Table of Contents
राष्ट्रीय उत्पन्न
राष्ट्रीय उत्पन्न : MPSC आणि इतर सरळ सेवा भरती परीक्षा येत्या काही महिन्यात होणार आहेत त्यामुळे तुमचे पूर्ण लक्ष अभ्यासावर असणे महत्त्वाचे आहे. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अभ्यास साहित्य आम्ही दररोज आणत आहोत. या अंतर्गत आपण दररोज सामान्य ज्ञान या विषयातील परीक्षेला उपयोगी असे विविध Topics चा अभ्यास करणार आहोत. तर चला आजच्या या लेखात आपण पाहुयात राष्ट्रीय उत्पन्न.या लेखात आपण राष्ट्रीय उत्पन्न लेखा, स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर, देशांतर्गत उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, मोजमापाच्या पद्धती आणि हरित जीडीपी पाहू.
MPSC परीक्षा 2024 : अभ्यास साहित्य प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
राष्ट्रीय उत्पन्न : विहंगावलोकन
राष्ट्रीय उत्पन्न : विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | MPSC भरती परीक्षा 2024 व इतर सर्व स्पर्धा परीक्षा |
विषय | भारतीय अर्थव्यवस्था |
लेखाचे नाव | राष्ट्रीय उत्पन्न |
लेखातील मुख्य घटक |
राष्ट्रीय उत्पन्नाविषयी सविस्तर माहिती |
National Income Accounting Before Independence | स्वातंत्र्य पूर्व काळात राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप
National Income Accounting before Independence: स्वातंत्र्याच्या पूर्वी काही प्रमुख अर्थतज्ज्ञांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे प्रयत्न केले होते.
भारताचे स्वातंत्र्य पूर्व काळातील राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे प्रयत्न पुढीलप्रमाणे :
- दादाभाई नौरोजी: हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी भारताचे राष्ट्रीय राष्ट्रीय उत्पन्न उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न केला. त्यांच्या मोजमापानुसार राष्ट्रीय उत्प 1867-68 मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न रू. 340 कोटी तर दर डोई उत्पन्न रू. 20 इतके होते. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे विभाजन दोन क्षेत्रांमध्ये कृषि क्षेत्र व गैरकृषि क्षेत्र केले होते. होते. मात्र दादाभाईंच्या गणना पद्धतीला वैज्ञानिक मानले जात नाही.
- विल्यम डिग्बी : यांनी 1897-98 मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न रू. 390 कोटी तर दर डोई उत्पन्न रू. 17 इतके असल्याचे सांगितले.
- फिंडले शिरास: 1911 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न रू.1942 कोटी, तर दर डोई उत्पन्न रू. 80 इतके होते.
- डॉ. व्ही. के. आर. व्ही. राव: यांनी 1925-29 या कालावधीसाठी राष्ट्रीय उत्पन्न रू. 2301 कोटी, तर दर डोई उत्पन्न रू. 78 इतके सांगितले. त्यांनी सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची गणना तसेच राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीचे प्रतिपादन केले. म्हणून त्यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक (Father of national income accounting) असे मानले जाते.
- आर. सी. देसाई: यांनी 1930-31 साठी राष्ट्रीय उत्पन्न रू. 2809, तर दर डोई उत्पन्न रू. 72 इतके असल्याचे सांगितले.
National Income Accounting: Domestic Product | देशांतर्गत उत्पाद
National Income Accounting, Domestic Product: देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात अनेक उत्पादन संस्था कार्यरत असतात. अशा सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धिताची एकूण म्हणजे ‘देशांतर्गत उत्पाद’ (Domestic product) होय.
देशांतर्गत उत्पादाशी संबंधित विविध संकल्पना पुढीलप्रमाणे:
- स्थूल देशांतर्गत उत्पाद (Gross Domestic Product at market price: GDPmp): देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात एका वर्षात निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या बाजारभावाची बेरीज म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पाद(Gross Domestic Product at market price: GDPmp) होय.
स्थूल देशांतर्गत उत्पाद (बाजारभाव) = सर्व उत्पादन संस्थांच्या स्थूल मूल्यवर्धितांची बेरीज,
- निव्वळ देशांतर्गत उत्पाद (Net Domestic Product at market price: NDPmp): देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील सर्व उत्पादन संस्थांच्या एका वर्षातील बाजारभावाला मोजलेल्या निव्वळ मूल्यवर्धितांच्या बेरजेला ‘निव्वळ देशांतर्गत उत्पाद’ (Net Domestic Product at market price: NDPmp) असे म्हणतात.
निव्वळ देशांतर्गत उत्पाद (बाजारभाव) = स्थूल देशांतर्गत उत्पाद(बाजारभाव)- घसारा.
- स्थूल देशांतर्गत उत्पाद (घटक किंमतींना मोजलेले) (Gross Domestic Product at factor cost: GDPfc): देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील सर्व उत्पादन संस्थांच्या एका वर्षातील घटक किंमतींना मोजलेल्या स्थूल मूल्यवर्धिताच्या बेरजेला ‘स्थूल देशांतर्गत उत्पाद( घटक किंमतींना मोजलेले) (GDPfc) असे म्हटले जाते.
स्थूल देशांतर्गत उत्पाद(घटक किंमतींना) = स्थूल देशांतर्गत उत्पाद(बाजारभाव) – अप्रत्यक्ष कर + अनुदाने
- निव्वळ देशांतर्गत उत्पाद(घटक किंमतींना मोजलेले) (Net Domestic Product at factor cost: NDPfc): देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील सर्व उत्पादन संस्थांच्या एका वर्षातील घटक किंमतींना मोजलेल्या निव्वळ मूल्यवर्धिताच्या बेरजेला ‘निव्वळ देशांतर्गत उत्पाद(घटक किंमतींना मोजलेले) (NDPfc) असे म्हटले जाते.
निव्वळ देशांतर्गत उत्पाद (घटक किंमतींना) = निव्वळ देशांतर्गत उत्पाद (बाजारभाव) – अप्रत्यक्ष कर + अनुदाने.
National Income Accounting: National Income | राष्ट्रीय उत्पाद
National Income Accounting- National Income: राष्ट्रीय उत्पादाच्या संकल्पनेत केवळ निवासींना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाचा समावेश होतो. देशातील निवासी परदेशी प्रक्षेत्रातील उत्पादन संस्थांनाही घटक सेवा पुरवित असतात. त्यामुळे राष्ट्रीय उत्पाद काढण्यासाठी देशांतर्गत उत्पादातून गैरनिवासींना प्रदान केलेले घटक उत्पन्न वजा केले पाहिजे, तर निवासींनी परदेशातून मिळविलेले घटक उत्पन्न मिळविले पाहिजे.
राष्ट्रीय उत्पाद= देशांतर्गत उत्पाद – परदेशास प्रदान केलेले घटक उत्पन्न + परदेशातून प्राप्त घटक उत्पन्न.
किंवा
राष्ट्रीय उत्पाद = देशांतर्गत उत्पाद + परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न
राष्ट्रीय उत्पादाशी संबंधित विविध संकल्पना पुढीलप्रमाणे:
- स्थूल राष्ट्रीय उत्पाद(बाजारभाव) (Gross National Product at market price: GNPmp):
स्थूल राष्ट्रीय उत्पाद(बाजारभाव) = स्थूल देशांतर्गत उत्पाद(बाजारभाव) + परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न.
- निव्वळ राष्ट्रीय उत्पाद (बाजारभाव) (Net National Product at market price: NNPmp):
निव्वळ राष्ट्रीय उत्पाद(बाजारभाव) = निव्वळ देशांतर्गत उत्पाद (बाजारभाव) + परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न.
- स्थूल राष्ट्रीय उत्पाद (घटक किंमत) (Gross National Product at factor cost: GNPfc):
स्थूल राष्ट्रीय उत्पाद(घटक किंमत) = स्थूल देशांतर्गत उत्पाद(घटक किंमत) + परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न.
- निव्वळ राष्ट्रीय उत्पाद (घटक किंमत) (Net National Product at factor cost: NNPfc):
निव्वळ राष्ट्रीय उत्पाद (घटक किंमत) = निव्वळ देशांतर्गत उत्पाद(घटक किंमत) + परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न.
घटक किंमतींना मोजलेल्या निव्वळ राष्ट्रीय उत्पादालाच देशाचे वास्तव ‘राष्ट्रीय उत्पन्न’ (Real National Income) म्हणून संबोधले जाते. राष्ट्रीय उत्पन्नाचे पूर्ण सूत्र पुढीलप्रमाणे:
राष्ट्रीय उत्पन्न = स्थूल देशांतर्गत उत्पाद (बाजारभाव) – घसारा – अप्रत्यक्ष कर + अनुदाने + परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न.
National Income Accounting: Methods of measurement | मोजण्याच्या पद्धती
National Income Accounting – Methods of measurement: कोणत्याही देशाचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या तीन पद्धती आहेत:
- उत्पादन पद्धत किंवा मूल्यवर्धित पद्धत
- उत्पन्न / आय पद्धत
- खर्च पद्धत
- उत्पादन पद्धत किंवा मूल्यवर्धित पद्धत (Production method or Value Added Method): उत्पादन पद्धत ही मूल्यवर्धित (value added) संकल्पनेवर आधारलेली आहे. या पद्धतीत देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धितांची बेरीज केली जाते. उत्पादन पद्धतीने काढलेले राष्ट्रीय उत्पन्न हे बाजारभावाला मोजलेले असते. उदा. GDPmp, NDPmp, GNPmp, NNPmp.
- उत्पन्न / आय पद्धत (Income method): वस्तू-सेवांच्या उत्पादन प्रक्रियेत उत्पादनाचे घटक (भूमी, श्रम, भांडवल व उद्योजकता) वापरले गेल्याने त्यांच्या मालकांना घटक उत्पन्न (खंड, मजुरी, व्याज व नफा) प्राप्त होत असते. अशा सर्व घटक उत्पन्नांची बेरीज म्हणजे घटक किंमतींना काढलेले राष्ट्रीय उत्पन्न होय. उदा. GDPfc, NDPfc, GNPfc, NNPfc.
- खर्च पद्धत (Expenditure method): उत्पादन संस्थांनी निर्माण केलेल्या अंतिम वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी लोकांनी केलेल्या खर्चाचा विचार केला जातो. लोक वस्तू व सेवांची खरेदी उपभोगासाठी आणि गुंतवणुकीसाठी करतात.
भारतात वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. सध्या CSO मार्फत GDP च्या गणनेसाठी वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी पुढील पद्धतींचा वापर केला जातोः
- उत्पादन पद्धतीचा वापर वस्तू उत्पादक क्षेत्रांसाठी (कृषि व उद्योग) केला जातो.
- उत्पन्न पद्धतीचा वापर साधारणतः सेवा क्षेत्रासाठी केला जातो.
- खर्च व वस्तू प्रवाह (commodity flow) पद्धतींचा एकत्रित वापर बांधकाम क्षेत्रासाठी केला जातो. त्यापैकी ग्रामीण बांधकामासाठी खर्च पद्धत, तर शहरी बांधकामासाठी वस्तू प्रवाह पद्धत वापरली जाते.
National Income Accounting: Green GDP | हरित जी.डी.पी.
National Income Accounting- Green GDP: आर्थिक वृद्धीबरोबरच पर्यावरणाची हानीसुद्धा घडून येते. अशी हानी घडून येऊ न देता शक्य असलेले जी.डी.पी. म्हणजे हरित जी.डी.पी. होय असे म्हणता येईल. हरित जी.डी.पी.चे संकल्पनात्मक सूत्र पुढीलप्रमाणे:
हरित जी.डी.पी. = पारंपरिक जी.डी.पी – पर्यावरणीय हानीचे मूल्य.
जगात हरित जी.डी.पी. मोजण्याची सर्वमान्य पद्धत शोधून काढणे शक्य झालेले नाही. चीनने 2006 साली 2004 या वर्षाचे हरित जी.डी.पी.चे आकडेप्रकाशित केले होते. मात्र राजकीय कारणांमुळे 2007 पासून त्यांनी या पद्धतीचा त्याग केला. सर पार्थ दासगुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने एप्रिल 2013 मध्ये ‘Green National Accounts in India: A Framework’ या नावाने आपला अहवाल सादर केला. त्यात त्यांनी हरित जी.डी.पी. मोजण्याबद्दल काही शिफारसी केल्या.
काही महत्वाचे मुद्दे :
- बाजारभावाला मोजलेल्या जी.डी.पी.ला मौद्रिक जी.डी.पी. (Nominal GDP) तर स्थिर किंमतींनी मोजलेल्या जी.डी.पी.ला वास्तविक जी.डी.पी. (Real GDP) असे म्हणतात.
- संबंधित वर्षातील प्रचलित किंमतींना त्या वर्षाच्या चालू किंमती असे म्हणतात. त्या वर्षातील चालू किंमतींना मोजलेल्या जी.डी.पी. ला मौद्रिक जी.डी. पी. असे म्हणतात. मात्र वास्तविक जी.डी.पी. मोजण्यासाठी स्थिर किंमतींचा वापर केला जातो.
- CSO ने जानेवारी 2010 मध्ये सातवी शृंखला सुरू केली. त्यासाठी आधारभूत वर्ष म्हणून 2004-5 हे वर्ष स्विकारण्यात आले. हे वर्ष अभिजित सेनगुप्ता कार्यदलाच्या शिफारसीनुसार स्विकारण्यात आले. सध्या राष्ट्रीय उत्पन्न गणनेच्या आठव्या शृंखलेसाठी जानेवारी 2015 पासून 2011-12 या आधारभूत वर्षाची निवड करण्यात आलेली आहे. प्रोफेसर के. सुंदरम समितीने या वर्षाची शिफारस केली होती.
- भारतात ‘हेडलाईन जी.डी.पी.’ म्हणून ‘घटक किंमतींना मोजलेल्या जी.डी.पी. ‘चा (GDPfc) वापर केला जात असे. मात्र जानेवारी 2015 पासून त्याऐवजी “स्थिर बाजार किंमतींना मोजलेल्या जी.डी.पी. चा (GDP at constant market prices) वापर सुरू करण्यात आला आहे.
MPSC परीक्षा 2024 : अभ्यास साहित्य योजना : सामान्य ज्ञान (GS) | ||
तारीख | वेब लिंक | अँप लिंक |
1 मार्च 2024 | केंद्र – राज्य संबंध | केंद्र – राज्य संबंध |
2 मार्च 2024 | दिल्ली सल्तनत | दिल्ली सल्तनत |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.