZP Bharti Exam 2021 | राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) आरोग्य व जि. प. भरती 2021 साठी अभ्यास साहित्य

National Rural Health Mission (NRHM) Study material for Arogya and ZP Bharti Exam 2021: तांत्रिक विषयांमध्ये आरोग्याशी संबंधित विविध सरकारी योजना (केंद्र व राज्य)  यावर जास्त प्रश्न विचारले जातात त्यात संपूर्ण भारतात सुरू  झालेले महत्त्वाचे अभियान म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM). या अभियानाचे महत्त्व म्हणजे देशातील सर्व वर्गांचा विचार करून याची रचना केली गेली आहे आणि ज्या योजना आरोग्याशी निगडित आहेत त्या सर्व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य  अभियानाअंतर्गत येतात.  त्यामुळे या लेखांमध्ये आपण याची ऐतिहासिक पार्श्वभूमी उद्दिष्ट धोरणे पायाभूत मांडणी याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत जेणेकरून यावर येणारा प्रत्येक प्रश्न आपल्याला परीक्षेत मार्क देऊन जाईल.

महाराष्ट्र जिल्हा परिषद मेगा भरती 2021 अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

National Rural Health Mission (NRHM) – Historical Background | राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) – ऐतिहासिक पार्श्वभूमी

National Rural Health Mission (NRHM) – Historical Background | राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) – ऐतिहासिक पार्श्वभूमी: भारतामध्ये सुरुवातीपासून शहरी भागांमध्ये आरोग्य सुविधा यांच्यामध्ये सातत्याने प्रगती होत गेली पण ग्रामीण भागात याचा पाहिजे तसा विस्तार झाला नाही याचे मुख्य कारण होते शिक्षणाचा अभाव, वाढती लोकसंख्या,  आरोग्य विषयी अनास्था या सर्व कारणांमुळे  शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या सुविधा योग्य पद्धतीने पोहोचल्या नव्हत्या.  या सर्वाचा विचार करता केंद्र शासनाने संपूर्ण देशात 12 एप्रिल 2005 पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) सुरु केले आहे. आरोग्यावर परिणाम करणाऱया महत्वाच्या घटकांचा (उदा. आहार, परिसर स्वच्छता, सुरक्षित पाणीपुरवठा, महिला व बालविकास इत्यादी) बाबींचा या  अभियानामध्ये एकत्रित विचार करण्यात आला आहे.

खाजगी क्षेत्रातील आरोग्य सेवेवर नियंत्रण नसल्याने आरोग्य सेवेवरील खर्चात वाढ झाली असून ती ग्रामीण भागातील जनतेस न परवडण्याजोगी आहे. देशाला निरनिराळ्या आरोग्यविषयक पेचप्रसंगास सामोरे जावे लागल्याने आरोग्य सेवेच्या खर्च आणि जनतेच्या अपेक्षांमध्ये वाढ होते.

दुर्गम ग्रामीण भागात गुणवत्तापुर्ण आरोग्य सेवा देण्याचे आव्हान अधिक महत्वाचे आहे. सदर प्रश्नाचे गांभिर्य व व्याप्ती लक्षात घेता लहान योजनांवर लक्ष केंद्रीत करणे पुरेसे नाही. सार्वजनिक आरोग्य सेवेचे सहजसाध्य, परवडण्याजोगी, कार्यक्षम, उत्तरदायरी व गूणवत्तापुर्ण सेवेत रुपांतरीत करणे अत्यंत आवश्यक आहे. याच भावनेतून देशातील आरोग्य अभियान संकल्पनेचा विकास झाला.

महाराष्ट्र ZP भरती 2021 परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

National Rural Health Mission (NRHM) – Objectives | राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) – उद्दिष्टे 

National Rural Health Mission (NRHM) – Objectives | राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) – उद्दिष्टे: राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) ची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत.

 • देशातील ग्रामीण भागातील जनतेस प्रभावी,सहजसाध्, गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करुन देणे, आरोग्य निर्देशक व संसाधन यामध्ये मागे असलेल्या 18 राज्यावर विशेष लक्ष.
 • 18 विशेष लक्ष असणाऱया राज्यामध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तिस गढ, हिमाचल प्रदेश, झारखंड, जम्मु आणि काश्मिर, मणीपूर, मिझोराम, मेघालय, मध्यप्रदेश, नागालँण्ड, ओरीसा, राजस्थान, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तरांचल व उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.
 • सार्वजनिक खर्चाच्या 0.9% (जीडीपी) वरुन 2 ते 3% (GDP) पर्यंत आरोग्यावर वाढ करणे.
 • योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करणे यासाठी आरोग्य यंत्रणेच्या संरचनेत बदल करणे.
 • परंपरागत उपचार पध्दतीचे पुर्नजीवन आणि आयुष चा सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या मुख्यप्रवाहात समावेश करणे.
 • आरोग्य, पोषण, स्वच्छ पाणीपुरवठा, स्त्री-पुरुष समानता इ. च्या समावेशासह जिल्हास्तरावर विकेंद्रीकरण पध्दतीने आरोग्य सेवेचे प्रभावी एकत्रिकरण.
 • आंतर राज्य व आंतर जिल्हा आरोग्य असमानता या बाबीवर निवेदन करणे.
 • प्रगतीच्या दृष्टीने लक्ष निर्धारित करणे व तसा सार्वजनिक अहवाल सादर करणे.
 • ग्रामीण भागातील जनतेस, विशेषतः गरीब स्त्रिया व बालके यांना सहजसाध्य, परवडण्याजोगी, कार्यक्षम, उत्तरदायी आणि विश्वासार्ह प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे.

कोविड-19 स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

National Rural Health Mission (NRHM) – Policies | राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) – धोरणे

National Rural Health Mission (NRHM) – Policies | राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) – धोरणे: राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे (NRHM)  5 महत्वाची धोरणे खालीलप्रमाणे आहेत.

 • राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हे राज्यांमध्ये आवश्यक असे परिवर्तन करणेसाठी राज्यांच्या बळकटीकरणाचा प्रयत्न आहे. हे अभियान राज्यांना राज्यातील त्यांच्या स्थानिक, सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्यासाठी स्वातंत्र्य देण्यात आले आहे. यामूळे राज्य अभियानासाठी नियोजन व अंमलबजावणी चे विकेंद्रीकरण करतील जेणेकरुन गरजेप्रमाणे व सामाजिक आधार असणारे असे जिल्हा आरोग्य कृती आराखडा राज्यात आरोग्य विभागात होणारे महत्वपुर्ण परिवर्तनाचे आधार असतील.
 • राज्य हे स्थानिक बाबींचे निराकरण करणेकरिता नाविन्यपूर्ण योजना हाती घेतील.
 • राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत केलेले विकेंद्रीकरण लक्षात घेता, राज्यांना, पंचायत राज्य संस्थांना पुरेसे प्रशासकिय / वित्तिय अधिकार प्रदान करणे गरजेचे आहे.
 •  दरवर्षी राज्यांना अभियानाच्या कालावधीत आरोग्य विभागावर होणारे खर्च कमीत कमी १० कोटी रु. पर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
 • राज्यांना आरोग्यविषयक बाबी हाताळण्यासाठी कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील. राज्याकडून अपेक्षा आहे की ते परस्पर संमतीने निश्चित केलेल्या टप्प्यांची पूर्तता करतील याची नोंद राज्यासोबत करण्यात आलेल्या करारात करण्यात येईल.

National Rural Health Mission (NRHM) – Purpose | राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) – उद्देश

National Rural Health Mission (NRHM) – Purpose | राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) – उद्देश: राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) चे उद्देश खालीलप्रमाणे आहेत.

 • माता व बालमृत्यू दर कमी करणे.
 • अन्न व पोषण, स्वच्छ व आरोग्यदायी बनविण्यासाठी सार्वजनिक सुविधा उपलब्ध करुन देणे आणि माता व बाल आरोग्य तसेच लसीकरण हे ध्येय समोर ठेवून सार्वजनिक आरोग्य सेवा पुरविणे.
 • संसर्गजन्य व असंसर्गजन्य तसेच स्थानिक रोगांच्या साथीचा प्रतिकार व नियंत्रण ठेवणे.
 • एकात्मिक प्राथमिक आरोग्य सुविधांचा वापर वाढविणे.
 • लोकसंख्या स्थिरता व लिंग आणि लोकसंख्येचे प्रमाण राखणे.
 • स्थानिक परंपरागत आरोग्य पध्दती सक्षम करणे व आयुषला मुख्य प्रवाहात आणणे.
 • आरोग्यदायी जीवनाचा प्रचार व प्रसार करणे.
 • संघटीत कार्यक्रम पध्दत
 • सार्वजनिक आरोग्य सुविधा व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी व त्यांच्यावर नियंत्रण स्थानिक पंचायत संस्थाना प्रशिक्षण देऊन स्वायत बनविणे.
 • महिला आरोग्य कार्यकर्ता (आशा) मार्फत घराघरांपर्यंत सुधारलेल्या आरोग्य सेवांचा वापर वाढविणे.
 • ग्रामपंचायतीतील गाव आरोग्य समिती मार्फत गावाचा आरोग्य आराखडा तयार करणे.
 • बंदमुक्त निधीतून उपकेंद्राला स्थानिक नियोजन करण्यासाठी सक्षम करणे आणि बहुउद्देशीय कार्यकर्त्यांची उपलब्धता वाढविणे.
 • प्राथामिक आरोग्य केंद्र व सामाजिक आरोग्य केंद्राचे सक्षमीकरण करणे आणि प्रत्येक 1 लाख लोकसंख्येमागे 30 ते 50 रुग्ण बेड क्षमता असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध करुन आजारावर उपचार करुन आरोग्यदायी जीवनासाठी प्रयत्न करणे. (भारतीय आरोग्य सुविधांचा नियमानुसार मनुष्यबळ साधणे व नियंत्रण नियम)
 • जिल्हा आरोग्य अभियानातंर्गत एकत्रित जिल्हा आरोग्य आराखडा तयार व अंमलबजावणी करणे यात पिण्याचे पाणी, स्वच्छता व आरोग्यदायीपणा व पोषणाचा समावेश करणे.
 • जिल्हा आरोग्य अभियानांतर्गत एकत्रित जिल्हा आरोग्य आराखडा तयार व अंमलबजावणी करणे

राष्ट्रीय आरोग्य अभियान: आरोग्य विभाग 2021 परीक्षेसाठी अभ्यास साहित्य पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

National Rural Health Mission (NRHM) – Maharashtra | राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) – महाराष्ट्र 

National Rural Health Mission (NRHM) – Maharashtra | राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) – महाराष्ट्र: महाराष्ट्र हे भारतातील उत्तम विकसित राज्यांपैकी एक मानले जाते. तथापि, संपूर्ण दृष्टीने अजूनही इतर काही राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या आरोग्य स्थितीत मोठी तफावत आहे. जिल्ह्यांमध्ये लक्षणीय बदल आहेत, ज्यासाठी जिल्हा विशिष्ट लक्ष्य निश्चित करणे आवश्यक आहे. मिशनने या समस्यांचे निराकरण करण्याची संधी प्रदान केली आहे. भारत सरकारच्या आदेशानुसार, राज्य आरोग्य मिशनची स्थापना सरकारच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे. पहिले  15 ऑक्टोबर 2005 ला ठराव मांडण्यात आला . त्यानंतर, महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने केंद्र सरकारसोबत काही सुधारणांसह सामंजस्य कराराला मंजुरी दिली आणि 16 जानेवारी 2006 रोजी केंद्र सरकारला सामंजस्य करार सादर करण्यात आला. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य आरोग्य सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे; सरकारनुसार जीओएम. दिनांक 24 ऑक्टोबर 2005 चा ठराव त्यानुसार, सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा आरोग्य मिशन आणि जिल्हा आरोग्य सोसायट्यांची स्थापना करण्यात आली आहे. राज्य आणि जिल्हा स्तरावरील सर्व उभ्या सोसायट्या अनुक्रमे राज्य आरोग्य सोसायटी आणि जिल्हा आरोग्य सोसायट्यांमध्ये विलीन झाल्या आहेत. 

National Rural Health Mission (NRHM) Study material for Arogya and ZP Bharti Exam 2021_40.1

National Rural Health Mission (NRHM) Study material for Arogya and ZP Bharti Exam 2021_50.1
महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग – प्रशासकीय

महाराष्ट्रात आरोग्य विभागाचे आठ प्रशासकीय विभाग आहेत ज्यामध्ये ठाणे, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर,  अकोला  व नागपूर  या विभागांचा समावेश होतो.

National Rural Health Mission (NRHM) – Health Infrastructure | राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) – आरोग्य इन्फ्रास्ट्रक्चर

National Rural Health Mission (NRHM) – Health Infrastructure | राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) – आरोग्य इन्फ्रास्ट्रक्चर: राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) चे आरोग्य इन्फ्रास्ट्रक्चर खाली देण्यात आले आहे.

National Rural Health Mission (NRHM) Study material for Arogya and ZP Bharti Exam 2021_60.1
आरोग्य इन्फ्रास्ट्रक्चर

वरील दिलेल्या ट्री डायग्राम नुसार आरोग्य विभागाचे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यात आले

तुम्हाला हेही बगायला आवडेल

Union and Maharashtra State Council of Ministers महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे
महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रदेशातील नदीप्रणाली  मानवी रोग: रोगांचे वर्गीकरण आणि रोगांचे कारणे | Human Diseases
सजीवांचे वर्गीकरण भाग 1- सूक्ष्मजीव आणि वनस्पती सजीवांचे वर्गीकरण भाग 2 – प्राणी
आरोग्य विषयक महत्वाचे दिवस भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | FYPs (From 1951 To 2017)

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे | Important Newspapers In Maharashtra

Important Passes in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटरस्ते

Our Solar System: आपली सौरप्रणाली: निर्मिती, ग्रह, तथ्य आणि प्रश्न

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

National Health Mission (NHM): Study Material for Arogya Bharti 2021

ढग व ढगांचे प्रकार (Clouds And Types Of Clouds)

Indian Constitution | आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे

Highest Mountain Peaks In India – State-Wise List | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State Wise-List Of National Parks In India | भारतातील राष्ट्रीय उद्यानांची राज्यनिहाय यादी

Fundamental Rights Of Indian Citizens | भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार

List Of Countries And Their National Sports |  देशांची यादी आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या | Public Finance

महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर | Download All Parts

FAQs National Rural Health Mission (NRHM)

Q1. आरोग्य व जि. प.  विभागाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानावर प्रश्न विचारातील का?

Ans. होय आरोग्य व जि. प.  विभागाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानावर प्रश्न विचारातील.

Q2. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानावर किती प्रश्न विचारले जातात?

Ans. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानावर 2 ते 3 प्रश्न विचारले जातात

Q3. तांत्रिक विषयात कोण कोणत्या घटकांचा समावेश होतो?

Ans. तांत्रिक विषयात सरकारच्या विविध  आरोग्यविषयक योजना,  रोग, आहारशास्त्र,  शरीरशास्त्र,  व संबंधित पदाशी  निगडित घटकाचा समावेश होतो

Q4.  तांत्रिक विषयातील घटक मला कुठे पाहायला मिळतील?

Ans. Adda247 मराठीच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला यासंबंधी सर्व माहिती मिळणार आहे. 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

National Rural Health Mission (NRHM) Study material for Arogya and ZP Bharti Exam 2021_70.1
Maharashtra Mahapack

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

National Rural Health Mission (NRHM) Study material for Arogya and ZP Bharti Exam 2021_90.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Download your free content now!

We have already received your details!

National Rural Health Mission (NRHM) Study material for Arogya and ZP Bharti Exam 2021_100.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.