Marathi govt jobs   »   Study Materials   »   MPSC Shorts | Group B and...

MPSC Shorts | Group B and C | Economy | भारतातील बेरोजगारी

MPSC Shorts | Group B and C

MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आज या लेखात आपण भारतातील बेरोजगारी बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC गट ब आणि क परीक्षा
विषय Economy (अर्थशास्त्र)
टॉपिक भारतातील बेरोजगारी

भारतातील बेरोजगारीचे प्रकार

भारतातील बेरोजगारीचे प्रकार खाली थोडक्यात दिली आहेत.

  • हंगामी बेरोजगारी:
    • हंगाम नसलेल्‍या काळात जेव्हा लोकांना रोजगार नसतो त्‍याला हंगामी बेरोजगारी म्‍हणतात.
    • शेतकऱ्यांना पिकांच्या लागवडीसाठी पावसावर अवलंबून राहावे लागते. त्‍यामुळे शेती हा हंगामी व्यवसाय आहे.
  • छुपी/प्रछन्न बेरोजगारी:
    • सामान्यत: भारतातील खेड्यांमध्ये ही बेरोजगारी आढळते. ही एक अशी स्थिती आहे की ज्‍यामध्ये गरजेपेक्षा जास्‍त लोक काम करताना दिसतात.
    • त्‍यापैकी काही मजुरांना कामावरून कमी केले तरी उत्‍पादनावर त्‍याचा परिणाम होत नाही. दुसऱ्या शब्‍दांत सांगायचे तर ती एका विशिष्‍ट स्‍थितीशी संबंधित आहे, जिथे अतिरिक्‍त मनुष्‍यबळ असून त्‍यामध्ये काही मजुरांची सीमांत उत्‍पादकता शून्य असते.
  • सुशिक्षित बेरोजगारी:
    • काम करण्याची इच्छा आणि शिक्षणाची पात्रता असूनही रोजगार मिळत नाही त्‍यास सुशिक्षित बेरोजगारी म्‍हणातात.
    • ही बेरोजगारी शालान्त परीक्षा उत्‍तीर्ण, पदवीपूर्व शिक्षण, पदवीधारक व पदव्युत्‍तरांमध्ये दिसून येते.
  • तांत्रिक बेरोजगारी:
    • तंत्रज्ञानातील बदलांमुळे तांत्रिक बेरोजगारी निर्माण होते.
    • आधुनिक तंत्रज्ञान भांडवल प्रधान असून त्‍यास कमी कामगार लागतात.
  • संघर्षजन्य बेरोजगारी:
    • उद्योगांमधील संघर्षामुळे निर्माण होणारी बेरोजगारी म्‍हणजे संघर्षजन्य बेरोजगारी होय.
    • ह्या प्रकारची बेरोजगारी यांत्रिक बिघाड, वीजटंचाई, कच्च्या मालाचा अभाव, कामगारांचा संप इत्‍यादींमुळे निर्माण होते.
    • संघर्षजन्य बेरोजगारी ही तात्‍पुरत्‍या स्‍वरूपाची असते.
  • चक्रीय बेरोजगारी:
    • व्यापारचक्रातील तेजी-मंदीपैकी मंदीच्या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या बेकारीस चक्रीय बेकारी म्‍हणतात.
  • संरचनात्‍मक बेरोजगारी:
    • देशाच्या आर्थिक संरचनेत काही लक्षणीय बदलांमुळे ही बेरोजगारी निर्माण होते.
    • हे बदल उत्‍पादन घटकांच्या मागणी व पुरवठ्यावर परिणाम करू शकतात.
    • उपलब्ध रोजगार व कामगारांचे कौशल्य यातील तफावतीमुळे संरचनात्मक बेरोजगारी निर्माण होते.

भारतातील बेरोजगारीचा दर 2013-2023

भारतातील चढउतार बेरोजगारीशी झुंज देत आहे, जी अनेक वर्षांपासून मुख्य समस्या आहे. खालील तक्त्यात गेल्या 10 वर्षातील भारतातील बेरोजगारी दरांमधील ऐतिहासिक कलाची नोंद दिली आहे.

2013 ते 2023 पर्यंत भारतातील बेरोजगारी दराची यादी
वर्ष टक्केवारीत बेरोजगारीचा दर
2023 8.40%
2022 7.33%
2021 5.98%
2020 8.00%
2019 5.27%
2018 5.33%
2017 5.36%
2016 5.42%
2015 5.44%
2014 5.41%
2013 5.42%

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MPSC Mahapack
MPSC Mahapack

Sharing is caring!

FAQs

2023 साली भारतातील बेरोजगारीचा दर किती आहे?

2023 साली भारतातील बेरोजगारीचा 8.40% आहे.

भारतात छुपी बेरोजगारी प्रामुख्याने कोठे आढळते?

भारतातील खेड्यांमध्ये प्रामुख्याने छुपी बेरोजगारी आढळते. ही एक अशी स्थिती आहे की ज्‍यामध्ये गरजेपेक्षा जास्‍त लोक काम करताना दिसतात.

संघर्षजन्य बेरोजगारी म्हणजे काय?

उद्योगांमधील संघर्षामुळे निर्माण होणारी बेरोजगारी म्‍हणजे संघर्षजन्य बेरोजगारी होय.